UPSC Success Story : शाळेपासूनच हुश्शार!! वडिलांच्या इच्छेसाठी डॉक्टर तरुणी बनली IAS; तिचे सौंदर्य हिरॉईनलाही मागे टाकेल

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । UPSC परीक्षा ही भारतातील सर्वात (UPSC Success Story) कठीण परीक्षांपैकी एक परीक्षा समजली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार आयएएस अधिकारी होण्यासाठी प्रयत्न करतात आणि त्यासाठी कठोर परिश्रम घेतात. काही लोक आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी हे करतात, तर काही लोक आपल्या प्रियजनांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी हे काम करतात. आज आम्ही तुम्हाला IPS-अधिकारी मुद्रा गायरोलाबद्दल (IAS Mudra Gairola) सांगत आहोत, जिने वडिलांचे आयएएस अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिचे मेडिकलचे शिक्षण अर्धवट सोडले.

शाळेपासूनच होती टॉपर
आयएएस अधिकारी मुद्रा गायरोला या उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील कर्णप्रयाग येथील रहिवासी आहेत. त्यांचे कुटुंब सध्या दिल्लीत राहते. आयएएस अधिकारी मुद्रा गायरोला लहानपणापासूनच अभ्यासात टॉपर आहेत. त्यांना दहावीच्या परीक्षेत 96 टक्के आणि 12 वीच्या परीक्षेत 97 टक्के गुण मिळाले होते. भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी किरण बेदी यांच्या हस्ते त्यांचा शाळेत सन्मानदेखील करण्यात आला होता.

आधी BDS आणि नंतर MDS
आयएएस अधिकारी मुद्रा गायरोला यांनी 12वी उत्तीर्ण केली आणि मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालयात बीडीएस म्हणजेच बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी कोर्समध्ये प्रवेश घेतला. मुद्रा गायरोला (UPSC Success Story) यांना BDS मध्येही सुवर्णपदक मिळाले आहे. यानंतर त्यांनी MDS मध्ये प्रवेश घेतला. पण आपल्या मुलीने IAS अधिकारी व्हावे अशी तिच्या वडिलांची इच्छा होती. आयएएस अधिकारी मुद्रा गायरोला यांच्या वडिलांना स्वत:ला IAS अधिकारी व्हायचे होते; पण काही कारणांमुळे त्यांचे हे स्वप्न पूर्ण होवू शकले नाही. त्यामुळे त्यांची आपली मुलगी IAS व्हावी; अशी इच्छा होती.

वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेडिकलचे शिक्षण सोडले
मुद्रा यांनी वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी MDS चे शिक्षण मध्येच सोडले आणि UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. 2018 मध्ये त्या पहिल्यांदाच UPSC नागरी सेवा परीक्षेला बसल्या ज्यामध्ये त्या पूर्व आणि मुख्य परीक्षा पास करून मुलाखत फेरीपर्यंत पोहचल्या. पण इथे त्यांना अपयश आले.

चौथ्या प्रयत्नात मिळाले IPS पद
मुद्रा गायरोला यांनी 2019 मध्ये पुन्हा UPSC मुलाखत दिली परंतु अंतिम निवड झाली नाही. यानंतर त्या 2020 मध्ये मुख्य परीक्षा देऊ शकली नाही. मुद्रा गायरोला 2021 मध्ये पुन्हा UPSC परीक्षेला बसल्या. यावेळी त्यांच्या मेहनतीला फळ मिळाले आणि त्यांनी 165 व्या रँकसह UPSC परीक्षा पास केली आणि त्या IPS अधिकारी झाल्या.

अखेर IAS होवून दाखवलं
मुद्रा यांना वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी IAS अधिकारी व्हायचे होते. त्या UPSC पास झाल्या पण त्यांना 165 वी रॅंक मिळाल्याने IPS पद मिळाले. IAS होण्याचं ध्येय त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं. त्यांनी पुन्हा UPSC चा फोरम भरला. 2022 मध्ये त्यांनी परीक्षा दिली. या परीक्षेत त्यांना संपूर्ण भारतातून 53 वी रॅंक मिळाली आणि IAS पद मिळवण्यात यश मिळाले.

वडिलांचं अपूर्ण स्वप्न मुलीनं पूर्ण केलं
आयएएस अधिकारी मुद्रा गायरोला यांचे (UPSC Success Story) वडील अरुण गायरोला यांनाही संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होऊन IAS अधिकारी व्हायचे होते. त्यांनी 1973 मध्ये UPSC परीक्षा दिली होती. पूर्व आणि मुख्य परीक्षा पास करून ते मुलाखतीच्या फेरीपर्यंत पोहचले; पण इथे त्यांना अपयश आले. ते IAS पदापर्यंत पोहचू शकले नाहीत. पण त्यांचे अधुरे स्वप्न त्यांच्या मुलीने पूर्ण केले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com