UPSC Success Story : निकालापूर्वीच आई-वडील जग सोडून गेले; मुलानं दिलेलं वचन पाळलं आणि ठरला UPSC टॉपर; अनिमेषची कहाणी तुम्हाला भावूक करेल

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । “स्वप्नातही मी UPSC सारख्या (UPSC Success Story) परीक्षेत देशात 2 रा क्रमांक मिळवेन अशी अपेक्षा कधी केली नव्हती. या यशानंतर मला मिळत असलेले प्रेम आणि कौतुक पाहून मी कृतज्ञतेने भारावून गेलो आहे. लोक माझ्याकडे आदराने पाहू लागले आहेत; आणि या अनुभवाने मला खूप छान आणि आभाळाला हात टेकल्यासारखे वाटत आहे.” हे उद्गार आहेत अनिमेष प्रधान याचे. जाणून घेऊया IAS अनिमेष प्रधान (IAS Animesh Pradhan) यांच्या संघर्षाची आणि यशाची कहाणी…

देशात सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या UPSC परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवणे ही काही किरकोळ कामगिरी नाही. अनिमेषने ही किमया केली आहे. पूर्णवेळ नोकरी करून त्याने हे यश संपादन केले आहे. अनिमेषची कहाणी जिद्द, स्वत:वरचा अतूट विश्वास, मेहनत आणि विचारातील साधेपणा यावर आधारित आहे.

एनआयटीमधून केले इंजिनीअरिंग (UPSC Success Story)
अनिमेषने 2021 मध्ये एनआयटी राउरकेला येथून संगणक विज्ञानात B. Tech पदवी पूर्ण केली. यानंतर तो इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये रुजू झाला. यूपीएससी प्रवासाबद्दल बोलताना अनिमेश सांगतो की, त्याला मिळालेले यश केवळ त्याच्या दोन वर्षांच्या तयारीमुळे मिळाले नाही; तर त्याचे संगोपन, शालेय शिक्षण, कॉलेज, मित्रपरिवार आणि तो ज्या वातावरणात वाढला आहे अशा अनेक घटकांनी या यशात मोठा हातभार लावला आहे.

आई- वडिलांना मुलाचं यश पाहता आलं नाही
अनिमेष सांगतो; “आयएएस अधिकारी व्हावे असे माझ्या आई-वडिलांचे स्वप्न होते. पण आपल्या मुलाने मिळवलेले मोठे यश पाहण्यासाठी ते आता या जगात नव्हते. मी 11 वीत शिकत असताना वडिलांना गमावलं ज्यांनी माझ्या मनात नागरी सेवांची कल्पना रुजवली होती. माझी आई बऱ्याच काळापासून (UPSC Success Story) टर्मिनल कॅन्सरशी झुंज देत होती आणि परीक्षेचा निकाल जाहीर होण्याच्या एक महिना आधीच तिचे निधन झाले. कॅन्सरशी लढा देताना आई ज्या परिस्थितीतून जात होती त्या तुलनेत मी करत असलेले प्रयत्न मला लहान वाटत होते. माझ्या विजयासाठी आईने नेहमीच स्वतःचे बलिदान दिले. मी मिळवलेलं यश हे माझ्या आई-वडिलांचा विजय आहे आणि मी तो आनंद साजरा करत आहे.”

कष्टाशिवाय पर्याय नाही
UPSC परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना सल्ला देताना अनिमेष सांगतो की नागरी सेवा परीक्षा अत्यंत व्यक्तिनिष्ठ आहे आणि यामध्ये नशिबाचा खूप मोठा भाग आहे. प्रत्येक उमेदवाराने त्यांनी त्यांची ऊर्जा, संसाधने आणि वेळ त्यांच्या नियंत्रणात असलेल्या गोष्टींवर केंद्रित केले पाहिजे. परीक्षेची तयारी आणि कठीण काळात नेहमी प्रेरित राहता आलं पाहिजे. या प्रवासात तुम्हाला यशापेक्षा अपयश जास्त दिसेल, पण मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही.”

… तर यश मिळण्याची शक्यता जास्त
अनिमेष सांगतात; “नागरी सेवांमध्ये निवडीचा मार्ग कठीण आहे आणि जसजशी तुम्ही प्रगती करत जाल तसतसे प्रयत्न अधिक कठीण होत जाईल, परंतु तुमची कारणे आणि हेतू पक्का असेल, तर तुमच्या यशाची शक्यता खूप जास्त आहे यात शंका नाही.”

स्वयंपाकाची विशेष आवड
स्वतःबद्दल बोलताना अनिमेष सांगतो; “मला लेख लिहायला आणि पेंटिंग करायला आवडते. नृत्य आणि स्वयंपाक हे माझे इतर छंद आहेत. मला कॉस्मोपॉलिटन राहणे, विविध संस्कृती (UPSC Success Story) आणि पाककृती शोधणे आवडते. कंटाळा आला की, मी भारतीय संसदेतील वादविवाद पाहतो. मला नॉन-फिक्शन पुस्तके जास्त आवडतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com