करिअरनामा ऑनलाईन । ध्येय गाठण्याची इच्छा आणि जिद्द असेल तर तिथपर्यंत (UPSC Success Story) पोहोचणे अशक्य नाही. आपल्या आजूबाजूच्या असंख्य लोकांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर यश मिळवले आहे. या देशातील कोट्यवधी तरुण दरवर्षी आपले स्वप्न साकार करण्यासाठी कठोर परिश्रम करत असतात. यापैकी लाखो तरुण UPSC च्या तयारीत गुंतलेले असतात. दरवर्षी यातील शेकडो जण त्यांचे स्वप्न साकार करतात आणि परीक्षा उत्तीर्ण करतात. तथापि, यश मिळविणे हे प्रत्येकासाठी सोपे नाही. यासाठी अनेकांना खूप संघर्ष करावा लागतो. अशा यशस्वी उमेदवारांची कहाणी आम्ही आमच्या यशोगाथेतून घेऊन आलो आहोत. आपण अशा अनेक यशस्वी कहाण्या वाचकांपर्यंत पोहोचवत असतो.आज आपण IAS श्रीधन्य सुरेश यांची प्रेरणादायी कहाणी जाणून घेणार आहोत.
श्रीधन्याचे आई-वडील मनरेगाचे मजूर (UPSC Success Story)
श्रीधन्या सुरेश या मूळच्या केरळमधील वायनाड जिल्ह्यातील आहेत. हा परिसर अनेक बाबतीत मागासलेला आहे. श्रीधन्यला तीन भावंडे आहेत. श्रीधन्या या आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील रोजंदारी मजूर असून बाजारात माल विकायचे. त्याचबरोबर त्यांची आईही मनरेगा अंतर्गत काम करायची. आर्थिक अडचणींचा सामना करत त्यांचे बालपण गेले आहे.
सरकारी शाळेतून शिक्षण आणि क्लर्कची नोकरी
श्रीधन्या सुरेश यांनी त्यांचे शालेय शिक्षण राज्य सरकारी शाळेतून पूर्ण केले आहे. शालेय शिक्षणानंतर त्यांनी टी जोसेफ कॉलेजमधून प्राणीशास्त्रात पदवी घेऊन पुढील शिक्षण घेतले. यानंतर (UPSC Success Story) त्यांनी कालिकत विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. पदव्युत्तर शिक्षणानंतर श्रीधन्य यांनी राज्याच्या अनुसूचित जमाती विकास विभागात लिपिक म्हणूनही काम केले.
2018 मध्ये UPSC देवून मिळवली AIR Rank 410
श्रीधन्य सुरेश यांनी 2016 आणि 2017 मध्ये UPSC परीक्षा दिली होती. मात्र, या दोन्ही परीक्षेत त्या अपयशी ठरल्या. इथेही त्यांनी हिंमत हारली नाही. कठोर परिश्रम (UPSC Success Story) आणि जिद्द याच्या जोरावर त्यांनी 2018 मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि संपूर्ण भारतात 410 वा क्रमांक मिळवून त्या IAS झाल्या. त्यांनी स्वत:च्या परिवारासोबतच आपल्या संपूर्ण समाजाचे नाव उंचावले होते.
मुलाखतीसाठी मित्रांकडून घेतले पैसे
श्रीधन्या सुरेश यांची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट होती की तिच्याकडे UPSCच्या मुलाखतीला जाण्यासाठीही पैसे नव्हते. मात्र, हा प्रकार त्यांच्या मित्रांना कळताच त्यांनी (UPSC Success Story) पैसे गोळा करून श्रीधन्या यांना मदत केली. केरळमधील त्या पहिल्या आदिवासी IAS आहेत. श्रीधन्य यांची यशोगाथा आपल्या संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे. जिद्द आणि परिश्रमासमोर अडचणी नेहमी हार मानतात हे श्रीधन्य यांच्या कथेतून शिकायला मिळते.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com