UPSC Success Story : एकदा पास झाला तरी थांबला नाही; पुन्हा परीक्षा देवून मिळवली 7 वी रॅंक; UPSC टॉपर वसीम अहमद 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग (UPSC Success Story) जिल्ह्यातील वसीम अहमद भट याने UPSC 2022 परीक्षेत  घवघवीत यश मिळवून कुटुंबाचे नाव पुन्हा एकदा उंचावले आहे. तो टॉप 10 उमेदवारांमध्ये आल्याने त्याचे कुटुंबीय खूप उत्साही आहेत. वसीम याने लहानपणापासूनच अभ्यासासाठी योगदान दिले आहे आणि आता भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी बनण्यासाठी आणि देशसेवा करण्यासाठी त्याने देशातील सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण केली आहे. 2021 मध्ये 225 वी रॅंक मिळवल्यानंतरही वसीम थांबला नाही. त्याने पुन्हा एकदा UPSC ची परीक्षा देवून विक्रम केला आहे. त्याला या परिक्षेत संपूर्ण देशात 7 वा क्रमांक मिळाला आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येक उमेदवारासाठी वसीम प्रेरणा बनला आहे.

संपूर्ण भारतात 7 वा क्रमांक मिळवणाऱ्या वसीम अहमद भटच्या आईने सांगितले की, त्याने केवळ दुसऱ्याच प्रयत्नात टॉप 10 उमेदवारांमध्ये स्थान मिळवले आहे. यामुळे आमचे कुटुंब (UPSC Success Story) खरोखर खूप आनंदी आहे. मी सर्व पालकांना आवाहन करते की त्यांनी आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.

दहशतवादग्रस्त भागातील तरुण (UPSC Success Story)
वसीम हा अनंतनाग जिल्ह्यातील दहशतवादग्रस्त भागातील तरुण आहे. या जिल्ह्यात दहशतवादी सतत धोकादायक कारवाया करतात. अशा वातावरणात वसीम यांनी (UPSC Success Story) अभ्यास सुरु ठेवला. वसीमने एनआयटीमधून इंजिनीअरिंग केले आहे. वसीम त्याच्या यशाचे श्रेय त्या सर्व लोकांना देऊ इच्छितो ज्यांनी त्याला बिनशर्त पाठिंबा दिला. तसेच तो कठोर परिश्रम आणि चिकाटीला आपल्या यशाची शिडी मानतो.

दुर्गम भागात राहून केला अभ्यास
दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील दुर्गम भागातील दुरु शाहबाद येथे राहून त्याने आपले ध्येय साध्य करण्यासाठी अनेक आव्हानांवर मात केली आहे. UPSC परीक्षा 2021 मध्ये 225 वी रँक मिळवणारा वसीम सध्या भारतीय महसूल सेवेसाठी प्रशिक्षण घेत आहे. प्रशिक्षण (UPSC Success Story) सुरु असताना त्याने पुन्हा परीक्षा दिली आणि परीक्षेच्या या दुसऱ्या प्रयत्नात त्याने संपूर्ण भारतातून 7 वा क्रमांक मिळवला आहे. त्याचा विश्वास आहे की शिक्षण हे राष्ट्रीय प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण साधन आहे. शिक्षण, आरोग्य आणि कौशल्य विकास क्षेत्रात योगदान देण्याची त्याची इच्छा आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com