UPSC Success Story : दोन वेळा संधी हुकली; हताश झालेली प्रियदर्शिनी कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे अशी बनली IAS

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । जे प्रामाणिकपणे मेहनत (UPSC Success Story) घेतात ते UPSCचा गड सर करतात. आज आम्ही तुम्हाला अशा एका यशस्वी व्यक्तिमत्वाबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे निश्चितच तुमच्यातील आत्मविश्वास जागा होईल. या व्यक्तीने कठोर परिश्रम आणि समर्पणाच्या जोरावर 2018 मध्ये घेण्यात आलेल्या UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत संपूर्ण देशात 11 वा क्रमांक मिळवून IAS बनण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. या व्यक्तिचं नांव आहे IAS अधिकारी पूज्य प्रियदर्शिनी….

कुटुंबाच्या पाठिंब्यामुळं हे शक्य झालं 
पूज्य प्रियदर्शिनी UPSCची परीक्षा देत असताना तिला पहिल्या दोन प्रयत्नात पराभवाचा सामना करावा लागला. तिसर्‍या प्रयत्नात तिला हा टप्पा गाठण्यात यश मिळाले. याआधी तिने दोन वेळेस अपयश पचवले होते. पूर्व आणि मुख्य परीक्षा पास अजल्यानंतर ती दोनवेळा मुलाखत फेरीपर्यंत पोहचली होती. पण दोन्ही वेळा तिला अपयश आले. यानंतर साहजिकच तिचा धीर सुटला आणि तिने UPSC सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र कुटुंबाच्या आग्रहास्तव आणि पाठिंब्यामुळे तिने पुन्हा हिंमत दाखवली आणि तिसऱ्या प्रयत्नात मुलाखतीची फेरी पूर्ण केली. मुलाखत तिने पास केलीच पण विशेष म्हणजे तिला या परिक्षेत संपूर्ण भारतात 11 वी रँक मिळाली आहे. त्यामुळे तिच्या कुटुंबाचं नांव उज्ज्वल झालं आहे.

परदेशात शिक्षण; 5 वर्षानंतर स्वप्न पूर्ण (UPSC Success Story)
पूज्य प्रियदर्शिनी हिने दिल्लीतून B.Com ची पदवी घेतली आहे. नंतर तिने परदेशात राहून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठातून लोक प्रशासनात पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतर 2013 मध्ये तिने UPSC ची तयारी सुरु केली. सलग 5 वर्षांच्या तयारीनंतर 2018 मध्ये तिला या परिक्षेत यश मिळवता आलं आहे.

तरुणांना दिला मोलाचा सल्ला 
IAS पूज्य प्रियदर्शिनी हिने UPSC ची तयारी करणाऱ्या (UPSC Success Story) उमेदवारांना सल्ला दिला आहे. कधीही अपयशाला घाबरू नका; यश-अपयशाचा सामना करा. प्रत्येकाने आपल्या अपयशाचे मूल्यांकन केले पाहिजे आणि केलेल्या चुकांवर सतत काम केले पाहिजे. चुकांमधून शिकून तुम्ही तुमची स्वप्ने नक्कीच पूर्ण करू शकता; असं तिचं म्हणणं आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com