UPSC Success Story : कोणत्याही कोचिंगशिवाय देशातील सर्वात मोठ्या परीक्षेत केलं टॉप; अशी होती इशिताची अभ्यासाची रणनिती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । इशिता राठी या तरुणीने जून 2022 मध्ये (UPSC Success Story) जाहीर झालेल्या UPSC परिक्षेच्या निकालात  संपूर्ण भारतातून 8 वा क्रमांक मिळवला आहे. इशिताने कोणत्याही विषयासाठी कोचिंग क्लास न लावता केवळ सेल्फ स्टडीवर भर देवून परीक्षेमध्ये अव्वल क्रमांक पटकावला आहे. अभ्यास करण्यासाठी इशिताने कोणती रणनिती अवलंबली आहे; याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

UPSC Success Story of IAS Ishita Rathi

वडील हेड कॉन्स्टेबल अन् आई ASI

इशिताचे कुटुंब दिल्लीतील छतरपूर गावात राहते. इशिताचे वडील दिल्ली पोलिसात हेड कॉन्स्टेबल असून तिची आई एएसआय आहे. आई-वडिलांचे कार्य पाहून (UPSC Success Story) तिने देशसेवेचे स्वप्न पाहिले आणि UPSC परीक्षा देवून देशसेवा करण्याचा निर्णय घेतला. या दृष्टीने इशिताचे प्रयत्न सुरु झाले.  UPSC ची परीक्षा देत असताना अवघ्या तिसऱ्या प्रयत्नातच इशिता पास झाली आणि तिने संपूर्ण भारतातून 8 वी रॅंक मिळवली. “मला इतक्या चांगल्या रँकची अपेक्षा नव्हती. मी फायनलमध्ये पोहोचेन की नाही याची मला खात्री नव्हती पण मी ते केले आणि हे माझ्यासाठी आश्चर्यकारक आहे;” असं इशिता सांगते.

UPSC Success Story of IAS Ishita Rathi

अर्थशास्त्रात केले PG (UPSC Success Story)

इशिताने मद्रास स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्रात विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. अभासाच्या तयारीबद्दल बोलताना ती म्हणते की, “मी या परीक्षेसाठी (UPSC Success Story) कोणतेही कोचिंग घेतले नाही. पण माझ्या अर्थशास्त्र या ऐच्छिक विषयासाठी मी मेंटॉरिंग घेतले आहे. सध्या अभ्यासासाठी बरेच विनामूल्य साहित्य उपलब्ध आहे ज्याची मदत घेऊन विद्यार्थी परीक्षेची तयारी करू शकतात.”

UPSC Success Story of IAS Ishita Rathi

अशी होती अभ्यासाची रणनिती

UPSC परीक्षेची तयारी सुरू करण्यापूर्वी इशिताने संपूर्ण अभ्यासक्रमाची माहिती घेतली होती. सेल्फ स्टडीवर अधिक भर दिला. ती स्वतः तयारी करू शकते हे लक्षात आल्यावर तिने त्यानुसार अभ्यासाचे नियोजन केले. इशिताची अभ्यासाची रणनिती कशी होती याबद्दल विचारले (UPSC Success Story) असता ती सांगते; “मी मागील वर्षांतील टॉपर्स उमेदवारांचे ऐकून अभ्यासाचे नियोजन केले. भूगोल आणि राजकारण यासारख्या काही विषयांसाठी NCERT पुस्तके वाचली.  वर्तमानपत्रे आणि चालू घडामोडी वाचनावर भर दिला. मी राजकारणासाठी लक्ष्मीकांत आणि इतिहासासाठी स्पेक्ट्रमसह लोकप्रिय UPSC तयारी पुस्तकांचीही मदत घेतली.”

UPSC Success Story of IAS Ishita Rathi

उमेदवारांनी वेळेवर तयारी करण्याचा दिला सल्ला

या परीक्षेत इशिता दोनदा नापास झाल्यानंतर, मात्र तिसऱ्या प्रयत्नात तिला यश मिळाले. तिला स्वतःला खात्री नव्हती की ती इतकी चांगली रँक मिळवेल. IAS इशिता राठीने UPSC परीक्षेत 2021 मध्ये 8वी रँक मिळवली. UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या इच्छूकांसाठी ती म्हणते; “ही एक अशी (UPSC Success Story) परीक्षा आहे जिथे उमेदवारांना सर्व विषयांची माहिती असणे आवश्यक आहे तसेच वेळेवर तयारी करणे आवश्यक आहे. आत्मविश्वासाने आणि सकारात्मक विचाराने तयारी करणे ही यशाची गुरुकिल्ली आहे.” इशिता राठी तिच्या यशाचे श्रेय तिच्या आई-वडील आणि मित्रांना देते. त्यांच्या पाठबळामुळेच ती इथपर्यंत पोहोचू शकली असे ती म्हणते.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com