UPSC Success Story : इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचं नव्हतं म्हणून दिली UPSC; IIS अधिकारी होवून स्वप्न केले साकार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । उत्तराखंडच्या देवभूमीला लष्करी भूमी (UPSC Success Story) म्हणून ओळख आहेच पण याबरोबरच इथल्या नगरिकांनी सैन्य, शिक्षण, साहित्य, सुरक्षा सल्लागार, सीडीएस, आयएएस, आयपीएस अशा अनेक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. या देवभूमीतील रहिवाशांनी केवळ राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही अनेक क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. या यादीत एक नाव आवर्जून घ्यावं लागेल ते म्हणजे चमोली जिल्ह्यातील डिमर गावातील तरुण अधिकारी अनुभव डिमरी (IIS Anubhav Dimri) याचं. अनुभव दुसऱ्याच प्रयत्नात UPSCची परीक्षा पास झाला आणि सध्या तो IIS पदावर कार्यरत आहे. विशेष म्हणजे त्याने कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करूनही नागरी सेवेत सामील होण्याचा निर्णय घेतला आणि तो यामध्ये यशस्वी झाला; पाहूया त्याच्या वाटचाली विषयी…

आर्मी स्कूलमध्ये झाले शिक्षण
अनुभवचे वडील चंद्रशेखर डिमरी 3 गढवाल रायफलमध्ये तैनात होते तर त्याची आई विजया डिमरी गृहिणी आहे. वडिलांच्या सैन्यातील नोकरीमुळे त्यांची देशात कुठेही बदली होत असे. त्यामुळे त्याचे बालपण आर्मी स्कूल, मेरठ, पश्चिम बंगाल आणि अरुणाचल प्रदेशमध्ये गेले. 12 वीनंतर मात्र तो पदवी करण्यासाठी दिल्लीत आला आणि आयपी युनिव्हर्सिटी दिल्लीतून कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले.

IT क्षेत्रात फार रस नव्हता (UPSC Success Story)
अनुभवने सांगितले की, “कॉम्प्युटर सायन्स आणि कोडिंग आणि डिकोडिंगमध्ये माझे मन रमत नाही; हे लक्षात आल्यानंतर मी दुसऱ्या क्षेत्राकडे वळण्याचा विचार केला. अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षापासून मी यूपीएससीची (UPSC) तयारी सुरू केली. 2019 मध्ये मी पहिल्यांदा परीक्षा दिली पण माझा हा प्रयत्न असफल ठरला. मी पूर्व परीक्षा पास करु शकलो नाही. पण मी मागे हटलो नाही. मी पुन्हा एकदा परीक्षेचा फॉर्म भरला आणि जोरदार तयारी सुरु केली आणि पूर्व, मुख्य परीक्षा आणि मुलाखत फेरी पास करण्यात मला यश मिळाले. “

सरकारी अधिकारी होणारा कुटुंबातील पहिला तरुण
अनुभवला वयाच्या 26 व्या वर्षी हे यश मिळाले आहे. UPSC ने 2020 मध्ये घेतलेल्या परिक्षेत राखीव यादीत त्याला 37 वे स्थान मिळाले आणि तो IIS म्हणजेच भारतीय माहिती सेववेमध्ये सामील (UPSC Success Story) झाला. तो सध्या दिल्लीत कार्यरत आहे. अनुभव सांगतो की, त्याच्या कुटुंबातून UPSC ची परीक्षा देवून पास होणारा अनुभव (IIS Anubhav Dimri) हा पहिलाच व्यक्ति आहे. त्याच्या आधी कोणीही स्पर्धा परीक्षा दिल्या नाहीत. त्याने आपले ध्येय निश्चित केले आणि मेहनतीने लक्ष्य गाठले आहे; त्यामुळे अनुभवचे उदाहरण तरुणांना प्रेरणा देणारे ठरेल हे निश्चित.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com