करिअरनामा ऑनलाईन । आयपीएस अंशिका वर्मा ही (UPSC Success Story) तरुणांसाठी आयडॉल ठरली आहे. आपण पाहतो की UPSC परीक्षा देणारे अनेकजण कोणत्याही प्रकारचा कोचिंग क्लास न लावता अधिकारी झाले आहेत. याच यादीत अंशिका वर्माचं नाव सामील झालं आहे. अंशिका 2020 च्या बॅचची IPS आहे. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर ती कामा संदर्भात अपडेट्स शेअर करत असते. तिच्या साधेपणाचे लाखो चाहते आहेत. तिला इन्स्टाग्रामवर लाखो लोक फॉलो करतात.
नोएडामधून घेतलं शिक्षण
अंशिका वर्माने प्राथमिक शिक्षण नोएडातून पूर्ण केलं. त्यानंतर 2014-2018 मध्ये (UPSC Success Story) गलगोटिया कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी इथून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक. ची डिग्री पूर्ण केली आहे.
सरकारी नोकरीच करायची होती (UPSC Success Story)
अंशिका इंजिनिअर झाली होती पण तिच्या मनात सरकारी नोकरी करायची इच्छा होती. त्यामुळे बी.टेक केल्यानंतर ती प्रयागराजला आली. इथे तिने UPSCची तयारी सुरू केली. 2019 मध्ये तिने प्रथमच परीक्षा दिली. मात्र यामध्ये तिला अपयश आले. पण हिंमत न हारता तिने प्रयत्न सुरूच ठेवले.
विना कोचिंग केला अभ्यास
अंशिकाला UPSC देताना एकदा अपयश आलं होतं. पहिल्या परिक्षेत झालेल्या चुकांमधून तिने आधीच्या चुका सुधारल्या आणि 2020 मध्ये ती दुसऱ्यांदा परीक्षेला बसली. यामध्ये अंशिकाने पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या. तिने मुलाखतीतही चांगले गुण मिळवले. अंशिकाने या परिक्षेत (UPSC Success Story) संपूर्ण भारतातून 136 वी रॅंक मिळवली. तिची आयपीएस म्हणून निवड झाली व तिला उत्तर प्रदेश केडर मिळालं. अशा प्रकारे ती उत्तर प्रदेश केडरमधील नागरी सेवक झाली. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिने या तयारीसाठी कोणताही कोचिंग क्लास लावला नव्हता.
संपूर्ण देशभरात 136 वी रॅंक (UPSC Success Story)
अंशिकाने मुलाखतीत चांगले सादरीकरण केले. तिच्या उत्तम परफॉर्मन्सने तिला देशात 136 वा क्रमांक मिळवून दिला. त्यानंतर तिची IPS म्हणून निवड झाली. IPSची सेवा (UPSC Success Story) मिळाल्यानंतर अंशिकाला होम कॅडर देण्यात आले आहे.
वडील निवृत्त कर्मचारी तर आई गृहिणी
अंशिकाचे वडील उत्तर प्रदेश विद्युत निगम लिमिटेडमधून सेवा निवृत्त झाले आहेत. तर तिची आई गृहिणी आहे. इंजिनीअर असलेली मुलगी आता नागरी (UPSC Success Story) सेवक झाल्याचा तिच्या पालकांना मोठा अभिमान आहे. आपल्या मुलीने केवळ सेल्फ स्टडीच्या जोरावर यश मिळवल्याचे ते सांगतात.
सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स
अंशिका वर्मा तिच्या लूकसाठीही ओळखली जाते. इन्स्टाग्रामवर तिचे दोन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिचं फॅन फॉलोइंग झपाट्याने वाढत आहे. तिच्या प्रत्येक पोस्टवर फॉलोअर्स लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत असतात. इंस्टाग्रामवर अंशिकाचे 1 लाख 48 हजार फॉलोअर्स आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com