UPSC Success Story : दिवसभर काम.. घरी आलं की अभ्यास; आधी डॉक्टरकी नंतर UPSC; जळगावची तरुणी बनली IAS

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । असे म्हणतात की एखाद्या व्यक्तीला (UPSC Success Story) आपल्या भाविष्याबाबत असे काही संकेत मिळतात की पुढे त्यांचे आयुष्यच बदलून जाते. कोरोना काळात एका डॉक्टरसोबत असेच काहीसे घडले आणि ती डॉक्टर पुढे जावून IAS अधिकारी बनली आहे. मुंबईच्या के. एम. हॉस्पिटलमध्ये 6 वर्षे नोकरी केल्यानंतर तिने UPSC परीक्षा पास केली आणि या परीक्षेत तिने संपूर्ण भारतात 51 वा क्रमांक मिळवला आहे. हॉस्पिटलमध्ये नोकरी करण्यासोबतच अभ्यास करून तिने हे स्थान मिळवलं आहे. आपण बोलत आहोत डॉ. नेहा राजपूत (IAS Dr. Neha Rajput) यांच्याविषयी…

UPSC परीक्षेत देशात मिळवला 51 वा क्रमांक
IAS नेहा राजपूत मुळची जळगाव, महाराष्ट्राची रहिवासी आहे. 26 वर्षीय डॉ. नेहा राजपूत हिने 2024 च्या UPSC नागरी सेवा परीक्षेत संपूर्ण भारतातून रँक 51 मिळवला आहे. 2016 मध्ये त्यांनी MBBS मध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी मुंबई (परळ) येथील महानगरपालिकेच्या के. ई. एम. हॉस्पिटल आणि (UPSC Success Story) मेडिकल कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले आहे. एमबीबीएस शिक्षण पूर्ण करून इंटर्नशिप केल्यानंतर डॉ. नेहा फॉरेन्सिक विभागात रुजू झाल्या. ती असे सांगते की, “IAS अधिकारी होणे म्हणजे निर्णय घेण्यामध्ये विविधता आणि शक्ती असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणानंतर मला नक्कीच आरोग्य क्षेत्रात काम करायला आवडेल.”

कोविड काळात UPSC कडे कल वळला
डॉ. नेहा राजपूतने रुग्ण सेवा करण्याच्या उद्देशाने डॉक्टरी पेशा निवडला. रुग्णांवर उपचार करून त्यांना आजारातून बरे करत असताना तिचे मन नागरी सेवेकडे वळले. कोरोना काळात तिच्या मनात नागरी सेवेत सामील होण्याची कल्पना आली. वैद्यकीय क्षेत्रातील इंटर्नशिप संपताच तिने UPSC CSE परीक्षेची तयारी सुरू केली.

दिवसा काम आणि घरी आलं की अभ्यास
नेहाने नोकरी संभाळून यूपीएससीची तयारी केली. दिवसा काम आणि घरी आलं की अभ्यास करणं असं नियोजन सुरु होतं. या मेहनतीचं नेहाला फळ मिळालं. यूपीएससीमध्ये तिने ऑल इंडिया 51 वा क्रमांक मिळवला आहे.

कोचिंगऐवजी निवडला टॅबलेट कोर्स (UPSC Success Story)
वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर म्हणून काम करत असताना नेहाने UPSC परीक्षेची तयारी सुरू करण्याचे धाडस केले. डॉक्टर म्हणून जबाबदारी पार पाडत असताना नेहाला अभ्यासासाठी वेळेची कमतरता भासत होती. या समस्येवर मात करण्यासाठी नेहाने पारंपारिक कोचिंग घेण्याऐवजी टॅबलेट कोर्सचा पर्याय निवडला. तिने मानववंशशास्त्र हा विषय वैकल्पिक विषय म्हणून निवडला. हा विषय वैद्यकीय शास्त्राशी संबंधित होता त्यामुळे तिला अभ्यास करणं सोपं गेलं. MBBS ते UPSC या प्रवासात तिला तिचे कुटुंबीय, मित्रमंडळी आणि इतर सहकाऱ्यांची मोठी साथ मिळाली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com