करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल आणि यश मिळत नसल्याने (UPSC Success Story) निराश झाले असाल तर यूपीएससी परीक्षा पास झालेल्या सम्यक जैनची गोष्ट तुम्हाला नक्कीच प्रेरणा देऊ शकते. डोळ्याने दिसत नसूनही सम्यकने UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्याच्या या प्रवासात त्याच्या आईने दिलेली साथ अनमोल आहे. सम्यक अंध असल्याने त्याचे परीक्षेचे पेपर त्याची आई लिहायची. पाहूया कसा होता सम्यकचा UPSC चा प्रवास…
स्वप्न पाहण्यासाठी आणि ती पूर्ण करण्यासाठी डोळ्यांची नव्हे तर धैर्य आणि इच्छाशक्तीची गरज असते हे सिद्ध केले आहे दिल्लीच्या सम्यक जैन याने. सम्यक जैन डोळ्यांनी पाहू शकत नाही, परंतु त्याने IAS अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण देखील केले. यूपीएससी नागरी सेवा परीक्षा 2021 च्या निकालात त्याने 7 वा क्रमांक मिळवून टॉप-10 मध्ये स्थान मिळवले आहे.
दुसऱ्या प्रयत्नात मिळवला AIR-7 Rank (UPSC Success Story)
सम्यकने 2020 मध्ये पहिल्यांदा UPSC ची परीक्षा दिली होती. मात्र यामध्ये तो अयशस्वी ठरला होता. पदरी अपयश आले तरी त्याने प्रयत्न थांबवले नाहीत. सातत्याने केलेल्या प्रयत्नामुळे त्याने दुसऱ्याच प्रयत्नात UPSC ची परीक्षा उत्तीर्ण केली. यासोबतच त्याने या परीक्षेत एक अंकी रँकही मिळवला आहे. सम्यकने (UPSC Success Story) नागरी सेवा परीक्षेत संपूर्ण भारतातून ७ वा क्रमांक मिळवला आहे.
पेपर लिहण्यासाठी रायटरची घेतली मदत
सम्यकसाठी UPSC चा प्रवास इतका सोपा नव्हता. तो PWD श्रेणीतून आला आहे, कारण तो (UPSC Success Story) दृष्टीहीन आहे. परीक्षा लिहिण्यासाठी त्याने एका राइटरची मदत घेतली. त्याच्या आईने UPSC च्या परीक्षेत प्रिलिम्सचा पेपर लिहिला होता. तर मुख्य परीक्षेत त्याच्या एका मित्राने राइटर म्हणून पेपर लिहला होता.
सोपा नव्हता प्रवास… पण कुटुंबाने दिली साथ
सम्यक जैनसाठी हा प्रवास सोपा नव्हता. त्याने जे यश मिळवले त्यामध्ये त्याच्या कुटूंबाचे योगदान महत्वाचे आहे. कारण त्याच्यासोबत त्याचे संपूर्ण कुटुंब परीक्षेच्या तयारीचा एक भाग बनले होते. सम्यकला डोळ्यांनी (UPSC Success Story) दिसत नाही त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा अभ्यासक्रम वाचून पूर्ण करून दिला आणि सम्यकने हे सर्व स्मरणात ठेवण्याचे काम केले. त्याची आई वंदना जैन यांनी रायटर म्हणून त्याचा पेपर लिहिला. म्हणजेच सम्यकने प्रश्नांची उत्तरे दिली आणि आईने त्याची उत्तरे लिहिली. सम्यकचे वडील एअर इंडियात काम करतात त्यामुळे त्याचे मामा त्याला पेपर देण्यासाठी परीक्षा केंद्रावर घेऊन जात होते.
वयाच्या 20 व्या वर्षी गेली दृष्टी
सम्यकला बालपणी दोन्ही डोळ्यांनी चांगले दिसत होते. त्याने शालेय अभ्यास व्यवस्थित केला आणि नंतर दिल्ली विद्यापीठाच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. सम्यकने मुंबईतून शालेय शिक्षण आणि दिल्ली (UPSC Success Story) विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. पण हळूहळू त्याची दृष्टी कमी होऊ लागली. वयाच्या 20 वर्षांनंतर हळूहळू त्याची दृष्टी कमी होऊ लागली. सम्यकला वयाच्या 23 ते 24 व्या वर्षी दोन्ही डोळ्यांनी दिसणे पूर्णपणे बंद झाले. एवढे संकट कोसळूनही सम्यक आव्हानांना घाबरला नाही. त्याने अभ्यास सोडला नाही. ग्रॅज्युएशननंतर त्याने जेएनयूमधून इंटरनॅशनल रिलेशनमध्ये पदवी मिळवली.
UPSC देणाऱ्यांना सम्यकच्या Tips
1. शरीराच्या अपंगत्वाला तुमच्या मनावर प्रभुत्व मिळवू देऊ नका. कठोर परिश्रम करा आणि यश मिळवा. जे पाहू शकत नाहीत, त्यांनी निराश होऊ नये, ते आयुष्यात खूप काही करू शकतात. (UPSC Success Story)
2. जे विद्यार्थी पाहू शकत नाहीत त्यांच्यासाठीही सर्व प्रकारची पुस्तके उपलब्ध आहेत. ही पुस्तके ऑनलाइनही उपलब्ध आहेत. ही पुस्तके अगदी मोफत आहेत.
3. आत्मविश्वासाची कमतरता भासू देऊ नका. कधीही नकारात्मक विचार करू नका.
4. तुम्ही जे काही वाचता ते लक्षात ठेवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी ते पुन्हा एकदा नक्की वाचा.
सम्यक जैन दिल्लीतील रोहिणी येथे राहतात. ऐन उमेदीच्या काळात सम्यकची दृष्टी कमी झाली होती. असे असूनही त्याचा उत्साह काही कमी झाला नाही. त्याने आपला अभ्यास सुरूच ठेवला. सम्यकने दिल्ली विद्यापीठाच्या SOL मधून इंग्रजी ऑनर्समध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्याने आयआयएमसीमधून इंग्रजी पत्रकारितेचा अभ्यासक्रम केला. त्यानंतर त्याने जेएनयूमधून आंतरराष्ट्रीय संबंधात एम. ए. ची पदवी मिळवली आहे.
“सिव्हिल सर्व्हिसेसमधून लोकांची मदत करायची आहे”
सम्यक जैन यांना नागरी सेवेच्या माध्यमातून लोकांना मदत करायची आहे. सम्यक सांगतो कि; “जनतेच्या हितासाठी अनेक योजना तयार होत असतात. अनेक धोरणे सरकार जाहीर करत असते. पण तळागाळातील (UPSC Success Story) लोकांपर्यंत या योजना पोहचत नाहीत. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सरकारी धोरणे राबवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर मुलींचे शिक्षण आणि महिला सबलीकरणासाठी काम करण्याचा माझा मानस आहे.”
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com