UPSC Success Story : सिक्युरिटी गार्डच्या मुलाचा UPSC परीक्षेत डंका; 14 तास अभ्यास करुन मिळवलं IAS पद

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । “माझा उर अभिमानाने भरून आला आहे (UPSC Success Story) कारण आजूबाजूचे लोक मला IAS अधिकाऱ्याचे वडील म्हणून ओळखतात; याचा मला खरंच खूप आनंद वाटतो. पण या आनंदाची खरी भागिदार माझी पत्नी आहे. मी ड्युटीवर असायचो तेव्हा माझी पत्नी घरच्या कामांसोबतच मुलाच्या अभ्यासाकडेही पूर्ण लक्ष देत असे. ती मुलाला त्याच्या अभ्यासासाठी सतत प्रोत्साहन द्यायची. या यशाचे संपूर्ण श्रेय माझ्या पत्नीला जाते…” हे बोल आहेत एका शाळेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या वडिलांचे; ज्याच्या मुलाने जिवतोड मेहनत करुन UPSC मध्ये रॅंक मिळवली आहे. अतुल सिंग असं या तरुणाचं नाव आहे.

मुलानं अनपेक्षित यश मिळवलं
आज आपण अतुल सिंग यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. अतुल यांनी २०२४ मध्ये जाहीर झालेल्या UPSC गुणवत्ता यादीत संपूर्ण देशात ६७ वा क्रमांक मिळवला आहे. अतुल यांची (UPSC Success Story) यशोगाथा पूर्णपणे वेगळी आहे. त्यांच्या या प्रवासात स्वतःच्या मेहनतीपेक्षा त्यांच्या कुटुंबाचा संघर्ष अधिक आहे. अतुल यांचे कुटुंब बिहारमध्ये राहत होते, पण त्यांचे वडील पवनकुमार सिंह नोकरी आणि मुलांच्या शिक्षणासाठी ओडिशामध्ये आले होते. कुटुंबातील एकमेव कमावता व्यक्ती असलेले पवन सिंह भद्रक येथील शाळेत सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करत होते. एका सुरक्षा रक्षकाचा मुलगा एक दिवस IAS अधिकारी होऊन आपल्या वडिलांचे नाव मोठे करेल असे त्यावेळी कुणालाही वाटले नव्हते.

दिवसातून 12 ते 14 तास अभ्यास (UPSC Success Story)
अतुल सिंग यांनी 67 वी रँक मिळवली आहे. याच्या आधारे अतुल सिंग यांना IAS कॅडर मिळणार हे निश्चित. डोळ्यात आनंदाश्रू घेऊन अतुलचे वडील आपल्या मुलाची शौर्यगाथा सर्वांना सांगत आहेत. आपल्या मुलाबद्दल बोलताना पवनकुमार सिंह म्हणतात; “UPSC परीक्षा देवून IAS होण्यासाठी अतुल दिवसातून 12 ते 14 तास अभ्यास करायचा. इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने किती कष्ट घेतले हे आमच्या कुटुंबाशिवाय कोणालाही माहीत नाही. एखादे मूल यशस्वी झाले तर वडिलांसाठी त्या यशावर आनंदाश्रू ढाळण्यापेक्षा अधिक मौल्यवान क्षण कोणता असेल?”

‘बाळाचे पाय पाळण्यात दिसले होते’
अतुलने मिळवलेल्या यशाची चर्चा सर्वदूर पोहचली आहे. त्यांच्या वडिलांसोबत शाळेत काम करणारा आणखी एक कर्मचारी सांगतो, “अतुलच्या यशात पवन सिंगचा सर्वात मोठा वाटा आहे. आपल्या (UPSC Success Story) मुलांना उत्तम शिक्षण मिळावे म्हणून ते बिहारहून ओडिशातील भद्रक येथे आले. सुरक्षा रक्षक म्हणून त्यांनी हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात रात्रंदिवस मेहनत घेतली. आपला मुलगा अतुल एक दिवस नक्कीच काहीतरी बनणार हे कदाचित पवन सिंग यांना माहीत होते आणि म्हणूनच त्यांनी मुलाच्या अभ्यासात कोणतीही कमतरता येऊ दिली नाही. मधल्या काळात त्यांच्या मुलाला रिलायन्समध्ये नोकरी मिळाली होती; पण तो UPSCच्या तयारीतच व्यस्त राहिला.”

अतुलचे यश सर्वांसाठी प्रेरणा देणारे (UPSC Success Story)
पवन सिंह ज्या शाळेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात त्या शाळेचे मुख्याध्यापक अतुलच्या यशाने आनंदी झाले आहेत. ते म्हणतात; “जेव्हा मी पवन सिंगच्या चेहऱ्यावर हसू आणि अभिमान पाहतो तेव्हा मला आनंद होतो. अतुलचे हे यश त्यांच्यासाठी उदाहरण ठरावे ज्यांना वाटते की केवळ श्रीमंत कुटुंबातील मुले किंवा सुशिक्षित व्यक्तीच IAS किंवा IPS होवू शकतात. मी प्रत्येक मुलांच्या पालकांना सांगेन की, त्यांनी आपल्या मुलांना सुरुवातीपासूनच योग्य मार्गदर्शन करावे. त्यांना अतुलसारख्या तरुणांच्या प्रेरणादायी कथा सांगा. अतुलने ज्या प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले आणि IAS पदापर्यंत मजल मारली आहे; ही बाब तरुण पिढीसाठी नक्कीच प्रेरणा देणारी ठरणार आहे.”
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com