UPSC Success Story : कष्टकरी आई-बापाची पोर बनली अधिकारी; लाखाची नोकरी सोडून केला अभ्यास

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। देशातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा (UPSC Success Story) आयोगाच्या परीक्षेत अमरावती जिल्ह्यातील पल्लवी सुखदेव चिंचखेडे हिने बाजी मारत देशात 63 वी रॅंक मिळवत आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे, सोबतच जिल्हाचा देशात बहुमान वाढविला. तिच्या या अदभूत यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये अमरावती जिल्ह्यातील पल्लवी सुखदेव चिंचखेडे हिने आपल्या आई वडिलांच्या कष्टाचे चीज करत अटकेपार झेंडा रोवला आहे.

लाखाच्या नोकरीवर सोडलं पाणी

पल्लवीने बी इ मेकॅनिकपर्यंत शिक्षण अमरावती येथे पूर्ण केले. त्यानंतर तिने एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये एक लाख रुपयांच्या नोकरीवर आपल्या करिअरची सुरुवात केली. हे करत असताना देश सेवा करण्याचे स्वप्न तिने उराशी बाळगलं होतं. त्यामुळे लाख रुपये पगाराच्या नोकरीचा तिने राजीनामा दिला आणि दिल्ली येथे जाऊन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली.

 

UPSC Success Story of IAS Pallavi Chinchkhede

कष्टकरी आई – वडिलांची गुणी पोर

पल्लवीचे वडील हे रंगकाम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आई शिवणकाम करते. पल्लवीची बहिण ही एका बँकेमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत आहे. तर (UPSC Success Story) भाऊ कॉलेज विद्यार्थी आहे. तिचे वडील म्हणतात; “ती आता इंजिनीअर म्हणून काम करेल असे आम्हाला वाटले होते. मात्र तिने ही नोकरी सोडून आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत आमच्या मेहनतीचे चीज करुन दाखविले यात आम्हाला समाधान आहे.”

अभ्यासासाठी दिल्ली गाठली

अमरावतीच्या राहुल नगर, बिच्छू टेकडी येथील रहिवाशी आहे. ती राहत असलेल्या ठिकाणी व्यसनाधीनतामुळे बऱ्याच जणांचे आयुष्य खराब झालेले तिने बघितले आणि आपल्या देशासाठी आणि आपल्या समाजातील लोकांसाठी काहीतरी करावं हे तिने ठरवलं होतं. तिने यावेळी IAS होण्याचं मनाशी पक्क केलं. आणि येथूनच पल्लवीचा यु.पी.एस.सी चा प्रवास सुरु झाला.या परीक्षेच्या तयारीसाठी पल्लवीने थेट दिल्ली गाठली.

UPSC Success Story of IAS Pallavi Chinchkhede

तुकाराम मुंढेंचा आदर्श (UPSC Success Story)

पल्लवी लहान असताना तिला तिच्या वडीलांनी अमरावती येथे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला नेले होते. त्यावेळी मुंडे सरांच्या भाषणामुळे ती प्रभावीत झाली. तेव्हापासूनच तिने UPSCचे स्वप्न बघायला सुरुवात केली. हे स्वप्न साकार करण्यासाठी तिने इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मिळालेल्या नोकरीचा त्याग केला.

असा सुरु झाला UPSC चा प्रवास

पल्लवीचे शिक्षण आनंद शाळेमधून झाले असून तिने अमरावतीतूनच शिक्षण पूर्ण केले आहे. पदवी पूर्ण करताना तिला कमी गुण मिळाले होते. तिचा मित्र परिवारही मोठा नव्हता. त्यातून आलेला एकाकीपणा तसेच त्यावेळी समाजातील विविध प्रश्नांची झालेली जाणीव यामुळे आपण असे प्रश्न सोडवण्यासाठी (UPSC Success Story) काहीतरी करू शकतो असं तिला वाटलं. त्यासाठी प्रचंड कष्ट करण्याची तयारी तिने ठेवली होती. आपल्या देशासाठी आणि आपल्या समाजातील लोकांसाठी काहीतरी करावं हे तिने ठरवलं होतं. IAS व्हावं हे तिने मनात पक्क केलं आणि पल्लवीचा यूपीएससीचा प्रवास सुरु झाला होता.

UPSC Success Story of IAS Pallavi Chinchkhede

पल्लविने अभ्यासात सातत्य ठेवत अपार मेहनत घेत इथपर्यंत पोहचली आहे. तिने संपूर्ण भारतातून 63 वा क्रमांक मिळवत IAS पदावर वर्णी लावली आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com