UPSC Success Story : थकवून सोडणारी 12 तासाची ड्यूटी; दिवसभर अभ्यास; हार न मानता क्रॅक केली UPSC; बनली IAS

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । एमबीबीएसचा अभ्यास हा म्हणावा (UPSC Success Story) तितका सोपा अभ्यास नाही. यासाठी जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असलेली NEET परीक्षा पास होणे सक्तीचे आहे. आपल्याकडे एका कर्तबगार मुलीचे उदाहरण आहे, जिने NEET परीक्षा पास करून MBBS पूर्ण केले आणि ती डॉक्टर बनली. नंतर तिने सरकारी रुग्णालयात प्रॅक्टिस केली आणि UPSC परीक्षेची तयारी केली आणि ती आता IAS अधिकारी झाली. IAS डॉ. अंजली गर्ग (IAS Dr. Anjali Garg) यांची यशोगाथा वाचाच

आधी MBBS नंतर UPSC
IAS डॉ. अंजली गर्ग या चंदीगडच्या रहिवासी आहेत. त्यांचा जन्म 14 सप्टेंबर 1996 रोजी झाला. व्यापारी पार्श्वभूमी असलेल्या या मुलीच्या कुटुंबातील कोणीही यापूर्वी नागरी सेवेत सामील झाले नाही. सरकारी नोकरीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना तिने स्वतःचा मार्ग स्वतःच तयार केला आणि देशातील सर्वोच्च (UPSC Success Story) सरकारी अधिकारी पद मिळवून आयुष्यात तिने एक खास स्थान प्राप्त केले आहे. चंदीगडच्या या तरुणीने पहिल्यांदा डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले, मग तिने आणखी एक स्वप्न पाहिले आणि एक पाऊल पुढे जात आपल्या मेहनतीच्या जोरावर तिने हे दुसरे स्वप्नही साकार केले.

शाळेपासूनच हुशार आहेत अंजली
डॉ. अंजली गर्ग यांनी चंदीगड येथील शाळेतून 10वी आणि 12वीचे शिक्षण पूर्ण केले आहे. 10वी बोर्डाच्या परीक्षेत त्यांनी मेरीट मिळवलं. त्यानंतर बारावीची परीक्षा दिली. यामध्ये त्यांना 96 टक्के गुण मिळाले आहेत. त्यानंतर त्यांनी NEET परीक्षा उत्तीर्ण केली आणि दिल्लीतील VMMC आणि सफदरजंग हॉस्पिटलमधून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. डॉक्टर झाल्यानंतर त्यांनी यूपीएससी (UPSC) परीक्षेची तयारी सुरू केली आणि त्यातही यश मिळवले.

IAS अधिकारी होण्याच्या मार्गात अनेक अडचणी (UPSC Success Story)
डॉक्टर ते आयएएस अधिकारी होण्याचा त्यांचा प्रवास काही अडचणींनी भरलेला होता. वैद्यकीय पार्श्वभूमी असल्याने अंजली गर्ग यांच्यासाठी नागरी सेवेचा अभ्यास करणे तसे कठीण होते. UPSC अभ्यासातील अनेक विषयही त्यांच्यासाठी पूर्णपणे नवीन होते. सुरुवातीला त्यांना मॉक टेस्टमध्ये जास्त गुण मिळवता आले नाहीत. मग त्यांनी आपली रणनीती बदलली आणि दुप्पट मेहनत घेऊन संकल्पना क्लिअर करायला सुरुवात केली. अखेर त्यांना मेहनतीचे फळ मिळाले आणि 2022 च्या यूपीएससी परीक्षेत त्यांनी यश मिळवले. MBBS केल्यामुळे त्यांनी वैद्यकशास्त्र हा त्यांचा ऐच्छिक विषय ठेवला होता. त्या UPSC CSE 2022 मध्ये मेडिकल सायन्स टॉपर ठरल्या आहेत.
यूपीएससी परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात अंजली गर्ग नापास झाल्या मात्र दुसऱ्याच प्रयत्नात त्यांनी 79 वी रँक मिळवत त्या IAS अधिकारी बनल्या. कोविड काळात त्यांनी यूपीएससी परीक्षेचा पहिला प्रयत्न केला. हा काळ त्यांच्यासाठी आव्हानांनी भरलेला होता कारण त्यांच्या पालकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर कोरोनामुळे यूपीएससीची परीक्षाही पुढे ढकलण्यात आली.

12 तासाच्या ड्यूटीनंतर अथकपणे केला अभ्यास
MBBS पूर्ण केल्यानंतर अंजली दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप करायच्या. या दरम्यान हॉस्पिटल ड्युटी, करोलबाग येथे कोचिंग, स्व-अभ्यास आणि मित्र आणि मनोरंजनाचा (UPSC Success Story) वेळ यामध्ये सांगड घालताना त्यांना खूप संघर्ष करावा लागला. त्या स्त्रीरोग आपत्कालीन विभागात रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करायच्या. यावेळी सलग 12 तास ड्यूटी, नंतर आराम न करता कोचिंग क्लासला जावून दिवसभर तेथे अभ्यास करणे; असा त्यांचा नित्यक्रम सुरू होता. न थांबता नोकरी आणि अभ्यास सुरू असल्यामुळे अनेकदा त्या आजारी पडत. तरीही हार न मानता हॉस्पिटलमध्ये ड्युटी केली आणि यूपीएससी परीक्षेचा अभ्यास त्यांनी सुरूच ठेवला.
सध्या त्या हिमाचल प्रदेशातील धरमशाला येथे सहाय्यक आयुक्त (UT) म्हणून कार्यरत आहेत. डॉ. अंजली गर्ग या 2023 बॅचच्या IAS अधिकारी आहेत. इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी मूलभूत संकल्पनांवर घट्ट पकड ठेवली, अनेक मॉक टेस्ट सोडवल्या आणि केलेल्या अभ्यासाची पुन्हा पुन्हा उजळणी केली.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com