करिअरनामा ऑनलाईन । वैष्णवी सांगते की; “मी स्वतःलाच आयएएस (UPSC Success Story) होण्याचे वचन दिले होते, आणि हे वचन पूर्ण करण्यात मी यशस्वी झाले. आयुष्यात वाचनाला नेहमीच प्राधान्य दिले पाहिजे. लहानपणीच मला खरी प्रेरणा वर्तमानपत्र वाचनातून मिळाली. माझं म्हणणं आहे की तुमचे स्वप्न ठरले असेल आणि तुमच्याकडे सपोर्ट सिस्टीम असेल तर मेहनत करायला घाबरू नका. न थांबता पुढे जा.” उत्तर प्रदेशच्या वैष्णवी पॉल (IAS Vaihnavi Paul) हिने UPSC मध्ये दिमाखदार कामगिरी केली आहे. आज आपण तिने मिळवलेल्या यशाबद्दल जाणून घेणार आहोत…
शिक्षिकेची मुलगी (UPSC Success Story)
उत्तर प्रदेशच्या गोंडा येथील वैष्णवी ही रहिवासी आहे. तिची आई शिक्षिका आहे. तिने UPSC सिव्हिल सर्व्हिसेस 2022 मध्ये 62 वा क्रमांक मिळवून तिच्या पालकांना आणि जिल्ह्याला अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे. वैष्णवीने तिचे शालेय शिक्षण गोंडा येथून पूर्ण केले आहे. UPSC मध्ये तिचा हा चौथा प्रयत्न होता; यामध्ये तिला यश मिळाले आहे.
आई-वडील, शिक्षक आणि मित्र-मंडळींना दिले यशाचे श्रेय
वैष्णवी सांगते की; “लहानपणीच मला खरी प्रेरणा वर्तमानपत्र वाचनातून मिळाली. तुमचे ध्येय निश्चित झाले असेल आणि तुमच्याकडे उत्तम सपोर्ट सिस्टीम असेल तर मेहनत (UPSC Success Story) करायला घाबरू नका.” या यशाचे श्रेय वैष्णवीने तिचे आई-वडील, शिक्षक आणि मित्रमंडळींना दिले आहे. शालेय शिक्षण गावातून पूर्ण केल्यानंतर वैष्णवीने दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. तिने 2022 मध्ये झालेल्या सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत संपूर्ण भारतातून 62 वी रॅंक मिळवली आहे.
वर्तमान पत्रांनी दिशा दिली
“लहानपणी माझ्या वडिलांनी मला वर्तमानपत्र वाचण्याची सवय लावली. जेव्हा तुम्ही वृत्तपत्र उघडता तेव्हा तुम्हाला बहुतेक स्थानिक बातम्या दिसतात. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी, एस. पी. या अधिकाऱ्यांनी केलेल्या कामगिरीबाबत छापून यायचे. वारंवार अशा बातम्या वाचनात येत असल्याने माझेही मन याचअधिकारी (UPSC Success Story) होण्याच्या दिशेने धाव घेवू लागले. मग जेव्हा आपण मोठे होतो आणि आपण सर्व गोष्टी जवळून पाहतो तेव्हा आपल्याला असे वाटते की होय आपल्याकडे एक सपोर्ट सिस्टम आहे, तेव्हाच आपण कठोर परिश्रम करता आणि प्रशासनाचा एक भाग बनण्याचा प्रयत्न करता. सुदैवाने माझ्याकडे एक सपोर्ट सिस्टम देखील आहे; ते म्हणजे माझे आई-वडील, माझी बहीण, माझे माहेरचे कुटुंब, माझे सर्व शिक्षक, माझे सर्व मित्र पहिल्यापासून माझ्यासोबत होते आणि आहेत.”
मुलाखतीतील एक प्रश्न आणि आत्मविश्वासाने दिले उत्तर
“मुलाखतीमध्ये मला अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यात एक अतिशय चांगला वस्तुस्थितीशी निगडीत प्रश्न होता तो म्हणजे असा की, “तुम्ही जिल्हा दंडाधिकारी म्हणून पदभार सांभाळू लागला आणि (UPSC Success Story) तुमच्या आधीच्या जिल्हाधिकाऱ्याचा तिथल्या एस. पी.शी फारसा चांगला संबंध नव्हता, आशा परिस्थितीत तुम्ही काय कराल?” या प्रशांवर मी असे उत्तर दिले की, “मी त्याच्यासोबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून नवीन सुरुवात करेन आणि समाजातील शेवटच्या माणसाचे प्रश्न सोडवण्यास आत्मविश्वासाने काम करेन.”
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com