UPSC Success Story : छंद जोपासत केला अभ्यास; वडिलांच्या निधनानंतर त्यांचं स्वप्न पूर्ण केलं; वाचा एक प्रेरणादायी प्रवास

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । शालेय जीवनापासूनच Civil Serviceकडे आकर्षिल्या गेलेल्या (UPSC Success Story) तन्मयीने पदव्युत्तर शिक्षणांनंतर निश्चयाने UPSC साठी तयारी सुरू केली. 2021 मध्ये UPSC ने घेतलेल्या परीक्षेत पिंपरी-चिंचवडच्या तन्मयी देसाईने बाजी मारली आहे. तन्मयीने देशात 224 वा क्रमांक मिळवला आहे. दुसऱ्या प्रयत्नात तीने हे यश संपादन केलंय. दिनचर्येंत फारसा काही बदल न करता, सर्व गोष्टींना प्राधान्य देत तन्मयीने या यशाला गवसणी घातली आहे. पाहूया तिच्या UPSC तील प्रवासाविषयी…

“मिळालेलं यश सुद्धा मोठं आहे”

यूपीएससी परीक्षेत मिळालेल्या यशाबद्दल बोलताना तन्मयी म्हणाली, “मिळालेले हे यश नक्कीच मोठे आहे, विश्वास बसत नाही, पण खूप चांगलं वाटतंय;” “आजच्या यशाबद्दल खूप छान वाटतंय. रॅंक मोठा मिळावा असे वाटत होते. पण हे मिळालेले यश सुद्धा मोठं आहे. तरीही सर्विस अपग्रेडेशनसाठी मी प्रयत्न करणार आहे.” असं तन्मयी आवर्जून नमूद केलं. तन्मयीने याचं सर्व श्रेय मार्गदर्शक इशान काब्रा आणि कुटुंबियांना दिले. आता सेवेत दाखल झाल्यावर समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचं तिचं ध्येय आहे.

दिवंगत वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले (UPSC Success Story)

तन्मयीच्या वडिलांचं निधन झालंय. ती IAS व्हावी अशी मोठी इच्छा त्यांचीच होती. ती पूर्ण झाल्याने तिच्या आईचा आनंद गगनात मावेनासा झालाय. पहिल्या परीक्षेत अपयश आल्यानंतर दुसऱ्या परीक्षेच्या मध्यात तीने नोकरी सोडली. या कठीण काळात कुटुंबियांनी तन्मयीवर कोणतंही प्रेशर ठेवलं नाही. ती युपीएससी परीक्षेत यश मिळवेल असा ठाम विश्वास कुटुंबियांना होता अन तो तीने सार्थ ठरवला.

प्रोफेसर म्हणून केली नोकरी

दहावीत उत्तम गुण असूनही तन्मयीने आर्ट्सकडे वळायचे ठरवले. सायकोलॉजीमध्ये तिला आवड निर्माण झाली आणि पुढे पदवीचे शिक्षण फर्ग्यूसन आणि पदव्युत्तर शिक्षण क्राइस्ट बंगळुरू येथून पूर्ण केले. त्यानंतर काही काळ विश्वकर्मा इंस्टिट्यूट येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून नोकरी केली. शालेय जीवनापासूनच सीव्हिल सर्विसकडे आकर्षिल्या गेलेल्या तन्मयीने पदव्युत्तर शिक्षणांनंतर ठरवूनच UPSC साठी तयारी सुरू केली.

UPSC च्या तयारीसाठी सोडली नोकरी

तन्मयी परीक्षेच्या आधी आठ महिन्यापासून फक्त स्पर्धा परीक्षांचाच अभ्यास करत होती. पण दहावीत असतानाच तीने IAS व्हायचं ध्येय बाळागलं होतं. (UPSC Success Story) मानसशास्त्रची पदवी घेतल्यानंतर, शिक्षक म्हणून नोकरी ही केली. या दरम्यान तन्मयीचा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरूच होता. 2020 मध्ये नोकरीला असतानाच पहिल्यांदा UPSC ची परीक्षा दिली. मात्र यात ती अपयशी ठरली. मग तीने पुन्हा जोमाने तयारी केली अन् 2021 मध्ये ती परीक्षेला सामोरी गेली. त्यात पास होताच पुढच्या तयारीसाठी तिने नोकरी सोडली.

पहाटे साडे 3 वाजता सुरु व्हायचा दिवस

तन्मयीने इथपर्यंत पोहचण्यासाठी मोठे परिश्रम घेतले. ती दिवसाची सुरुवात पहाटे साडे 3 वाजता करायची. मात्र 7 ते 8 तासच ती अभ्यासाला वेळ द्यायची. तर उर्वरित वेळेत व्यायाम, डान्स करत सर्व छंद जोपसायची. कुटुंबीय अन् मित्र मैत्रिणींशी मनमोकळ्या गप्पा मारायची. पुरेशी झोप ही घ्यायची. असा सर्व समतोल राखत तन्मयीने आयपीएस होण्याचं स्वप्न सत्यात उतरवलं.

आनंदाला उधाण

निकालाच्याच प्रतीक्षेत असताना अचानक आनंदाची बातमी येऊन धडकली. (UPSC Success Story) कुटुंबात कोणाला विश्वास बसत नव्हता म्हणून प्रत्यक्षात वेबसाईटवर जाऊन तन्मयीने स्वतः निकाल पाहिला, तेव्हा सर्वांना खात्री पटली. 224 व्या नंबरावर तन्मयीचं नाव पाहताच कुटुंबियांच्या आनंदाला पारावर उरला नाही. एकमेकांना पेढे भरवत कुटुंबियांनी ही आनंदाची बातमी पै- पाहुण्यांना कळवली.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com