करिअरनामा ऑनलाईन । अनेक लोक UPSC नागरी सेवा परीक्षा (UPSC Success Story) उत्तीर्ण होण्यासाठी आतोनात प्रयत्न करतात. पण काही असाधारण लोक आहेत जे पहिल्याच प्रयत्नात UPSC पास होवून IAS किंवा IPS बनतात. नेहा जैन अशी IAS अधिकारी आहे; जी या क्षेत्रात येण्यापूर्वी डेंटिस्ट होती. जाणून घेऊया तिची यशोगाथा…
डॉ. नेहा जैन जी डेंटिस्ट आहे तिने 2017 मध्ये UPSC परीक्षा पास केली आहे. विशेष म्हणजे परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात ती पास झाली आहे. तिचा जन्म दिल्लीत झाला. तिची आई मंजुलता जैन आणि वडील पी. के. जैन एका विमा कंपनीत काम करतात. तर तिचा धाकटा भाऊही डॉक्टर आहे.
12वी नंतर केलं BDS
नेहाला लहानपणापासूनच अभ्यासात हुशार. बारावीनंतर तीने BDS ची डिग्री घेतली आणि ती डेंटिस्ट झाली. तिने मौलाना आझाद इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेसमधून BDS ची डिग्री घेतली आहे. यानंतर तिने काही काल दंत सल्लागार म्हणून काम सुरू केले. पण आपण समाजात काहीतरी बदल घडवून आणू शकू असे काम तिला करायचे होते. शेवटी तिने IAS होण्याचा निर्णय घेतला.
दिवसातील 4 ते 5 तास केला अभ्यास
नेहाने UPSC च्या तयारीसाठी कोचिंग क्लासला प्रवेश घेतला. तिने (UPSC Success Story) चालू घडामोडींवर अधिक लक्ष केंद्रित केले. तसेच परीक्षेसाठी अभ्यासाचे योग्य वेळापत्रक तयार केले होते. परीक्षेच्या तयारीसाठी दिवसातील चार ते पाच तास अभ्यासासाठी दिले तर ते पुरेसे आहेत; असे नेहाचे मत आहे.
वर्तमानपत्रे वाचनावर दिला भर
नेहा सांगते की; “माझी UPSC ची सुरुवात अगदी मुळापासून झाली. लेखन कौशल्य सुधारण्यासाठी मी दररोज वर्तमानपत्रातील संपादकीय कॉलम वाचत असे. वर्तमानपत्रे वाचून चालू घडामोडीही अपडेट व्हायला मदत होत होती. मी अनेक मॉक टेस्टही दिल्या. मॉक टेस्टच्या निकालावरून मी माझ्यातील कमकुवतपणा ओळखला आणि त्यावर कठोर परिश्रम घेतले.”
विद्यार्थ्यांना दिला हा सल्ला
डॉ. नेहा सांगते, की UPSC सारख्या अनिश्चित परीक्षेत योग्य विचार, उत्तम रणनीती, अधिक उजळणी, उत्तर लेखनाचा सराव आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेळेचे व्यवस्थापन हे महत्त्वाचे असते. या सर्वांना सोबत घेऊन तयारी केली तर यश नक्कीच मिळते. परीक्षेच्या मुख्य तयारीसाठी उत्तर (UPSC Success Story) लिहिण्याचा भरपूर सराव करण्याचा सल्ला ती देते. नेहाने 2017 मध्ये झालेल्या UPSC परिक्षेत संपूर्ण भारतात 14 वा क्रमांक मिळवला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com