UPSC Success Story : ट्रेनच्या टॉयलेटमधून प्रवास करून रस्त्यावर अनेक रात्री काढणारा तरुण शिकण्याच्या जिद्दीने बनला IPS

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । रॉबिन हिबू यांच्या गावात (UPSC Success Story) शाळा नव्हती पण अभ्यासाची आवड त्यांना इथपर्यंत घेऊन गेली. रॉबिन सांगतात की लहानपणी ते घरापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेत चालत जायचे. शालेय शिक्षणानंतर ते पुढील शिक्षणासाठी दिल्लीला गेले. रॉबिन हिबू (IPS Robin Hibu) यांनी जेएनयूमधून शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. रॉबिन हिबू हे अरुणाचल प्रदेशातील पहिले IPS अधिकारी आहेत ज्यांना पोलिस महासंचालक (DGP) पद दिले गेले आहे. रॉबिन हिबू हे दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त होते. 1993 च्या बॅचचे रॉबिन हिबू हे अरुणाचल प्रदेश-गोवा-मिझोराम आणि केंद्रशासित प्रदेश (AGMUT) कॅडरचे विद्यार्थी आहेत. आज आपण त्यांच्या करिअर विषयी जाणून घेणार आहोत.

विविध महत्त्वाची पदे सांभाळली (UPSC Success Story)
IPS अधिकारी रॉबिन हिबू यांना केंद्रीय गृह मंत्रालयाने पोलीस महासंचालक (DGP) या पदावर बढती दिली आहे. सध्या ते दिल्ली पोलिसात विशेष आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. रॉबिन हिबू हे DGP बनणारे अरुणाचल प्रदेशचे पहिले IPS अधिकारी आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात राष्ट्रपती भवनाच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यासह विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

भारत-चीन सीमेवरील एका छोट्या गावात जन्म
रॉबिन हिबू यांचा जन्म 1 जुलै 1968 रोजी अरुणाचल (UPSC Success Story) प्रदेश आणि चीन सीमेजवळील हाँग या छोट्या गावात झाला. ते दिल्ली पोलिसांच्या दक्षता, वाहतूक सुरक्षा विंग आणि बीओएफ भर्ती कार्यालयाचे प्रमुख म्हणून काम करत होते.

गरजूंसाठी चालवतात संस्था
रॉबिन हिबू हे ‘हेल्पिंग हँड्स’ या ना-नफा संस्थेचे (UPSC Success Story) संस्थापक आहेत, जे संकटात ईशान्येकडील नागरिकांना मदत करतात. मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतीपासून ते मार्गदर्शनापर्यंत सर्व काही ते देतात. रॉबिन हिबू यांची पदोन्नती ही त्यांच्या समर्पण, कठोर परिश्रम आणि सार्वजनिक सेवेतील उत्कृष्ट योगदानाचा दाखला आहे.

आदिवासी शेतकरी कुटुंबात झाला जन्म
रॉबिन हे हिंदू आदिवासी समाजातून येतात. त्यांचा जन्म सामान्य आदिवासी शेतकरी कुटुंबात झाला आहे. त्यांच्या वडिलांकडे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालेल एवढी जमीनही नव्हती. त्यामुळेच जोड धंदा म्हणून शेतीसोबतच ते लाकूड तोडून बाजारात विकायचे.

शिक्षणासाठी रोजची 10 की. मी. पायपीट
रॉबिन हिबू ज्या गावात रहायचे त्या गावात शाळा नव्हती. पण त्यांना शिकून मोठं व्हायचं होतं. अभ्यासाची आवड त्यांना शाळेपर्यंत घेऊन गेली. रॉबिन सांगतात की लहानपणी ते घरापासून 10 किलोमीटर अंतरावर चालत शाळेत जायचे. शालेय शिक्षणानंतर ते पुढील शिक्षणासाठी दिल्लीला गेले. त्यांनी जेएनयूमधून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आहे.

ट्रेनच्या टॉयलेटमध्ये बसून प्रवास; रस्त्यावर काढल्या अनेक रात्री
रॉबिन सांगतात की, जेव्हा ते अरुणाचल प्रदेशातून (UPSC Success Story) दिल्लीला आले तेव्हा त्यांच्याकडे ट्रेनचे तिकीट काढण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. ट्रेनमध्ये टॉयलेटसमोर जमिनीवर बसून ते दिल्लीला पोहोचले. दिल्लीत आल्यानंतर त्यांना राहण्यासाठी जागा न मिळाल्याने त्यांनी जेएनयूजवळील भाजीपाला गोदामाबाहेर अनेक रात्र काढल्या. काही दिवसांनी त्यांना जेएनयूच्या नर्मदा हॉस्टेलमध्ये एक खोली मिळाली आणि त्यानंतर ते तिथे रहायला गेले.

पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC
जेएनयूमधून शिक्षण घेतल्यानंतर रॉबिन यांनी संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली. 1993 मध्ये त्यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा क्रॅक करून आयपीएस कॅडर (UPSC Success Story) मिळवले आहे. अत्यंत बिकट परिस्थितीत बालपण व्यतीत केल्यानंतर उच्च शिक्षण घेवून त्यांनी पहिल्याच प्रयत्नात नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण पास केल्याने तरुण वर्गासाठी ते प्रेरणा स्थान ठरले आहेत .
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com