UPSC Success Story : “फक्त UPSC.. बाकी काही नाही!!” IPS होण्यासाठी 35 लाखाच्या नोकरीचा त्याग; कोण आहे हा तरुण?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । त्याने 2012 मध्ये जेईई परीक्षा (UPSC Success Story) उत्तीर्ण केली आणि आयआयटी दिल्लीमध्ये प्रवेश मिळवला.  B.Tech पूर्ण केल्यानंतर त्याला एका जपानी कंपनीकडून वार्षिक 35 लाख रुपये पगाराच्या तगड्या पगाराची ऑफर मिळाली. पण त्याने ही ऑफर नाकारली आणि यूपीएससीची (UPSC) तयारी केली. कॉलेजमध्ये असतानाच त्याने आयएएस किंवा आयपीएस व्हायचं ठरवलं होतं. ही कथा आहे आयपीएस अधिकारी अर्चित चांडक यांची. आज आपण त्यांची यशोगाथा जाणून घेणार आहोत.

नागपूरमध्ये जन्म आणि तिथेच झाले शिक्षण
अर्चित चांडक हे शंकर नगर, नागपूरचे रहिवासी आहेत. बी. पी. विद्या मंदिर, भवन येथून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आयआयटी दिल्लीमध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंगला प्रवेश घेतला. 2012 मधील जेईई परीक्षेत अर्चित टॉपर ठरले होते.

35 लाखाची ऑफर धुडकावली (UPSC Success Story)
बी.टेक. करत असताना इंजिनिअर होण्याऐवजी प्रशासकीय सेवेत रुजू होऊन देशसेवा करण्यात अर्चित यांना रस वाटू लागला. ते सांगतात त्यांच्या इंटर्नशिपदरम्यान एका जपानी (UPSC Success Story) कंपनीने त्यांना 35 लाखांच्या पगाराच्या पॅकेजसह नोकरीची ऑफर दिली. पण त्यांनी ही ऑफर नाकारली आणि यूपीएससी परीक्षेची तयारी करण्याचे ठरवले.

पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC
अर्चित यांनी 2016 मध्ये आयआयटी दिल्लीतून बी.टेक पदवी मिळवली. यानंतर 2018 मध्ये ते प्रथमच UPSC नागरी सेवा परीक्षेस बसले. या परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात त्यांनी संपूर्ण भारतातून 184 वा क्रमांक मिळवला आणि ते IPS झाले. सध्या ते नागपूर पोलिस विभागात डीसीपी म्हणून कार्यरत आहेत.
व्यायाम आणि खेळासाठी देतात वेळ 
अर्चित चांडक यांना खेळ आणि व्यायामाची विशेष आवड आहे. त्यांना बुद्धिबळ खेळायला आवडते. त्यांचे FIDE रेटिंग 1820 आहे. ते फिटनेस फ्रीक म्हणून ओळखले जातात. त्यांनी 42 किलोमीटरची मुंबई मॅरेथॉनही पूर्ण केली आहे. याशिवाय ते सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. ते आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. इंस्टाग्रामवर टयांचे 92 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

पत्नीही आहे IAS अधिकारी
IPS अर्चित यांनी त्यांची बॅचमेट सौम्या शर्मासोबत लग्न केले आहे. त्या देखील IAS अधिकारी आहेत. सध्या त्या नागपूर जिल्हा परिषद येथे CEO पदाचा कारभार सांभाळत आहेत. सौम्या शर्मा यांनी UPSC परिक्षेत संपूर्ण भारतात 9वा क्रमांक पटकावून त्या या परिक्षेत टॉपर ठरल्या होत्या. सौम्या यांच्या (UPSC Success Story) बाबतची एक गोष्ट म्हणजे त्यांना श्रवणशक्ती कमी आहे. त्यांना ऐकू येत नाही. वयाच्या 16 व्या वर्षी त्यांची ऐकण्याची क्षमता गेली. तरीही त्यांनी आपल्या शारीरिक दुर्बलतेवर मात करत अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. त्यांना ऐकू येत नाही हे माहित असताना अर्चित यांनी सौम्या यांचा स्वीकार केला आणि त्यांच्याशी लग्नगाठ बांधली. आज दोघेही अधिकारी पदावर जाबाबदरीने काम करत आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com