करिअरनामा ऑनलाईन। केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा 2021 चा निकाल (UPSC Success Story) जाहीर केला, ज्यामध्ये पहिल्या तीन स्थानांवर महिलांचा समावेश आहे. श्रुती शर्मा प्रथम तर अंकिता अग्रवाल व गामिनी सिंगला यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे. पंजाबच्या गामिनी सिंगलाने अवघ्या दुसऱ्या प्रयत्नातच हि परीक्षा पास केली आहे. आपल्या यशाचे श्रेय ती तिच्या वडिलांना देते. पाहूया गामिनीच्या IAS होण्याच्या वाटचालीविषयी…
पंजाबची गामिनी
पंजाबमधील आनंदपूर साहिब येथे गामिनी राहते. तिचे आई-वडील हिमाचल प्रदेश सरकारमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. कॉम्प्युटर सायन्समध्ये B.Tech पदवी घेतलेल्या गामिनीने समाजशास्त्र हा ऐच्छिक विषय ठेवला होता. परीक्षेच्या निकालामुळे ती खूप खूश आहे. ती म्हणते की नागरी सेवेत अधिकारी होण्याचं स्वप्न सत्यात उतरले आहे.
“लोककल्याण करायचं आहे” (UPSC Success Story)
गामिनीने भारतीय प्रशासकीय सेवेची (IAS) निवड केली आहे. तिला या पदाच्या माध्यमातून देशाच्या विकासासाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी काम करायचे आहे; असे ती सांगते. गामिनी सिंगलाने तिच्या दुसर्याच प्रयत्नात हि परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
स्व-अभ्यासावर दिला भर
गामिनीने यापूर्वी एकदा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. हि परीक्षा देण्याचा गामिनीचा हा दुसरा प्रयत्न होता. नागरी सेवा परीक्षेत तिने समाजशास्त्र हा तिचा पर्यायी विषय म्हणून निवडला आणि तिने यासाठी चांगली तयारी केली. गामिनीने अभ्यासाच्या पूर्ण प्रवासात स्वयं अध्ययनावर भर दिला. स्वयं अध्ययनाचा फायदा झाला असल्याचे ती सांगते.
अभ्यासात वडिलांचा महत्त्वाचा वाटा
गामिनी सांगते की, ती दिवसातून नऊ ते दहा तास अभ्यास करायची. पटियाला येथील विनोद सरांकडून तिने प्रशिक्षण घेतले. परीक्षेच्या तयारीत तिच्या वडिलांचा मोलाचा वाटा होता. तिच्या वडिलांनी गामिनीच्या अभ्यासाची पूर्ण काळजी घेतली होती. ती तिच्या यशाचे श्रेय वडिलांच्या मेहनतीला देते. गामिनीचे आई-वडील हिमाचल प्रदेश सरकारमध्ये वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत आहेत.
महिला हवं ते साध्य करू शकतात
यंदा UPSC परीक्षेत महिलांचा दबदबा पाहायला (UPSC Success Story) मिळाला आहे. गामिनीला या परीक्षेतील 3 टॉपर उमेदवारांबद्दल विचारले असता, ती म्हणाली की यावरून हे दिसून येते की महिला त्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाने काहीही साध्य करण्यास सक्षम आहेत. त्यामुळे समाजात महिलांचे स्थान अढळ आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com