UPSC Success Story : लंडनमधून शिक्षण; UPSC देवून मिळवली सलग 3 पदे; कोण आहे जिल्हाधिकारी अदिती गर्ग

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी खात्यात अधिकारी होणं प्रत्येकासाठी (UPSC Success Story) सोपं नसतं. सरकारी नोकरीत रुजू झाल्यानंतर अधिकाऱ्यांच्या या ना त्या कारणाने बदल्या होत असतात. बदली झाली की त्या अधिकाऱ्याला आपल्या कुटुंबासह दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत व्हावं लागतं. अलीकडेच मध्य प्रदेश सरकारने अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यानंतर एका IAS अधिकाऱ्याचे नाव खूप चर्चेत आले आहे. ही महिला अधिकारी आयएएस अदिती गर्ग (IAS Aditi Garg) आहे. ज्यांना मंदसौरचे जिल्हाधिकारी बनवण्यात आले आहे. याआधी त्या मुख्यमंत्री कार्यालयात उपसचिव म्हणून कार्यरत होत्या. जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी मंदसौर येथील पशुपतीनाथ मंदिरात जाऊन पूजा केली. परिसरात भरभराटीसाठी त्यांनी भगवान पशुपतीनाथ महादेवाची प्रार्थना केली.

2015 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी अदिती गर्ग या कटनी जिल्ह्यातील धारवारा गावच्या रहिवासी आहेत. त्यांचे वडील ओपी गर्ग हे मध्य प्रदेशचे पोलीस महासंचालकही राहिले आहेत.

UK विद्यापीठातून घेतले शिक्षण (UPSC Success Story)
IAS अदिती गर्गने 2024 मध्ये मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली. त्यानंतर ती उच्च शिक्षणासाठी यूकेला गेली. 2006 मध्ये त्यांनी वॉरविक विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. यानंतर त्यांनी UPSC परीक्षेसाठी प्रयत्न सुरू केले. UPSC परीक्षा पास होण्यासाठी किती कठोर मेहनत घ्यावी लागते हे तुम्हा आम्हा सर्वांनाच माहीत आहे. या कठीण परीक्षेत अदिती यांनी सलग 3 वेळा यश मिळवलं आहे.

सलग 3 परीक्षा पास केल्या
आदिती गर्ग यूकेमधून भारतात परत आल्या. त्यांनी UK विद्यापीठातून (UPSC Success Story) शिक्षण घेतलं आहे. भारतात येवून त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. त्या प्रथम IES आणि IRS अधिकारी बनल्या. यानंतर यूपीएससीमध्ये ५४ वा क्रमांक मिळवून त्या IAS झाल्या. 2020 मध्ये त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले आहे; “पाच वर्षांपूर्वी यूपीएससीUPSCच्या निकालाने माझे आयुष्य बदलले. यापूर्वी मी लंडनमध्ये व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम केले आहे. भारतात परतल्यानंतर संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा देवून प्रथम IES, नंतर IRS आणि त्या नंतर IAS सेवेत प्रवेश घेतला. या प्रवासात मला खूप काही शिकण्याचा अनुभव मिळाला आहे.”
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com