UPSC Success Story : सलग दोनवेळा अपयश येऊनही सोडली नाही जिद्द; तिसऱ्या प्रयत्नात झाली IAS; वाचा एक प्रेरणादायी कहाणी
करिअरनामा ऑनलाईन। लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणारी मवीज टाक ही मिरा-भाईंदर (UPSC Success Story) मधली पहिली तरुणी आहे. मुंबईच्या मिरा रोडमधील एका अनुवादकाच्या मुलीने जिद्दीच्या बळावर यूपीएससी परीक्षेत यश कमावले आहे.
मिरा रोडमधील एका मुलीने जिद्दीच्या जोरावर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मोठे यश संपादन केले आहे. मवीजने वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी हे यश संपादन केले आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ती देशात ३८६व्या क्रमांकावर उत्तीर्ण झाली आहे. मिरा-भाईंदरमध्ये लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणारी मवीज ही पहिली तरुणी असल्याने तिचे सर्वच स्तरांतून कौतुक केले जात आहे.
अशी आहे मवीजची कौटुंबिक पार्शवभूमी –
मवीज ही मूळची राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील फालना गावची. तिचे तिसरीपर्यंतचे शिक्षण गावी झाले. त्यानंतर तिचे वडील नोकरीनिमित्त संपूर्ण कुटुंबासह मिरा-भाईंदरला स्थायिक झाले. पुढे भाईंदरच्या (UPSC Success Story) न्यू केंब्रिज हायस्कूलमधून शालेय शिक्षण, तर रॉयल कॉलेजमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण तिने पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठात राज्यशास्त्र विषयात तिने पदव्युत्तर पदवी मिळवली. मवीजची मोठी बहीण मुंबईतील काही खासगी संस्थांमध्ये राज्यसेवा व लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देते. त्यामुळे मवीजलादेखील या क्षेत्रात आवड निर्माण झाली.
असा होता प्रवास (UPSC Success Story)
प्रशासकीय अधिकारी होऊन याच क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेत मवीजने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला. IAS परीक्षेची तयारी करण्यासाठी तिने मुंबईमध्ये एक वर्ष, तर दिल्लीत दोन वर्षे प्रशिक्षण घेतले. परंतु, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पहिल्यांदा दिलेल्या परीक्षेत तिला अपयश आले. दुसऱ्या प्रयत्नांतही तिला अपयशाचा सामना करावा लागला. या दरम्यान तिला प्रचंड मानसिक दडपण आले. वडील अब्दुल करीम यांनी दररोज मिळणाऱ्या अनुभवातून तिला प्रेरणा दिली. तिचे वडील न्यायालयीन कामकाजासाठी लागणाऱ्या कागदपत्रांचे खासगी अनुवादक म्हणून अनेक वर्षांपासून काम पाहत आहेत. अपयशातून धडा घेत मवीजने यश मिळवण्याचा निश्चय केला होता. तिने जिद्दीने अभ्यास करत तिसऱ्यांदा परीक्षा दिली आणि तिला यामध्ये यश मिळाले.
मवीज सांगते…
“माझ्या यशात आई-वडील, लहान-मोठ्या बहिणींचे (UPSC Success Story) प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले आहे. सातत्यपूर्ण अभ्यास, वेळेचे योग्य नियोजन, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास, जिद्द यामुळे यश प्राप्त झाले;” असे मवीजने सांगितले.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com