करिअरनामा ऑनलाईन । तुम्हाला माहितच आहे की UPSC परीक्षेची (UPSC Success Story) तयारी म्हणावी तितकी सोपी नाही. असे काही उमेदवार आहेत जे पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरल्यानंतर आधीपेक्षा जास्त मेहनत करतात आणि दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी होतात. यापैकी एक उदाहरण आहे IAS स्मिता सभरवाल यांचं. UPSC परीक्षेच्या केवळ दुसऱ्या प्रयत्नात संपूर्ण भारतातून 4था क्रमांक मिळवून त्यांनी इतिहास रचला आहे.
कोण आहेत IAS स्मिता सभरवाल
IAS स्मिता यांनी त्यांचे शालेय शिक्षण सेंट अॅन, मरेडपल्ली, हैदराबाद येथून पूर्ण केले. इयत्ता 12वी मध्ये त्यांनी परिक्षेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. यानंतर त्यांनी सेंट फ्रान्सिस डिग्री कॉलेज फॉर वुमनमधून बी.कॉम केले.
23 व्या वर्षी क्रॅक केली UPSC
बी.कॉम पूर्ण केल्यानंतर स्मिता यांनी UPSC देण्याचा निर्णय घेतला. परीक्षेच्या (UPSC Success Story) पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश आले मात्र दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी बाजी मारली. स्मितायांना पहिल्या प्रयत्नात पूर्व परीक्षा पास होता आली नव्हती; पण दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी यश मिळवले. त्या केवळ पास झाल्या नाहीत तर त्यांनी संपूर्ण भारतातून 4 था क्रमांक मिळवला आहे. यावेळी त्यांचं वय फक्त 23 वर्ष होतं.
सोशल मीडियावर असतात सक्रिय
आयएएस स्मिता सभरवाल या सर्वात सक्रिय नागरी सेवा अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. त्यांना सोशल मीडियावर खूप पसंत केले जाते. चार लाखांहून अधिक लोक त्यांना ट्विटरवर फॉलो करतात. त्या ट्विटरवर खूप सक्रिय आहेत. महिलांशी संबंधित समस्यांवर त्या पोस्ट शेअर करत असतात. ट्विटर व्यतिरिक्त त्यांना (UPSC Success Story) इन्स्टाग्रामवरही लाइक केले जाते. त्या अनेकदा त्यांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. तसेच त्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाबद्दल पोस्ट शेअर करत असतात. स्मिता दररोज सहा तास अभ्यास करायच्या तसेच ताणतणाव कमी करण्यासाठी त्या अनेक उपक्रमांमध्ये सहभागी होत असत.
स्वतःला म्हणवतात आर्मी ब्रॅट (UPSC Success Story)
मूळच्या दार्जिलिंगच्या असलेल्या IAS स्मिता सभरवाल स्वतःला आर्मी ब्रॅट म्हणवतात. स्मिता यांचे वडील कर्नल पी. के. दास हे निवृत्त लष्करी अधिकारी आहेत. देशसेवेचे धडे त्यांना घरातूनच मिळाले आहेत. प्रशासकीय सेवेत त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्या कर्तव्यदक्ष IAS अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com