करिअरनामा ऑनलाईन । काम्या मिश्राने एक आदर्श घालून (UPSC Success Story) दिला आहे. संधी दिली तर मुलीही कुणापेक्षा कमी नाहीत हे तिने तिच्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे. तिने आपल्या कठोर मेहनतीतून आपली क्षमता सिद्ध केली आहे. जाणून घेऊया तिच्या आयपीएस (IPS) अधिकारी बनण्याची संपूर्ण कहाणी; जिने वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC मध्ये यश मिळवले आहे. काम्या मिश्रा (IPS Kamya Mishra) असं या तरुणीचं नाव आहे.
12 वी मध्ये ठरली टॉपर
काम्या ही ओडिशाची रहिवासी असून ती लहानपणापासूनच मेहनती विद्यार्थिनी आहे. तिने 12वी मध्ये 98 टक्के गुण मिळवले आणि ती विभागात टॉपर ठरली. यानंतर काम्याने (UPSC Success Story) दिल्ली विद्यापीठात प्रवेश घेतला आणि लेडी श्रीराम कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. यादरम्यान तिने यूपीएससी (UPSC) परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने तेव्हापासूनच परीक्षेची तयारी सुरू केली होती. वास्तविक, UPSC परीक्षा ही खूप अवघड मानली जाते, ती पास करण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात; हे सर्वांनाच माहित आहे.
काम्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता (UPSC Success Story)
काम्या मिश्रासाठी देखील हा प्रवास सोपा नव्हता, यूपीएससीची तयारी अवघड आहे आणि पूर्ण नियोजनाशिवाय तयारी करणे योग्य ठरणार नाही; हे तिला माहित होते. यासाठी तिने परीक्षेच्या तयारीची रणनीती बनवली आणि प्रत्येक विषयाला किती वेळ द्यायचा हे ठरवले. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीसाठी तिने स्वतंत्र रणनीती बनवली होती.
केवळ सेल्फ स्टडी करुन पास झाली
काम्या अभ्यासात नेहमीच हुशार होती. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर तिने वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा पास केली. यासाठी तिने कोणत्याही प्रकारच्या (UPSC Success Story) कोचिंग क्लासचा आधार घेतला नाही. तिने फक्त आणि फक्त सेल्फ स्टडी केला. 2019 मध्ये ती AIR 172 रॅंक घेवून पास झाली आणि भारतीय पोलीस सेवेत अधिकारी बनली.
पती आहेत IPS अधिकारी
सुरुवातीला तिला हिमाचल केडरमध्ये नियुक्त करण्यात आले होते पण नंतर तिची बिहार कॅडरमध्ये बदली करण्यात आली. काम्याचे पती देखील आयपीएस (IPS) अधिकारी आहे. तिने 2021 मध्ये बिहार कॅडरचे IPS अवधेश सरोज (IPS Awadhesh Saroj) यांच्याशी लग्न केले. उदयपूरमध्ये दोघांचे लग्न झाले. अवधेशने आयआयटी बॉम्बेमधून (IIT Bombay) पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com