UPSC Success Story : रिझर्व्ह बँकेची नोकरी सोडून तरुणीचा UPSC मध्ये डंका; पहिल्याच प्रयत्नात पास होवून IAS बनली

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवारांना UPSC नागरी सेवा परीक्षा (UPSC Success Story) पास होण्यासाठी 2 ते 3 किंवा त्यापेक्षा जास्त प्रयत्न करावे लागतात. अनेक जण अगदी शेवटच्या प्रयत्नातही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नाहीत. शेवटी त्यांना दूसरा पर्याय शोधावा लागतो. पण आज आपण IAS अधिकारी अनन्या दास यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी अगदी पहिल्याच प्रयत्नात UPSCची नागरी सेवा परीक्षा पास केली आहे. त्यांनी 2015 मध्ये ही परीक्षा पास केली आणि अधिकारी बनल्या. आज त्या तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान बनल्या आहेत.

IAS अनन्या दास (IAS Ananya Das) यांनी IIT बॉम्बे मधून कॉम्प्युटर सायन्स मध्ये अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आहे. अभियांत्रिकी केल्यानंतर, त्यांनी UPSC नागरी सेवा परीक्षेची तयारी केली आणि संपूर्ण भारतात 16 वा क्रमांक मिळवून त्या पहिल्याच प्रयत्नात IAS अधिकारी बनल्या आहेत.

मूळची ओडिशाची रहिवासी (UPSC Success Story)
अनन्या या मूळच्या ओडिशा येथील रहिवासी आहेत. त्यांचा जन्म 15 मे 1992 रोजी झाला. त्यांचे वडील बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करत होते; आणि सध्या ते सेवानिवृत्त आहेत. अनन्या नेहमीच अभ्यासात हुशार राहिल्या आहेत. भारतीय तंत्रज्ञान संस्था, बॉम्बे (IIT Bombay) मधून त्यांनी संगणक विज्ञान विषयात B.Tech ची पदवी प्राप्त केली आहे. नंतर त्यांनी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ऑफ सायन्स, पिलानी (BITS Pilani) येथून अर्थशास्त्र विषयात M.Sc. पर्यंतच शिक्षण पूर्ण केलं.

उच्च शिक्षण घेवून केली नोकरी
बी.टेक पूर्ण केल्यानंतर काही काळ त्या एका बहुराष्ट्रीय कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून नोकरी करत होत्या. त्यानंतर, त्यांनी जयपूर येथे भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) मध्ये एक्झिक्युटिव्ह इंटर्न म्हणून 3 महिने काम केले आहे.

UPSCसाठी नोकरी सोडली
9 ते 5 च्या नोकरीत कामाचं समाधान मिळत नव्हतं. यानंतर त्या नागरी सेवा परीक्षेकडे वळल्या. अनन्या UPSC अभ्यासासाठी नेहमीच प्रेरित राहिल्या. नागरी सेवा परीक्षेच्या तयारीसाठी (UPSC Success Story) त्यांनी नोकरी सोडली. नोकरी सोडून अनन्या यांनी नागरी सेवा परीक्षेची इतकी कसून तयारी केली की पहिल्याच प्रयत्नात त्यांनी या परीक्षेत 16 वा क्रमांक पटकावला.

घटस्फोट आणि दुसरं लग्न
अनन्या सध्या संबलपूरच्या जिल्हाधिकारी म्हणून धुरा सांभाळत आहेत. अनन्या यांनी 2014 मध्ये आयएएस अधिकारी चंचल राणासोबत (IAS Chanchal Rana) लग्न केले. त्यांचे पहिले लग्न आयएएस अब्दुल अख्तर (IAS Abdul Akhtar) यांच्याशी झाले होते, परंतु लवकरच त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर त्यांनी दुसऱ्या लग्नाचा विचार केला.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com