UPSC Success Story : नवीन वर्षावर केला अभ्यासाचा संकल्प; ताण तणावावर मात करत बनली IFS; अशी होती अभ्यासाची स्ट्रॅटेजी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । उत्तराखंडमधील गीतिका… तिचा IFS अधिकारी (UPSC Success Story) होण्याचा प्रवास खूपच रंजक आहे. सरकारी अधिकारी होण्यासाठी तिने अनेक अडचणींचा सामना केला आहे. आता ती अभिमानाने तिचा संघर्ष UPSC परीक्षार्थींसमोर व्यक्त करते. यामुळे इतर उमेदवारांना प्रेरणा मिळेल आणि ते सुध्दा न थांबता आपले ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम घेतील. जाणून घेवूया गीतिकाविषयी….

कठीण होता UPSC चा प्रवास
आजारपण, कौटुंबिक समस्या, पालकांची बदली आणि समाजाच्या दबावाला सामोरे जात स्वत:चा मार्ग ठरवणाऱ्या मुलीची ही प्रेरणादायी कहाणी आहे. गीतिका तामता असं हिचं नांव. तिच्याससाठी UPSC पास होण्याचा प्रवास खूप कठीण होता. पण ती खचली नाही, थांबली नाही.. प्रत्येक अडचणीवर मात करत ती आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत राहिली. उत्तराखंडमधील 2022 बॅचच्या IFS गीतिकाची कहाणी खरोखरच खूप प्रेरणादायी आहे.

नवीन वर्षावर केला अभ्यासाचा संकल्प (UPSC Success Story)
गीतिका (IFS Geetika Tamta) ही उत्तराखंडच्या नैनितालची रहिवासी आहे. आपल्यापैकी प्रत्येकजण नवीन वर्षाचा काही ना काही संकल्प करत असतो. असाच संकल्प गीतिकाने केला. 2021 च्या नवीन वर्षाच्या सुरवातीला तिने गांभीर्याने अभ्यास करण्याचा संकल्प केला होता. तिने एकाग्रतेने अभ्यास सुरू केला पण ती इन्स्टाग्रामवर जास्त सक्रिय असल्यामुळे तिचे अभ्यासापासून लक्ष विचलित झाले. यानंतर तिने पंधराच दिवसात तीची सर्व सोशल मीडिया खाती निष्क्रिय केली.

कुटुंबापासून स्वतःला वेगळे ठेवले
गीतिकाने तिच्या अभ्यासाचे तास वाढवले ​​होते पण तरीही तिच्या समोर एक समस्या उभी होती. सण-उत्सव, कुटुंब, मित्रमंडळींची मेळावे यामुळे तिला त्रास होत होता. तिने सर्वांपासून स्वतःला वेगळे ठेवण्यास सुरुवात केली. एप्रिल 2021 मध्ये तिने एका बोर्डवर अभ्यासाचे वेळापत्रक बनवले.

अचानक परीक्षा पुढे गेली
2021 मध्ये UPSC परीक्षा 27 जून रोजी होणार होती. गीतिकाचे (IFS Geetika Tamta) परीक्षा केंद्र दिल्लीत होते. अभ्यासासाठी चांगले वातावरण मिळावे म्हणून एप्रिलमध्येच ती दिल्लीला गेली होती. त्यावेळी (UPSC Success Story) तिच्या घरात काही गोष्टी घडत होत्या ज्यामुळे ती भावनिक तणावात होती. दिल्लीत आल्यानंतर तिने शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायामही सुरू केला. त्यानंतर दुष्काळात तेरावा महिना म्हणतात तसं यूपीएससी प्रिलिम्स परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळाली. कोविडच्या दुसऱ्या लाटेत म्हणजेच मे २०२१ मध्ये ती नैनितालला परतली.

अशी केली ताण तणावावर मात
परीक्षेच्या तारखेत बदल झाल्यामुळे गीतिकानेही तिचे परीक्षा केंद्र दिल्लीऐवजी अल्मोडा येथे बदलले. हे केंद्र तिच्या घरापासून जवळ होते. ती तिच्या आईचे जॅकेट घालून परीक्षेला गेली होती. यामुळे तिचा आत्मविश्वास वाढण्यास मदत व्हायची. 10 ऑक्टोबर 2021 रोजी पूर्व परीक्षा दिल्यानंतर, तिने 13 ऑक्टोबरपासून UPSC च्या मुख्य परीक्षेची तयारी सुरू केली. तिला जेव्हा तणाव जाणवत होता तेव्हा ती मेणबत्त्यांच्या सुगंधाने स्वतःला आराम देण्याचा प्रयत्न करायची.

अशी होती अभ्यासाची स्ट्रॅटेजी
पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर गीतिकाने उत्तर लेखन सराव आणि वेळेच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित केले. त्यानंतर जानेवारी 2022 मध्ये तिच्या पालकांची बदली झाली. तिचे कुटुंब डेहराडूनला (UPSC Success Story) स्थायिक झाले आणि ती दिल्लीला आली. दिल्लीच्या हिवाळ्यात ती आजारी पडली. मग डॉक्टरांनी तिला सतत प्रेरित केले. ती मुख्य परीक्षेत पास झाली. नंतर ती डेहराडूनला आली होती. यूपीएससी मुख्य परीक्षेतील यशाचा आनंद साजरा करण्यासाठी ती कुटुंबासह हरिद्वारला गेली होती.

G20 शिखर परिषदेत सहभागी (UPSC Success Story)
UPSC मुलाखतीची तयारी करण्यासाठी तिने दिल्लीत राहून अनेक मॉक इंटरव्ह्यू दिले, ज्याचा तिला खूप फायदा झाला. अखेर UPSC चा निकाल 30 मे 2022 रोजी प्रसिद्ध झाला आणि ती संपूर्ण भारतातून 239 वी रँक मिळवत IFS अधिकारी बनली. मसुरी येथील एलबीएसएनएए येथे प्रशिक्षणादरम्यान ती पुन्हा सोशल मीडियावर सक्रिय झाली. नुकत्याच झालेल्या G20 शिखर परिषदेमध्ये ती सहभागी झाली होती.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com