करिअरनामा ऑनलाईन । आपल्याला आयुष्यात काहीतरी चांगले (UPSC Success Story) करायचे आहे; या इच्छेतल येणाऱ्या अनेक अडचणींमुळे बहुतेक तरुण पराभूत होतात. परंतु काही लोक असे असतात जे प्रतिकूल परिस्थितीच्या विरोधात जातात आणि आपली इच्छा पूर्ण करूनच दाखवतात. आज आपण अशाच एका तरुणाची यशोगाथा वाचणार आहोत. एम. शिवगुरु प्रभाकरन (IAS M. Shivaguru Prabhakaran) असं यांचं नाव आहे. सध्या ते तामिळनाडूचे आयएएस (IAS) अधिकारी आहेत. शिवगुरू प्रभाकरन हे यूपीएससीची तयारी करणाऱ्यांसाठी एक मोठे उदाहरण आहेत.
आई आणि बहिणीने हिंमतीने घर चालवले
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्रभाकरनने लहानपणापासूनच आई आणि बहिणीने घेतलेले अथक परिश्रम पाहिले आहेत. त्यांच्या वडिलांना दारूचे व्यसन होते, त्यामुळे घरात रोज भांडणे होत होती, या (UPSC Success Story) वातावरणात त्यांच्या कुटुंबातील दोन्ही महिला काबाडकष्ट करून उदरनिर्वाह करत होत्या. मुलाला अधिकारी बनवण्यासाठी आई आणि बहीण बांबूच्या टोपल्या विणून विकत असत. समोर अनेक आव्हाने होती पण त्यांना न जुमानता प्रभाकरनने आपली स्वप्ने पूर्ण करण्याचा निर्धार केला होता.
अर्ध्यातच शिक्षण सोडावे लागले (UPSC Success Story)
प्रभाकरन (IAS M. Shivaguru Prabhakaran) यांनी स्वप्न मोठे पाहिले होते; पण वेळ खराब होती. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांना आपले शिक्षण अर्ध्यातच सोडावे लागले. ते लाकडे कापण्याच्या कंपनीत काम करु लागले. या दरम्यान त्यांच्या बहिणीचे लग्न झाले. यानंतर त्यांनी पुन्हा अभ्यास सुरू केला. आपल्या भावाचे आणि स्वतःचे शिक्षण सांभाळत, त्याने वेल्लोर येथील थंथाई पेरियार गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. इथेही त्याने स्वतःचे आणि भावाचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काम करुन पैसे कमावले.
सॉ मिलध्ये काम केल्यानंतर प्रभाकरन रेल्वे स्टेशनवर जाऊन अभ्यास करायचे. यावेळी त्यांना मागासलेल्या लोकांसाठी प्रशिक्षणाची सुविधा देणाऱ्या ‘सेंट थॉमस माऊंट’ची माहिती मिळाली. यामुळे प्रभाकरन यांचे आयुष्य बदलले. त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळाला, त्यानंतर त्यांनी कसून मेहनत घेतली आणि एमटेक (M. Tech) मध्ये टॉप रँक मिळवली.
अनेक रात्री रेल्वे स्टेशनवर काढल्या
पूर्णवेळ काम आणि वीकेंडला अभ्यास; असा समतोल (UPSC Success Story) साधत त्यांनी या प्रवासात अनेक अडचणींचा सामना केला. ते अनेकदा स्टेशनवरच रात्र काढत असत. त्यांच्यातील जिद्दीमुळे आव्हानांचा सामना करण्यास मदत झाली; असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
UPSC मध्ये अनेक वेळा अपयश आले
पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतर, प्रभाकरनने अनेक अडथळ्यांना तोंड देत UPSC परीक्षेवर लक्ष केंद्रित केले. पण सुरवातीच्या तिन्ही प्रयत्नांमध्ये त्यांना अपयश आले. त्यांचा निर्धार पक्का होता. प्रभाकरन चौथ्या प्रयत्नात यशस्वी झाले. त्यांनी 2017 मध्ये झालेल्या संघ लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत संपूर्ण (UPSC Success Story) भारतातून 101वी रँक मिळवली. अखेर प्रभाकरन यांचं स्वप्न पूर्ण झालं आणि ते IAS अधिकारी बनण्यात यशस्वी झाले. आर्थिक संकट आणि कौटुंबिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आयएएस (IAS) अधिकारी प्रभाकरन यांचा जीवन प्रवास सुरू झाला, त्यांनी जिद्दीने स्वप्ने पूर्ण करून प्रतिकूल परिस्थितीला पूर्णपणे बदलून टाकले.अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com