UPSC Success Story : लठ्ठ पगाराची बँकेची नोकरी सोडली आणि लहानपणीचं स्वप्न केलं पूर्ण; कोण आहे ‘ही’ UPSC Topper

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । प्रियंवदा म्हाडदळकर UPSC (UPSC Success Story) परीक्षेत देशात तेरावी आली. महाराष्ट्रातून ती पहिली आली आहे. लहानपणापासूनच तिनं अधिकारी होण्याचं स्वप्न बाळगलं. बहुराष्ट्रीय बँकेत नोकरी मिळाल्यानं ते स्वप्न काहीसं मागे पडलं. पण सहा वर्षांनी नोकरी सोडून प्रियंवदानं परीक्षेची तयारी केली.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यंदा मुलींनी बाजी मारली असून देशात श्रुती शर्मा ही प्रथम आली आहे. तर अंकित अगरवाल आणि गामिनी सिंगला या अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या आल्या आहेत. यातिघींच्या रांगेत मुंबईतील प्रियंवदा म्हाडदळकर या विद्यार्थिनीने बाजी मारली आहे. बँकेची नोकरी सोडून स्पर्धा परीक्षा देऊन आपले लहानपणचे स्वप्न पूर्ण केल्याचे प्रियंवदा सांगते.

प्रियंवदा म्हाडदळकर UPSC परीक्षेत देशात तेरावी तर महाराष्ट्रात पहिली येण्याचा मान पटकावला आहे. तिने तिच्या प्रयत्नाने उत्तम नोकरी सोडून IAS होण्याचा निर्णय योग्य करून दाखवला आहे.

प्रियंवदाने शिक्षण कुठे घेतलं (UPSC Success Story)

प्रियंवदाने व्हीजेटीआयमधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग क्षेत्रात पदवी मिळवली. त्यानंतर आयआयएम बंगळुरू येथून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर तिला एका गुंतवणूक बँकेत गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळाली. “मात्र ही नोकरी मिळाल्यानंतर मला मी माझे लहानपणचे स्वप्न विसरल्याची जाणीव झाली त्यामुळे मी नोकरी सोडून लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचे ठरविले.” प्रियंवदा सांगते; ” परीक्षेची तयारी करण्यासाठी जुलै 2020 मध्ये मी नोकरी सोडली आणि या अभ्यास करण्यास सुरुवात केली. प्रशासकीय सेवेतून समाजामध्ये अनेक सकारात्मक बदल घडवू शकतो असे मला वाटते यामुळे मी या सेवेत रुजू होण्याचे ठरविले आणि माझे हे स्वप्न आज पूर्ण झाले. ” असे ती म्हणाली.

“माझ्या यशात सासरचा मोठा वाटा”

नियमित अभ्यास आणि भरपूर सराव यांच्या बळावर प्रियंवदानं यशाला गवसणी घातली. वैयक्तिक माहिती आणि चालू घडामोडी या दोन गोष्टी मुलाखतीत महत्त्वाच्या असतात. त्या दोन्हीवर प्रियंवदानं भर दिला. (UPSC Success Story) मुख्य परीक्षेनंतर याच गोष्टींचा प्रियंवदानं दोन ते तीन महिने अभ्यास केला. मुलाखतीत मुद्देसूद बोलावं लागतं. त्यावर प्रियंवदानं विशेष मेहनत घेतली. आपल्या यशात कुटुंबीयांचा, नवऱ्याचा आणि सासरच्या मंडळींचा मोठा वाटा असल्याचं प्रियंवदानं सांगितलं. प्रियंवदाचे बालपण मुंबईत गेले असून लग्नानंतर ती हैद्राबाद येथे स्थायिक झाली आहे.

“माझे वडील माझा आदर्श”

माझे वडील हे माझे आदर्श होते. मला त्यांच्यासारखे व्हायचे होते यामुळे लहानपणापासून माझे IAS अधिकारी होण्याचे स्वप्न होते, असे प्रियंवदाने सांगितले.
नोकरीमुळे स्वप्न विसरल्याची जाणीव झाली…

‘गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडली आणि…’

प्रियवंदाला लहानपणापासूनच IAS ऑफिसर होण्याची इच्छा होती. प्रियंवदा यांचे वडील सरकारी नोकरीत होते. त्यांच्याकडूनच प्रियंवदा यांना शासकीय सेवेत जाण्याची प्रेरणा मिळाली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ६ वर्षं Investment Banking मध्ये काम केलं. पण बालपणी सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हतं. त्यामुळे 2020 मध्ये बँकेची नोकरी सोडली आणि कठोर परिश्रम घेऊन दुसऱ्याच प्रयत्नात तिने उत्तुंग यश प्राप्त केलं आहे.

काय आहे यशाचं रहस्य…

वैकल्पिक विषयाचा अभ्यासाचा आवाका मोठा असल्याने त्यावर खूप भर दिला असल्याचं प्रियंवदा सांगते. भरपूर सराव आणि अभ्यासातला नियमितपणा हे त्यांच्या यशाचं रहस्य आहे. (UPSC Success Story) मुलाखतीच्या तयारीबद्दल ती सांगते; “वैयक्तिक माहिती आणि current affairs या दोन गोष्टी मुलाखतीत महत्त्वाच्या असतात. दोन्हीवर मी भर दिला. मुख्य परीक्षा झाल्यावर मी या दोन गोष्टींचा दोन ते तीन महिने नीट अभ्यास केला. मुख्य परीक्षेत एखाद्या गोष्टीवर प्रश्न विचारला जातो तेव्हा लिखाणातून उत्तर द्यायचं असतं. मात्र मुलाखतीत याच उत्तरांचा रोख बदललेला असतो. तिथे अगदी मुद्देसूद बोलावं लागतं. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून मी अभ्यास केला.”

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com