करिअरनामा ऑनलाईन । भारतातील सर्वात प्रतिष्ठित समजली (UPSC Success Story) जाणारी UPSC परीक्षा देशातील लाखो तरुण दरवर्षी देत असतात. या परीक्षेबाबत गंभीर असणाऱ्यांना आणि योग्य रणनिती आखून अभ्यास करणाऱ्यांनाच या परिक्षेत यश मिळते. मग तो उमेदवार कोचिंग घेऊन तयारी करत असेल किंवा कोचिंगशिवाय तयारी करत असेल. नोकरी करत असाल तर ही परीक्षा पास होणं कठीण आहे; असं अनेक तरुणांना वाटतं . पण पश्चिम बंगालमधील तरुणी नेहा बॅनर्जीने हा समज चुकीचा ठरवला आहे. तिने 9 ते 5 नोकरी करत पहिल्याच प्रयत्नात नागरी सेवेची परीक्षा पास केली आहे. आज या या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला नेहा बॅनर्जीची UPSC प्रवासाची कहाणी सांगणार आहोत.
पश्चिम बंगालची नेहा (UPSC Success Story)
नेहाचा जन्म 1995 साली पश्चिम बंगालमध्ये झाला. ती मूळची कोलकाता येथील आहे. नेहाने कार्मेल स्कूलमधून तिचे 10वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. या शाळेत तिला टॉपर म्हणून मुख्यमंत्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर तिने साऊथ पॉइंट हायस्कूलमधून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.
IIT खरगपूर मध्ये घेतला प्रवेश
नेहाने शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आयआयटी खरगपूरमध्ये प्रवेश घेतला. येथून तिने इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगमध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
खाजगी कंपनीत मिळाली नोकरी
नेहाचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तिला एका खाजगी मोठ्या कंपनीत नोकरी लागली. नागरी सेवेत रुजू होऊन देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या नहला या कंपनीत (UPSC Success Story) चांगल्या पॅकेजवर नोकरी मिळाली होती.
नोकरी करत केला अभ्यास
नेहाला संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा देवून अधिकारी व्हायचं होतं. तिला अभ्यासासाठी वेळ हवा होता. तिने अभ्यास आणि नोकरी याची योग्य सांगड घालून आपला डिंकर्म ठरवला. नेहाने नोकरी सोडण्याऐवजी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 च्या नोकरीसह UPSC ची तयारी सुरु ठेवली. ती (UPSC Success Story) सकाळी लवकर उठून अभ्यास करायची. त्याचबरोबर नोकरीवरून आल्यानंतर अभ्यासक्रम पूर्ण व्हावा म्हणून ती पुन्हा अभ्यासाला बसायची. यासोबतच तिच्या सुट्टीचाही ती पुरेपूर वापर करत असे. तिचा सुट्टीचा दिवस अभ्यासात जात असे.
पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक
नेहा बॅनर्जीने पहिल्याच प्रयत्नात पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली. मुलाखतीसाठी तिने अनेक कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये मोफत मॉक इंटरव्ह्यू दिल्या. यासोबतच तिने यूट्यूबच्या (UPSC Success Story) मदतीने मुलाखतीच्या अनेक ट्रिक्सही शिकून घेतल्या. यानंतर ती मुलाखत देण्यासाठी UPSC भवनात पोहोचली. येथे तिची सुमारे 35 मिनिटे मुलाखत घेण्यात आली. तिने मुलाखतीत चांगली कामगिरी दाखवली आणि जेव्हा निकाल जाहीर झाला तेव्हा तिने 2019 च्या लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परिक्षेत 20 वा क्रमांक पटकावला.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com