UPSC Success Story : जिद्द मनात होती.. अंधत्वावर मात करायची होती..; लढली.. धडपडली अखेर IAS बनलीच

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । आपण असे अनेक लोक (UPSC Success Story) पाहतो जे अगदी छोट्या-छोट्या गोष्टींवरुन आपल्या नशिबाला दोष देत असतात. पण खरे पाहता माणसाने ठरवले तर स्वतःचे नशीब तो स्वतःच लिहू शकतो. तमिळनाडूतील मदुराई येथील रहिवासी असलेल्या पूर्णा सुंदरी हे तरुण पिढीसाठी उत्तम उदाहरण आहे. वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी पूर्णाने आपली दृष्टी गमावली, पण तिने हार मानली नाही आणि IAS अधिकारी बनून ती सर्वांसाठी प्रेरणा बनली.

वडील होते सेल्स एक्झिक्युटिव्ह
पूर्णाने 2019 मध्ये UPSC परीक्षेत संपूर्ण भारतातून 286 वा क्रमांक मिळवला आहे. तिने तिच्या कर्तबगारीने हे सिद्ध केले आहे; की एखादी व्यक्ती तिच्या प्रबळ इच्छाशक्तीने आणि कठोर (UPSC Success Story) परिश्रमाने काहीही करू शकते. पूर्णाचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. घरखर्च चालवण्यासाठी वडील एका खाजगी कंपनीत सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करायचे. पूर्णाच्या जन्मानंतर ते खूप आनंदी होते. त्यांना आपल्या मुलीची प्रत्येक इच्छा पूर्ण करायची होती आणि तिला खूप शिकवायचे होते.

वयाच्या 5 व्यावर्षी गमावली दृष्टी (UPSC Success Story)
पूर्णा लहान होती. ती 5 वर्षाची असताना तिची दृष्टी गेली. तिच्या कुटुंबीयांना तिच्या भविष्याची चिंता वाटू लागली. पण पूर्णाने ठरवलं होतं की ती तिच्या वडिलांना अभिमान वाटेल; असे काहीतरी करुन दाखवेल. मदुराई येथील पिल्लिमर संगम उच्च माध्यमिक विद्यालयातून तिने प्राथमिक शिक्षण घेतले. नंतर फातिमा कॉलेज, मदुराई येथून तिने इंग्रजी साहित्यात पदवी घेतली आणि UPSC परीक्षेची तयारी सुरु केली.

IAS बनून स्वतःचं नशीब बदललं
पूर्णा दृष्टिहीन होती; त्यामुळे तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. तिच्या या प्रवासात प्रत्येक पावलावर तिला तिच्या आई-वडिलांनी साथ दिली. यूपीएससीच्या (UPSC) तयारीदरम्यान, असे अनेक प्रसंग आले जेव्हा काही अभ्यास साहित्य ऑडिओ स्वरूपात उपलब्ध नव्हते. अशा परिस्थितीत पूर्णाच्या आई-वडिलांनी तिच्या काही मैत्रिणींसह अनेक पुस्तकांचे ऑडिओ स्वरूपात रूपांतर करण्याचे काम केले. पूर्णाच्या मेहनतीला फळ मिळाले आणि तिने IAS होऊन स्वतःचं नशीब पालटलं.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com