UPSC Success Story : कोरोनाग्रस्त पालकांची काळजी घेत केला अभ्यास; मेन्सच्या तयारीसाठी बर्फात हात गोठवले; अखेर अशी झाली IAS अधिकारी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । कोरोना काळात अनेक अडचणींचा (UPSC Success Story) सामना करत कृती राज यांनी 2020 मध्ये लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. ही परीक्षा पास होवून त्यांनी फक्त त्यांच्या कुटुंबाचेच नव्हे तर संपूर्ण शहराचे नाव उंचावले आहे. त्या उत्तर प्रदेशातील झाशी येथील रहिवासी आहेत. त्या सध्या उत्तर प्रदेश केडरमध्ये तैनात आहेत. त्या अनेकवेळा  विद्यार्थ्यांसाठी UPSC परीक्षेच्या तयारीच्या अनेक टिप्स शेअर करत असतात. आज आपण IAS कृती राज यांचा प्रेरणादायी प्रवास पाहणार आहोत…

UPSC Success Story IAS Kriti Raj

B.Tech पदवीधर आहेत कृती राज
IAS कृती राज या उत्तर प्रदेशातील झाशी या ऐतिहासिक शहराच्या रहिवासी आहेत. झाशीच्या सेंट फ्रान्सिस कॉन्व्हेंट स्कूलमधून त्यांनी शिक्षणाला सुरुवात केली. त्यानंतर (UPSC Success Story) जय अकादमीतून 12वी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण झाली. कृती राज यांनी BIET झांसी येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये B.Tech ची पदवी घेतली आहे.

UPSC Success Story IAS Kriti Raj

सामाजिक कार्याची आवड (UPSC Success Story)
B.Tech पूर्ण केल्यानंतर कृती यांना त्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा नव्हती. त्यांना सर्व सामान्य जनतेसाठी, तळागाळातील लोकांसाठी काहीतरी करायचं होतं आणि म्हणूनच त्यांनी कल्पवृक्ष वेल्फेअर फाऊंडेशन नावाची एनजीओ सुरू केली. यामध्ये महिला आणि बालकल्याणाची कामे केली जातात. हे काम करत असताना त्यांनी नागरी सेवेत अधिकारी होण्याचा निर्णय घेतला आणि UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. समाजसेवेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नागरी सेवा हा उत्तम मार्ग ठरू शकतो; हा दृष्टिकोन त्यांनी समोर ठेवला.

 

 

 

 

 

UPSC Success Story IAS Kriti Raj

कोरोनाग्रस्त पालकांची काळजी घेत केला अभ्यास
कृती राज यांनी 2020 मध्ये UPSC नागरी सेवा परीक्षा दिली. दरम्यान, कोरोना महामारीचा कहर शिगेला पोहोचला होता. परीक्षेची तयारी करत असताना त्यांच्या पालकांना (UPSC Success Story) रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशा परिस्थितीत आई-वडिलांची काळजी घेत कृती राज यांनी परीक्षेचा अभ्यास सुरूच ठेवला होता. त्यांनी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत 106 वा क्रमांक मिळवून IAS पद मिळवलं आहे.

 

UPSC Success Story IAS Kriti Raj

थंड पाण्यात हात गोठवायच्या
यूपीएससी नागरी सेवा परीक्षा ऑक्टोबरमध्ये होणार होती. मात्र कोरोना महामारीमुळे ही परीक्षा जानेवारीमध्ये घेण्यात आली. या काळात उत्तर भारतात हिवाळा शिगेला पोहोचला होता. UPSC Mains मध्ये उमेदवारांना दोन शिफ्टमध्ये 6 तास लिहावे लागते. कृती राजने यांनी एका (UPSC Success Story) मुलाखतीत सांगितले होते की, थंडीतही पेपर लिहिता यावा यासाठी त्यांनी योग्य सराव केला होता. त्या रोज पहाटे तीन वाजता उठायच्या आणि थंड पाण्यात हात बुडवून हात गोठवायच्या. यानंतर त्या सलग तीन तास मॉक पेपर लिहायच्या. त्यांनी स्वतःला असे तयार केले होते जेणेकरून अत्यंत वाईट स्थितीतही पेपर लिहिता येईल.

 

UPSC Success Story IAS Kriti Raj

कर्फ्यूमधून गाठलं परीक्षा केंद्र
IAS कृती राज यांनी 2020 मध्ये UPSC परीक्षा दिली होती. या दरम्यान कोरोनामुळे अनेक ठिकाणी कर्फ्यूसारखी परिस्थिती होती. त्यांनी सेल्फ स्टडी करत यूपीएससी परीक्षेची तयारी केली होती. गेल्या UPSC मुख्य परीक्षेच्या वेळी भोपाळमध्ये कर्फ्यू होता. अशा स्थितीत हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी कृती राज यांना कसेबसे परीक्षा केंद्रावर नेले. परीक्षा सुरू होण्याच्या अवघ्या 10 मिनिटे आधी त्या केंद्रावर पोहोचू शकल्या होत्या.

UPSC Success Story IAS Kriti Raj

25 मिनिटे चालली UPSCची मुलाखत (UPSC Success Story)
कृती राज यांच्या UPSC मुलाखतीदरम्यान एक मजेदार घटना घडली. जेव्हा त्या मुलाखत देण्यासाठी पोहोचल्या तेव्हा दुपारचे साडे चार वाजले होते. बोर्ड सदस्याने त्यांना जेवण केले की नाही का? असं विचारलं. यावर त्यांनी सकाळचा नाश्ता करून आल्याचे उत्तर दिले. त्यांचे उत्तर ऐकून सर्व मंडळाचे सदस्य हसू लागले आणि वातावरण अतिशय खेळीमेळीचे झाले. त्यांची मुलाखत सुमारे 25 मिनिटे चालली आणि यामध्ये त्यांना त्या चालवत असलेली एनजीओ आणि हवामान याबद्दल प्रश्न विचारण्यात आले.

UPSC Success Story IAS Kriti Raj

रोज 8 ते 10 तास अभ्यास
IAS कृती राज यांनी UPSC 2020 परीक्षेत 106 वा क्रमांक मिळविला. त्यांनी जुलै 2019 पासून नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. सुरुवातीचे काही महिने त्यांनी (UPSC Success Story) रोज 8 ते 10 तास अभ्यास केला. त्यानंतर कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू झाल्यानंतर त्यांनी आपली अभ्यासाची रणनीती बदलली आणि चालू घडामोडींवर लक्ष केंद्रित केले. यूपीएससीच्या मुलाखतीदरम्यान तुमच्या क्षेत्राशी संबंधित प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टींची माहिती घेणे महत्त्वाचे असते, असा सल्ला त्या यूपीएससी उमेदवारांना देतात. त्यांचा हा प्रवास यूपीएससी उमेदवारांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com