करिअरनामा ऑनलाईन । आपण मोठेपणी सरकारी (UPSC Success Story) अधिकारी व्हायचं हे तृप्ती यांनी शाळेत शिकत असतानाच ठरवलं होतं. पण हे स्वप्न पाहत असताना आपला प्रवास किती खडतर असेल याची तिला कल्पनाही आली नव्हती. UPSC परीक्षा देणारे अनेक इच्छुक उमेदवार एक-दोनदा अपयश आल्यानंतर परीक्षेतून माघार घेतात. पण तृप्ती कऱ्हांस यांनी UPSC पास होण्याचा ध्यासच घेतला होता. UPSC पलिकडे त्या कशाचाही विचार करत नव्हत्या. तृप्ती कल्हांस या उत्तर प्रदेशातील गोंडा येथील रहिवासी आहेत. आज आपण त्यांच्या करिअरमधील चढ उताराविषयी जाणून घेणार आहोत….
एखादी गोष्ट मिळवण्याची जिद्द, इच्छा किंवा तळमळ असेल तर ती मिळवण्यासाठी तुम्ही काहीही करू शकता. तृप्ती कल्हांसच्या बाबतीतही असेच घडले. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन IAS अधिकारीच व्हायचं असं तिनं ठरवलं होतं. यासाठी ती कठोर परिश्रम घेण्यास तयार होती. तिचा प्रवास सोपा नव्हता पण ती अडचणींना घाबरत नव्हती. तिने प्रत्येक आव्हानाला तोंड देत अखेर आपले गंतव्यस्थान गाठले. IAS तृप्ती कल्हांसची UPSC यशोगाथा वाचा…
कॉलेज लाइफ एन्जॉय केल्यानंतर सुरु केली UPSC ची तयारी
तृप्ती कल्हांस यांनी उत्तर प्रदेशातील गोंडा येथील शाळेतून शिक्षण घेतलं आहे. शालेय जीवनापासून त्यांनी आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. 3 वर्षांची कॉलेज लाइफ (UPSC Success Story) एन्जॉय केल्यानंतर त्यांनी UPSC CSE परीक्षेची तयारी सुरु केली. महाविद्यालयीन जीवन आयुष्यात एकदाच येते यावर त्यांचा विश्वास होता आणि त्यामुळेच यूपीएससी परीक्षेच्या तयारीचा ताण त्यांना इतक्यात घ्यायचा नव्हता.
स्वप्नांचा चुराडा होताना पाहिलं (UPSC Success Story)
12 वी पास झाल्यानंतर तृप्ती कल्हांस दिल्लीत आल्या. 2017 मध्ये, त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या कमला नेहरू कॉलेजमधून बी.कॉम ऑनर्स पदवी घेतली. यानंतर त्यांनी सेल्फ स्टडी करून UPSC नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. त्यांना पहिल्या तीन प्रयत्नात UPSC प्रिलिम्स परीक्षाही पास करता आली नाही. यामुळे उदासिनता आल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ लागला. आपल्या बालपणीच्या स्वप्नांचा चुराडा होण्याचा गंभीर अनुभव त्यांना येत होता.
अभ्यासातून घेतला 1 वर्षाचा ब्रेक
सलग तीन वर्षे कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय यूपीएससी परीक्षेची तयारी करणे ही गोष्ट खरंतर खूप मोठी होती. पूर्व परीक्षा पास करू न शकल्याने तृप्ती यांना आत्मसंशयाने घेरले होते. यावेळी कुटुंबीय आणि नातेवाईकांनीही त्यांच्यावर दबाव आणण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांच्या तयारीवर पूर्वीपेक्षा जास्त परिणाम होत होता. त्यानंतर चौथ्या प्रयत्नात अपयशी ठरल्यानंतर त्यांनी २०२२ मध्ये परीक्षेच्या चक्रातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्यासाठी खूप महत्वाचा होता.
वर्षातच आयुष्य बदललं
एका वर्षाच्या या ब्रेकमध्ये तृप्ती यांना त्यांचा गमावलेला आत्मविश्वास परत मिळाला. या एक वर्षात UPSC परीक्षा समजून घेण्यासाठी त्यांना वेळ मिळाला आणि शेवटी त्यांना मेहनतीचे (UPSC Success Story) आणि त्यागाचे फळ मिळाले. त्या UPSC CSE 2023 परीक्षेत ऑल इंडिया रँक 199 मिळवून यशस्वी झाल्या. तृप्ती आपले विचार व्यक्त करताना सांगतात; “आयुष्यात जेव्हा चांगले दिवस येतात, तेव्हा समजते की देवाने आपल्याला इतका त्रास का दिला.मी सर्व UPSC इच्छुकांना सांगू इच्छिते की, सर्वांनी UPSC ची किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेची शांतपणे आणि आत्मविश्वासाने तयारी करावी; यश मिळतं हे नक्की.”
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com