करिअरनामा ऑनलाईन । मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण (UPSC Success Story) पूर्ण केल्यानंतर तिला इस्रोमध्ये शास्त्रज्ञाच्या नोकरीसाठी ऑफर आली. याशिवाय तिला सरकारी नोकरीच्या एक ना अनेक संधीही मिळाल्या. पण तिने हे सर्व नाकारलं. कारण तिला आयुष्यात वेगळं काहीतरी तिच्या मनासारखं करायचं होतं. ही कथा आहे आयपीएस अधिकारी तृप्ती भट्ट हिची. तिची प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. पाहूया…
डॉ. अब्दुल कलाम यांच्याकडून मिळाली प्रेरणा
डॉ. अब्दुल कलाम कोणाला माहित नाहीत? अबालवृध्दांमध्ये डॉ. कलाम हे लोकप्रिय व्यक्तिमत्व आहेत. तृप्ती इयत्ता 9वीत शिकत असताना डॉ. अब्दुल कलाम यांच्याशी (UPSC Success Story) तिची भेट झाली. डॉ. कलाम यांनी तृप्तीला स्वतः लिहिलेलं एक पत्र भेट म्हणून दिलं होतं, जे वाचून तिला प्रेरणा मिळाली. या पत्राने प्रेरित होऊन तृप्तीची आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी धडपड सुरु झाली. तिने UPSC परीक्षेची तयारी सुरु केली. या परिक्षेत ती चांगल्या मार्कने पास झाली. अब्दुल कलाम यांच्याकडून तिला आयपीएस अधिकारी बनण्याची प्रेरणा मिळाल्याचे ती सांगते.
पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC
तृप्तीचे आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने रात्रंदिवस मेहनत केली आणि यश मिळवले. विशेष म्हणजे पहिल्याच प्रयत्नात तृप्ती यूपीएससी परीक्षेत 165 वा क्रमांक मिळवून आयपीएस अधिकारी बनली आहे.
खेळातही पटकावले सुवर्णपदक (UPSC Success Story)
अल्मोडा येथील रहिवासी असलेल्या तृप्तीचा जन्म एका शिक्षक कुटुंबात झाला. तिचे प्राथमिक शिक्षण बीरशेबा शाळेतून झाले आणि केंद्रीय विद्यालयातून तिने 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. IPS तृप्ती भट्ट ही उत्कृष्ट क्रीडापटू आहे. तिने राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन आणि मॅरेथॉनमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे.
6 सरकारी परीक्षा पास केल्या
मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर तृप्तीने 16 सरकारी नोकऱ्यांसाठीची परीक्षाही पास केली होती. याशिवाय तिला इस्रो आणि अनेक खासगी संस्थांकडून नोकरीच्या (UPSC Success Story) ऑफर्सही आल्या होत्या. पण तिने हे सर्व प्रस्ताव नाकारले. तिला सरकारी अधिकारीच व्हायचं होतं. यासाठी तिने रात्रंदिवस मेहनत घेतली आणि आपलं स्वप्न पूर्ण केलं.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com