UPSC Success Story : UPSC परीक्षेत केलं टॉप; देशात 6 वी रॅंक मिळवूनही IAS पद नाकारलं; आता करते ‘हे’ काम

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । UPSC नागरी सेवा परीक्षा पास (UPSC Success Story) करून अनेकांना IAS, IPS आणि IFS होण्याची इच्छा असते. या परीक्षेत यश मिळवण्यासाठी अनेकजण जीवतोड मेहनत करतात. यापैकी काहींनाच यश मिळतं तर अनेकांना अपयशाचा सामना करावा लागतो. UPSC परीक्षा तरुणांसाठी करिअरचे दरवाजे खुले करते. या परीक्षेच्या माध्यमातून अनेक उमेदवार परीक्षेत यशस्वी होण्याचे आणि नागरी सेवक बनण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा उराशी बाळगतात.

मात्र, तल्लख बुध्दीमत्तेची ज्वेल नव्या जेम्स इतर उमेदवारांसारखी नाही. तिने कठोर मेहनत घेवून या परीक्षेत संपूर्ण भारतात 6 वा क्रमांक मिळवला आहे. या कामगिरीमुळे ती देशात टॉपर ठरली आहे. एवढे उत्तुंग यश मिळवल्यानंतरही देशातील सर्वोच्च IAS अधिकारी पद नाकारले. हो, हे खरं आहे. एका मल्याळी मुलीने UPSC ने 2022 मध्ये घेतलेल्या परीक्षेत टॉप रँक मिळवली पण IAS अधिकारी न होण्याचा निर्णय तिने घेतला आहे.

उच्च शिक्षित आहे नव्या (UPSC Success Story)
नव्या जेम्स (IFS Navya James) केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील पाला येथील रहिवासी आहे. पाला येथील अल्फोन्सा कॉलेजमधून तिने इतिहास विषय घेवून B.A. केले आहे. यानंतर तिने राज्यशास्त्र विषय ठेवून M.A. पूर्ण केले आणि सेंट थॉमस कॉलेजमधून प्रथम क्रमांक मिळवला. यूजीसी नेट (UGC NET) परीक्षेत ज्युनियर रिसर्च फेलोशिप मिळवल्यानंतर तिने आंतरराष्ट्रीय संबंधात पीएचडीही (PHD) केली आहे.

अशी होती अभ्यासाची स्ट्रॅटेजी
नव्या जेम्सने संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचं ठरवलं. 2022 मध्ये कोणत्याही कोचिंग शिवाय ती या परीक्षेला सामोरी गेली. तिने आत्मविश्वासाने सेल्फ स्टडी पूर्ण केला. अभ्यास करताना (UPSC Success Story) ती फक्त वर्तमानपत्रे वाचन आणि इंटरनेटवर अवलंबून होती. तिला अगदी लहानपणापासूनच वर्तमानपत्र वाचण्याची सवय होती, ज्यामुळे तिला नेक विषयांवर आणि घटनांविषयी स्वतःचे मत तयार करण्यात मदत झाली. या गोष्टीचा तिला UPSC परीक्षेत खूप उपयोग झाला.

काकांच्या व्यक्तिमत्वाचा नव्यावर प्रभाव (UPSC Success Story)
नव्याचे काका सिबी जॉर्ज IFS अधिकारी आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा लहानपणापासून नव्यावर प्रभाव आहे. काकांकडून प्रेरित होऊन, नव्याने UPSC मध्ये AIR-6 मिळवूनही IAS होण्या ऐवजी IFS (Indian Foreign Service) अधिकारी होण्याचा निर्णय घेतला. नव्याने एका मुलाखतीत सांगितले आहे; “माझे काका, 1993 बॅचचे IFS अधिकारी आहेत, मी नागरी सेवेत येण्यासाठी मला काकांकडूनच प्रेरणा मिळाली आहे. शिवाय, परराष्ट्र सेवेतील त्यांच्या उपस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय घडामोडींवर लक्ष ठेवण्याची माझी आवड निर्माण झाली आहे; त्यामुळे मी IAS पद नाकारून IFS पदाची जबाबदारी पार पडण्याचा निर्णय घेतला आहे.”
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com