UPSC Success Story : ‘या’ अभिनेत्रीने पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC; कोचिंग क्लासशिवाय केला अभ्यास

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । IPS अधिकारी सिमला प्रसाद यांनी पहिल्याच (UPSC Success Story) प्रयत्नात युपीएससीसारखी अवघड परीक्षा पास केली आहे. त्यांना लहानपणापासून नृत्य आणि नाटकामध्ये अभिनय करण्याची आवड होती. नागरी सेवेची जबाबदारी सांभाळत त्यांनी सिनेमांमध्येही काम केले आहे. त्याचबरोबर त्यांना अभ्यासातही सुवर्णपदक  मिळाले आहे. चित्रपट अभिनेत्री सिमला प्रसाद या गुन्हेगारांसाठी कडक स्वभावाची पोलीस अधिकारी आहे. जाणून घेऊया 2010 बॅचच्या IPS अधिकारी सिमला प्रसाद यांच्याबद्दल…

बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम करणे हे IPS अधिकाऱ्यासाठी खूप आव्हानात्मक काम असते. पण 2010 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी सिमला प्रसाद यांनी ही कामगिरी यशस्वी करून दाखवली आहे.

 

Simala Prasad IPS

बालपणापासून नृत्य आणि अभिनयाची आवड (UPSC Success Story)

सिमला प्रसाद यांचा जन्म 08 ऑक्टोबर 1980 रोजी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे झाला. सिमला प्रसाद यांना लहानपणापासूनच नृत्य आणि अभिनयाची आवड होती. शालेय जीवनात त्या नेहमी नृत्य आणि अभिनयाच्या कार्यक्रमात भाग घेत असत. सिमला यांनी शालेय आणि महाविद्यालयीन काळात अनेक नाटकांमध्येही काम केले.

वडील IAS तर आई साहित्यिक

सिमला प्रसाद यांचे वडील, आयएएस अधिकारी आणि खासदार डॉ. भगीरथ प्रसाद आहेत. तर आई मेहरुन्निसा परवेझ या सुप्रसिद्ध साहित्यिक आहेत.

अभ्यासात Gold Medal

सिमाला यांचे सुरुवातीचे शिक्षण सेंट जोसेफ कोएड स्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी स्टुडंट फॉर एक्सलन्स (IEHE) मधून बीकॉम आणि बरकतुल्ला विद्यापीठ, भोपाळ येथून (UPSC Success Story) समाजशास्त्रात मास्टर्स पूर्ण केले. परीक्षेत अव्वल आल्याबद्दल त्यांना सुवर्णपदक मिळाले. यानंतर सिमला मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाची MPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्या.

Simala Prasad IPS

कोचिंगशिवाय पास केली UPSC

MPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सिमला प्रसाद यांची पहिली पोस्टिंग DSP म्हणून झाली. या नोकरीदरम्यान त्यांनी UPSC परीक्षेची तयारी केली आणि पहिल्याच (UPSC Success Story) प्रयत्नात त्यांनी यश मिळवले.

सिमला यांनी IPS होण्यासाठी कोणत्याही कोचिंग इन्स्टिट्यूटचा आधार न घेता स्व-अभ्यासाद्वारे UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

सिमाला सांगतात की, त्यांना सिव्हिल सेवेत जायचे आहे असे कधीच वाटले नव्हते, पण घरातील वातावरणामुळे त्यांना  IPS होण्याची इच्छा निर्माण झाली.

Simala Prasad IPS

साधेपणा आणि सौंदर्यामुळे मिळाली चित्रपटाची ऑफर (UPSC Success Story)

सिमला प्रसाद यांचा साधेपणा आणि सौंदर्य पाहून दिग्दर्शक जगम इमाम यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमादरम्यान त्यांच्यासोबत भेटीची वेळ मागितली. या भेटीत इमामने (UPSC Success Story) सिमला यांना त्यांच्या ‘अलिफ’ चित्रपटाची स्क्रिप्ट सांगितली आणि त्यांना चित्रपटात भूमिका देऊ केली. ‘अलिफ’ हा सिमलाचा पहिला चित्रपट होता आणि तो फेब्रुवारी 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर सिमला यांनी 2019 मध्ये रिलीज झालेल्या ‘नक्कश’ चित्रपटातही काम केले.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com