करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर एखाद्या आव्हानासमोर (UPSC Success Story) पाहाडासारखे उभे राहिला तर कोणतीही वाईट शक्ती तुम्हाला हरवू शकत नाही. याचा प्रत्यय येतो आयएएस ऑफिसर राज कमल यादव यांच्याकडे पाहिल्यानंतर. आज आम्ही तुम्हाला एका IAS अधिकाऱ्याची कहाणी सांगणार आहोत ज्यांनी केवळ आपले भविष्य स्थिर केले नाही; तर आपल्या कारकिर्दीत उत्कृष्ट काम करून हजारो लोकांचे जीवनमान देखील उंचावले आहे. राजकमल यादव (Rajkamal Yadav IAS) यांनी UPSC परिक्षेत संपूर्ण भारतातून 21 व्या क्रमांकाने हे यश मिळवले आहे. विशेष म्हणजे त्यांनी पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा क्रॅक केली आहे. त्यांची कारकिर्द अनेकांसाठी जीवनदान ठरली आहे; पाहूया सविस्तर….
शालेय शिक्षण गावातूनच पूर्ण केले
राजकमल यादव यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद जिल्ह्यातील शिकोहाबाद येथे झाला. त्यांनी गावातूनच इयत्ता 6 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. पुढील शिक्षणासाठी ते लखनौ सैनिकी शाळेत गेले. मद्रास पशुवैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी पुढील शिक्षण घेतले. राजकमल हे एक चांगले क्रिकेटपटू आहेत. याशिवाय बॉडी बिल्डिंगचा शौक पूर्ण करण्यासाठी ते जिममध्ये तासनतास घाम गाळतात.
पदवीचे शिक्षण घेताना केली UPSC ची तयारी
राजकमल हे 2013 बॅचचे IAS (IAS) अधिकारी आहेत. ग्रॅज्युएशनच्या काळातच त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली. त्यांच्या अथक परिश्रमामुळे त्यांनी पहिल्याच प्रयत्नात हे यश संपादन केले आहे. कॉलेजमधून घरी आल्यानंतर लगेचच ते अभ्यासाला बसायचे. सुमारे 12 ते 15 महिने त्यांची UPSC ची तयारी सुरु होती.
असा आहे शैक्षणिक प्रवास (UPSC Success Story)
बारावीनंतर राजकमल एनडीएची (NDA) लेखी परीक्षा उत्तीर्ण झाले होते, पण मुलाखतीत नापास झाले, यानंतर ते प्री-मेडिकल टेस्टमध्येही नापास झाले. ऑल इंडिया प्री-व्हेटर्नरी टेस्ट (एआयपीव्हीटी) मध्ये चांगली रँक आणि शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर त्यांनी मद्रास व्हेटर्नरी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.
राजकमल यादव (Rajkamal Yadav IAS) यांना सीडीएस (CDC) म्हणजेच संयुक्त संरक्षण सेवेद्वारे सैन्यात भरती व्हायचे होते. पण अभ्यासादरम्यान त्यांना कळले, की पशुवैद्यकीयद्वारे देखील सैन्यात नोकरी मिळू शकते. या दोन्ही परीक्षांच्या तयारीसोबतच त्यांनी यूपीएससी परीक्षेवरही लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. त्यानंतर विद्यार्थी विनिमय कार्यक्रमांतर्गत विद्यापीठाने त्यांना अमेरिकेतील मिशिगन राज्य विद्यापीठात पाठवले.
नाईट ड्युटी करत केली UPSC ची तयारी
अमेरिकेतील वास्तव्यादरम्यान त्यांना संशोधन आणि नोकरीच्या अनेक ऑफर मिळाल्या. पण देशाची सेवा करण्याचे स्वप्न त्यांना भारतात परत घेवून आले. त्यानंतर गुरुग्राममधील रुग्णालयात पशु वैद्यकीय डॉक्टर म्हणून ते नाईट ड्युटी करू लागले आणि दिवसा यूपीएससीचा अभ्यास सुरु ठेवला. दरम्यान, त्यांची आयसीआर ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF) मध्ये निवड झाली. 2013 मध्ये, त्यांनी केवळ स्व-अभ्यासातून 21 वा क्रमांक मिळवून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि डॉक्टरमधून ते आयएएस (IAS) अधिकारी बनले.
कारकिर्दीत केला गावांचा कायापालट (UPSC Success Story)
2014 मध्ये आयएएस राजकमल यांची डीएम (DM) म्हणून नियुक्ती झाली. दक्षिण सिक्कीम जिल्ह्यात पोस्टिंग झाल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील काही गावांना नवसंजीवनी दिली होती. त्या (UPSC Success Story) काळात तेथील ग्रामस्थांना शाळा, वीज, पाणी या मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत होता. राजकमल यांनी आपल्या अधिकारांचा वापर करत ग्रामस्थांना सर्व सोयी सुविधा पुरवल्या आणि गावाचा कायापालट केला.
‘दत्तक गाव’ उपक्रम यशस्वी केला
या IAS अधिकाऱ्याने सुमारे 7,500 लोकांना चांगले जीवन देण्यात मोठे योगदान दिले आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबवण्यात आलेल्या ‘दत्तक गाव’ उपक्रमांतर्गत अविकसित गाव दत्तक घेऊन त्या गावांच्या विकासाची जबाबदारी घेतली जाते. प्रशासनाच्या या उपक्रमामुळे जिल्ह्यातील सुमारे 7,500 नागरिकांना चांगले जीवन मिळू शकले आहे.
माझ्या यशामध्ये पालकांचा मोठा वाटा
राजकमल त्यांच्या यशाचे संपूर्ण श्रेय आई-वडिलांना देतात. आयुष्यात पुढे जाण्याची प्रेरणा केवळ आई वडिलांमुळे मिळाल्याचे ते सांगतात. राजकमल यांचे वडील किशोर यादव हे ग्रामीण बँकेत नोकरीस होते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com