UPSC Success Story : रॉकेलच्या दिव्याखाली केला अभ्यास; आधी IRS नंतर झाले IAS

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । कोणीतरी बरोबरच म्हटले आहे (UPSC Success Story) की, जर तुमच्यामध्ये एखादी गोष्ट करण्याची जिद्द असेल तर वाईट परिस्थिती देखील तुमच्या यशाच्या मार्गात अडथळा आणू शकत नाही. IAS अंशुमन राज (IAS Anshuman Raj) यांची कहाणी सुध्दा अशीच आहे. त्यांनी केवळ सेल्फ स्टडीच्या आधारावर भारतातील सर्वात कठीण समजली जाणारी UPSC (UPSC) नागरी सेवा परीक्षा पास केली आहे. ही परीक्षा ते एकदा नव्हे तर दोनदा उत्तीर्ण झाले आहेत. ते आधी आयआरएस (IRS) आणि नंतर आयएएस (IAS) अधिकारी झाले आहेत.

रॉकेलच्या दिव्याच्या प्रकाशात केला अभ्यास
आज आपण अशाच एका व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी (UPSC Success Story) खेडे गावात राहून देशातील सर्वात कठीण अशी UPSC सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा पास केली आणि ते IAS अधिकारी बनले. त्यांच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता. अंशुमन हे बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील एका छोट्या गावातील रहिवासी आहेत. गावातीलच नवोदय विद्यालयातून त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. रॉकेलच्या दिव्याच्या उजेडात त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. यानंतर ते 12 वीच्या अभ्यासासाठी JNV रांची येथे गेले.

कठोर परिश्रम आणि जिद्दीने स्वप्न पूर्ण केले (UPSC Success Story)
अंशुमन राज यांची कौटुंबिक पार्श्वभूमी अतिशय सामान्य आहे. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यांना लहानपणापासून म्हणाव्या तशा मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत. तरी हार न मानता मेहनतीने, जिद्दीने आणि आई-वडिलांच्या आशीर्वादाने त्यांनी UPSC परीक्षेत भरघोस यश मिळवले. त्यांनी केलेली कामगिरी तरुणांसाठी प्रेरणा ठरत आहे.

आधी IRS आणि नंतर झाले IAS (UPSC Success Story)
अंशुमन यांनी घरीच सेल्फ स्टडी करुन यूपीएससी परीक्षेची तयारी करण्याचा विचार केला आणि पहिल्याच प्रयत्नात ती परीक्षा पासही केली. त्यावेळच्या निकालाच्या दर्जाप्रमाणे त्यांना आयआरएस (IRS) पद मिळाले. पण, हे पद मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा परीक्षा देण्याचा विचार केला कारण त्यांचे खरे उद्दिष्ट आयएएस (IAS) अधिकारी बनण्याचे होते. मात्र त्यानंतरच्या दोन प्रयत्नांत त्यांना यश मिळाले नाही. परंतु अपयश आले तरी न खचता त्यांनी परीक्षेची तयारी सुरूच ठेवली. 2019 साली ते परीक्षेच्या चौथ्या प्रयत्नात UPSC नागरी सेवा परीक्षा 107 व्या क्रमांकाने पास झाले आणि अखेर IAS होण्याचे त्यांचे ध्येय पूर्ण झाले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com