करिअरनामा ऑनलाईन । ही तडफदार महिला 2008 च्या बॅचची (UPSC Success Story) IAS अधिकारी आहे. देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाणारी UPSC परीक्षा तिने अवघ्या दुसऱ्या प्रयत्नात पास केली आहे आणि ते ही नोकरी करत असताना. परीक्षेच्या पहिल्या प्रयत्नात तिला सामान्य अध्ययन विषयात कमी मार्क मिळाले. यामुळे तिची अंतिम निवड होऊ शकली नाही. पण तिने थांबायचं नाव घेतलं नाही. अभ्यासामध्ये सातत्य ठेवून तिने आपला प्रवास सुरुच ठेवला. महिला अधिकाऱ्याची ही कहाणी खूपच प्रेरणादायी आहे.
नोकरीसह UPSC सारखी परीक्षा उत्तीर्ण करणे तसे सोपे नाही. पण आज आपण अशा एका महिला अधिकाऱ्याबद्दल जाणून घेणार आहोत जिने नोकरीसोबत अभ्यास करुन UPSC परीक्षा (UPSC Success Story) पास केली आहे. सोनल गोयल असं या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. सोनलने दुसऱ्या प्रयत्नात ही परीक्षा पास केली आहे. अलीकडेच तिने सोशल मीडियावर तिच्या मुख्य परीक्षेची मार्कशीट शेअर केली; जे पाहून सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. IAS सोनल गोयल (IAS Sonal Goel) देखील अशाच सक्षम महिला अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. त्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर सारख्या सोशल मीडिया साइटवर देखील खूप सक्रिय आहेत.
मला नॉस्टॅल्जिक वाटते (UPSC Success Story)
सोनल (IAS Sonal Goel) 2008 च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत. देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाणारी UPSC परीक्षा त्यांनी अवघ्या दुसऱ्या प्रयत्नात पास केली. याबद्दल माहिती देताना सोनल सांगते; “जेव्हाही मी माझी UPSC सिव्हिल सर्व्हिसेस 2007 ची मुख्य मार्कशीट पाहते तेव्हा मला नॉस्टॅल्जिक वाटते. ही मार्कशीट पाहून मला परीक्षा, मी केलेले प्रयत्न आणि मिळवलेले यश आठवते.” UPSC च्या पहिल्या प्रयत्नात मला सामान्य अध्ययन विषयात कमी गुण मिळाले होते. यामुळे माझी वड होऊ शकली नाही; पण मी हार मानली नाही. शेवटी मी यश मिळवलेच.”
LLB, पार्ट टाईम नोकरी आणि UPSC चा अभ्यास
सोनल गोयलचा जन्म हरियाणातील पानिपत येथे झाला (UPSC Success Story) आणि शिक्षण दिल्लीत घेतले. IAS अधिकारी सोनल गोयल म्हणतात, की “मी दिल्ली विद्यापीठातून LLB करत असताना आणि सीएस – कंपनी सेक्रेटरी म्हणून पार्ट टाईम नोकरी करत असताना परीक्षेची तयारी केली आहे. मी घेतलेले परिश्रम आणि दृढनिश्चयाचा परिणाम म्हणजे मी केवळ परीक्षा पास झाले नाही तर मी ज्या विषयाच्या तयारीसाठी वेळ दिला त्यामध्ये मी जास्त मार्क मिळवले.”
पास होण्यासाठी 2 प्रयत्न पुरेसे (UPSC Success Story)
नागरी सेवा परीक्षा देणाऱ्या तून उमेदवारांना सल्ला देताना सोनल म्हणतात; “नागरी सेवा परीक्षेसाठी दोन प्रयत्न पुरेसे आहेत. जर तुम्ही पहिल्या प्रयत्नात अयशस्वी झालात तर तुम्हाला तुमच्या चुका समजतात, ज्या दुस-या प्रयत्नात सुधारल्या जाऊ शकतात ज्यामुळे दुसऱ्या प्रयत्नात तुम्हाला यश मिळवणे सोपे होवू शकते. तरुण उमेदवारांकडे ‘प्लॅन बी’ तयार असावा. हा विचार करुन मी माझ्या वडिलांच्या सांगण्यावरून एलएलबी केले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com