करिअरनामा ऑनलाईन । लहानपणापासूनच अभ्यासात हुशार (UPSC Success Story) असलेल्या मुदिताने दहावीच्या बोर्ड परीक्षेत 15 वा क्रमांक पटकावला होता. 12 वी नंतर मुदिताने MBBS केले. त्यानंतर तीने मेडिकलची प्रॅक्टिसही सुरु केली; पण तिला IAS व्हायचं होतं; यासाठी तिने मेडिकलची प्रॅक्टिसही सोडली. इथूनपुढे मुदिताचा प्रवास कसा होता याविषयी जाणून घेवूया…
वडील प्राचार्य तर आई गृहिणी
तुम्ही छोट्या शहरात राहत असाल किंवा मोठ्या शहरात…. जर तुमचं ध्येय स्पष्ट असेल तर या गोष्टींचा तुम्ही यश मिळवण्यावर परिणाम होत नाही. राजस्थानमधील एका छोट्या शहरातून आलेल्या मुदिताने आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे. ती राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील मेर्टा येथील रहिवासी आहे. मुदिता शर्माचे वडील भगवतीलाल शर्मा हे मेर्टा येथील वरिष्ठ माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य आहेत तर तिची आई गृहिणी आहे.
मेडिकलची प्रॅक्टिस सोडून केली UPSC (UPSC Success Story)
लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असलेल्या मुदिताने दहावीच्या बोर्ड परीक्षेतही १५ वा क्रमांक पटकावला होता. बारावीनंतर मुदिताने जोधपूरच्या एसएन मेडिकल कॉलेजमधून MBBS केले. त्यानंतर ती जयपूरमधील एका खासगी रुग्णालयात मेडीकलही प्रॅक्टिस करु लागली. पण तिने बालपणी पाहिलेले स्वप्न तिला स्वस्थ बसू देत नव्हते. तिने मेडिकलची प्रॅक्टिस सोडून आपला मोर्चा UPSC कडे वळवला.
मेडिकलची प्रॅक्टिस सोडून तिने दिल्लीत UPSCच्या कोचिंगसाठी प्रवेश घेतला होता. 2022 मध्ये मुदिताने पहिल्यांदा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात तिने संपूर्ण भारतातून 381 वा क्रमांक पटकावला.
योग्य टाईम टेबल बनवण्याचा देते सल्ला
मुदिता शर्मा UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना अभ्यासाचे टाईम टेबल बनवण्याचा सल्ला देते. अभ्यासाची तयारी कुठपर्यंत झाली आहे हे पाहण्यासाठी मॉक टेस्ट देत राहण्याविषयी ती सांगते. डॉ मुदिता शर्मा हिने एका मुलाखतीत सांगितले की, “अभ्यासाचे योग्य वेळापत्रक केले तर तुम्ही तुमचे ध्येय वेळेवर साध्य करू शकता.”
उच्च शिक्षित भावंडे
मुदिताची मोठी बहीण मधुबाला हिने बीडीएस केले आहे. तर दुसरी बहीण विद्या हिने सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये बीटेक केले आहे. भावंडांमध्ये मुदिता तिसऱ्या क्रमांकावर आहे. तिचा भाऊ चंद्रशेखर यानेही बीडीएस केले आहे. त्याची धाकटी बहीण रितू कझाकिस्तानमधून एमबीबीएस करत आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com