करिअरनामा ऑनलाईन । केरळ केडरच्या IAS रेणू राज यांनी पहिल्याच (UPSC Success Story) प्रयत्नात UPSC परीक्षेत संपूर्ण भारतात दूसरा क्रमांक पटकावला आहे. देशातील सर्वात कार्यक्षम IAS अधिकाऱ्यांच्या यादीत डॉ. रेणू राज (IAS Renu Raj) यांचे नाव घेतले जाते. त्यांचे वडील निवृत्त बस कंडक्टर तर आई गृहिणी आहे. रेणू यांच्या दोन्ही बहिणीही व्यवसायाने डॉक्टर आहेत. IAS रेणू राज यांनी UPSC परीक्षेची तयारी करताना एनसीईआरटीच्या (NCERT) पुस्तकांची मदत घेतली. विशेष म्हणजे अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत त्यांनी पहिल्याच प्रयत्नात संपूर्ण देशात टॉप केलं आहे.
देशातील प्रत्येक तरुणाचे आयएएस परीक्षा उत्तीर्ण होण्याचे स्वप्न असते. या परीक्षेला बसण्यासाठी लाखो उमेदवार अर्ज करतात. परंतु त्यापैकी मोजकेच उमेदवार परीक्षा पास होऊ शकतात. पण काही उमेदवार असे आहेत जे पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा पास होतात; त्यापैकी एक आहेत IAS रेणू राज.
MBBS नंतर UPSC
महिला आयएएस अधिकारी रेणू राज यांची कहाणी खूप प्रेरणादायी आहे. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात द्वितीय क्रमांक मिळवून आपल्या स्वप्नाला पंख दिले. आयएएस होण्यापूर्वी त्या डॉक्टर होत्या. रेणू राज या केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील आहेत. त्यांचे शालेय शिक्षण केरळमधून झाले. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला.
पहिल्याच प्रयत्नात मिळवले मोठे यश (UPSC Success Story)
डॉक्टर झाल्यानंतरही रेणू राज यांना आयएएस व्हायचे होते. ज्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले आणि UPSC परीक्षा देखील उत्तीर्ण केली. त्या दररोज 6 ते 7 तास अभ्यास करायच्या. आयएएस अधिकारी रेणू यांनी अभ्यासासाठी NCERT च्या पुस्तकांची मदत घेतली. सन 2014 मध्ये द्वितीय क्रमांक मिळवून त्यांनी आपल्या कुटुंबाची शान वाढवली. पहिल्याच प्रयत्नात मोठे यश मिळविल्याबद्दल त्यांचे खूप कौतुक झाले.
लोकांसाठी काम करण्याची इच्छा
लोकांसाठी अधिकाधिक काम करणे हा रेणू यांचा मुख्य उद्देश होता. डॉक्टर झाल्यानंतर आपण रुग्णसेवा करून लोकांची मदत करू शकतो; असा त्यांनी विचार केला आणि त्या आधी डॉक्टर बनल्या. पुढे जावून त्यांनी असा विचार केला की जर आपण संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा पास केली आणि अधिकारी झालो (UPSC Success Story) तर आपण मोठ्या संख्येने लोकांना मदत करू शकू. या विचाराने त्यांनी UPSC परीक्षा देण्याचं ठरवलं. डॉक्टर म्हणून जबाबदार भूमीका पार पाडत असताना त्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करत नव्हत्या. रेणू आपले काम संपवून दररोज तीन ते सहा तास अभ्यासासाठी वेळ देत असत. हे वेळापत्रक त्यांनी 6 ते 7 महिने पाळले. इतकी कठोर मेहनत घेतल्यामुळे त्या IAS होवू शकल्या.
UPSC देणाऱ्यांसाठी सांगितल्या खास टिप्स
IAS झाल्यानंतर रेणू राज यांनी UPSCची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी काही टिप्स शेअर केल्या आहेत. त्यांनी सांगितले की, ” मी डॉक्टर म्हणून काम करत असताना दररोज 3 ते 6 तास अभ्यास करायचे. हे वेळापत्रक मी 6 ते 7 महिने पाळले. अभ्यास करताना मी NCERT च्या पुस्तकांचा अभ्यास केला; याचा मला अभ्यासात खूप फायदा झाला आहे.” एप्रिल २०२२ मध्ये रेणू राज यांनी आयएएस अधिकारी श्रीराम वेंकटरामन (IAS Sriram Venkitaraman) यांच्याशी लग्न केले. या जोडप्याने त्यांचे लग्न अगदी साधेपणाने केले आहे. श्रीराम वेंकटरामन यांनी सुध्दा 2012 मध्ये झालेल्या UPSC परीक्षेत दुसरा क्रमांक मिळवला आणि ते देशात टॉपर ठरले आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com