UPSC Success Story : आधी असिस्टंट कमांडंट.. नंतर इन्कम टॅक्स ऑफिसर आता थेट IPS; लग्नानंतरही सुरु होता स्वप्नांचा पाठलाग

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । तनू श्रीने यांनी हे दाखवून दिले आहे की (UPSC Success Story) जर तुम्ही तुमचे लक्ष्य हळूहळू वाढवले तर ते कसे कुशलतेने मिळवू शकता. त्यांच्याकडून हे शिकता येते की प्रत्येक यशाबरोबर नवीन उंची गाठण्याची संधी तुम्हाला मिळते. तनु श्री (IPS Tanu Shree) तिच्या ध्येयांबद्दल खूप जागरूक होती. एक ध्येय गाठल्यानंतर त्या थांबल्या नाहीत. मग त्यांनी आपला मोर्चा पुढच्या ध्येयाकडे वळवला. त्यांनी प्रथम केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) असिस्टंट कमांडंट, नंतर आयकर अधिकारी आणि नंतर आयपीएस अधिकारी असा प्रवास केला आहे. हा त्यांचा प्रवास कसा होता याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

2014 मध्ये असिस्टंट कमांडंट आणि 2017 मध्ये IPS पद
2014 मध्ये तनु श्री यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) असिस्टंट कमांडंट बनून सार्वजनिक सेवेत प्रवेश केला. या महत्त्वपूर्ण कामगिरीनंतरही त्यांनी विश्रांती न घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्वत:पुढे आणखी आव्हानात्मक लक्ष्य ठेवले. यावेळी यूपीएससी (UPSC) परीक्षेत यश मिळवण्याचे लक्ष्य समोर होते. कठोर (UPSC Success Story) तयारी केल्यानंतर त्या २०१६ मध्ये परीक्षेला बसल्या. मे 2017 मध्ये त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले. त्या UPSC मध्ये मिळाळलेल्या रॅंक वरुन आयपीएस केडरमध्ये रुजू झाल्या. तनुश्री यांचा IPS प्रवास हैदराबादमधील प्रतिष्ठित पोलीस अकादमीत प्रशिक्षण घेऊन सुरू झाला.

लग्नानंतरही सुरु होती तयारी (UPSC Success Story)
तनु श्री आपल्या यशाचे सर्व श्रेय त्यांच्या पालकांच्या मार्गदर्शनाला देते. 2015 मध्ये तनु श्री यांचे लग्न झाले. यानंतरही त्या थांबल्या नाहीत. त्यांनी आपले ध्येय साध्य केले. लग्नानंतर घरगुती जबाबदाऱ्या कुशलतेने पार पाडत असताना त्यांनी आपल्या करिअर मधील प्रगतीला ब्रेक दिला नाही. या त्यांच्या गुणामुळे त्यांचे पालक सुबोध कुमार आणि नीलम प्रसाद यांना आपल्या मुलीचा खूप अभिमान वाटतो. त्यांचे वडील सुबोध कुमार डीआयजी राहिले आहेत. तनुश्रीसाठी आपले वडीलच आदर्श आहेत.

थोरली बहीण आहे सीआरपीएफ कमांडंट
तनु श्री यांचे प्रारंभिक शिक्षण बिहारच्या मोतिहारी (UPSC Success Story) जिल्ह्यात झाले. वडिलांच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या पोस्टिंगच्या काळात त्यांनी अनेक संस्थांना भेटी दिल्या. त्याने डीएव्ही पब्लिक स्कूल, बोकारो येथून 12 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. नंतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी त्या दिल्लीत आल्या. प्रशिक्षणासोबतच त्यांनी सेल्फ स्टडीवरही भर दिला. त्यांची मोठी बहीण मनु श्री देखील सीआरपीएफ कमांडंट आहे. मनू यांनी संपूर्ण प्रवासात धाकट्या बहिणीला खूप प्रेरणा आणि प्रोत्साहन दिले.

कुटुंबाने दिलेला अतूट पाठिंबा
सीआरपीएफमधील असिस्टंट कमांडंट ते आयकर विभाग (UPSC Success Story) आणि त्यानंतर आयपीएस अधिकारी या प्रतिष्ठित पदापर्यंतचा तनु श्री यांचा प्रवास शिकण्यासारखा आहे. तनु श्री यांची समर्पण वृत्ती, कठोर परिश्रम हे तरुण पिढीसाठी प्रेरणादायी उदाहरण आहे. तनु श्री आणि त्यांची मोठी बहीण मनु श्री यांना त्यांच्या कुटुंबाने दिलेला अतूट पाठिंबा अनेक पालकांसाठी दिशादर्शक आहे. त्यांचा हा निश्चितच कौतुक आणि आदरास पात्र आहे. तनु श्री सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय असतात. इंस्टाग्रामवर त्यांचे हजारो फॉलोअर्स आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com