UPSC Success Story : रोजचा 15 ते 16 तास अभ्यास; 3 वेळा अपयश तरी हिंमत सोडली नाही; सासरच्या पाठिंब्यामुळे अभिलाषा बनल्या IAS

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC Success Story) नागरी सेवा परीक्षा ही देशातील सर्वात प्रतिष्ठित सेवांपैकी एक आहे. देशाच्या विविध भागातून लोक या परीक्षेची तयारी करतात आणि त्यात आपले नशीब आजमावतात. काही उमेदवारांना सुरुवातीलाच यश मिळते, तर काही उमेदवार अनेक प्रयत्नांनंतर यशाचे शिखर गाठतात. आज आम्ही तुमच्यासोबत अभिलाषा शर्माची (IAS Abhilasha Sharma) कहाणी शेअर करणार आहोत, जीने इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर UPSC कडे आपला मोर्चा वळवला. पहिल्या तीन प्रयत्नांमध्ये ती अपयशी ठरली. विशेष म्हणजे लग्न झाल्यानंतर तिने केलेल्या चौथ्या प्रयत्नात सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये ६८ वा क्रमांक मिळवून आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. आज आपण तिची यशोगाथा या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत.

दररोज 15 ते 16 तास अभ्यास (UPSC Success Story)
IAS अधिकारी अभिलाषा शर्मा या मूळच्या हरियाणाच्या रहिवासी आहेत. यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी करताना त्यांनी सुरुवातीच्या काळात अनेक आव्हानांना तोंड दिले. 2013 मध्ये त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. या परीक्षेत त्यांना सलग तीन वेळा अपयशाचा सामना करावा लागला. अभिलाषा यांनी अडचणीला न जुमानता पुन्हा तयारी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी यासाठी अभ्यासाचे काटेकोर वेळापत्रक पाळले आणि दररोज 15 ते 16 तास अभ्यासात घालवले, त्यांनी राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयांवर लक्ष केंद्रित केले.

अभिलाषा शर्मा यांचा परिचय
अभिलाषा शर्मा या सेक्टर १२, जुनी दिल्ली रोड, गुरुग्राम येथील रहिवासी आहेत. त्यांनी शालेय शिक्षण विज्ञान विषय घेऊन पूर्ण केले. यानंतर त्यांनी फरिदाबाद येथील एका खाजगी (UPSC Success Story) संस्थेतून B. Tech पदवी मिळवली.

2013 मध्ये सुरु केली UPSC तयारी
अभिलाषा शर्माने एका मुलाखतीत सांगितले की, त्यांनी 2013 मध्ये UPSC परीक्षेची तयारी सुरू केली होती. सुरुवातीला त्यांना ही परीक्षा नीट समजून घेण्यात अडचण आली. त्यांना अनेक विषयांमध्ये प्राविण्य नव्हते. अशा स्थितीत त्यांना या विषयांचा सुरुवातीपासून अभ्यास करावा लागला.

सलग तीन वेळा आले अपयश
अभिलाषा शर्मा या अभियोग्यता चाचणीत (Aptitude Test) कमकुवत होत्या. अशा परिस्थितीत जेव्हा त्यांनी परीक्षेचा पहिला प्रयत्न केला तेव्हा त्या प्रीलिम पास होऊ शकल्या नाही. मात्र त्यांनी हार मानली नाही. त्यांनी पुन्हा प्रयत्न केला आणि पुन्हा त्या अपयशी ठरल्या. दोनवेळा नापास झाल्यानंतर त्यांनी Aptitude Test कडे अधिक लक्ष दिले, मात्र तिसऱ्या प्रयत्नातही त्यांना यश मिळाले नाही.

अखेर चौथ्या प्रयत्नात परीक्षा पास (UPSC Success Story)
अभिलाषा शर्मा यांनी तीनवेळा अपयश पाहिल्यानंतर पुन्हा स्वतःमधील उणिवांवर काम केले. चालू घडामोडींसाठी नियमितपणे वर्तमानपत्र वाचण्यासोबतच पुस्तकांचेही वाचन केले. यासोबतच भूतकाळातील चुकांमधून धडा घेत त्यांनी तयारीवर जास्तीत जास्त भर दिला. यावेळी त्यांनी प्रिलिम पास केली आणि मुख्य परीक्षेपर्यंत पोहोचल्या. तसेच, मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर त्या मुलाखतीला हजर राहिल्या. येथे त्यांची मुलाखत रेल्वे सेवेत असलेल्या विनय मित्तल यांच्या बोर्डात झाली. मुलाखतीमध्ये त्यांना त्याच्या छंद आणि अभियांत्रिकी पार्श्वभूमीबद्दल इतर प्रश्न विचारण्यात आले. 2018 मध्ये त्यांनी नागरी सेवा परीक्षा पास करत संपूर्ण भारतात 68 वा क्रमांक मिळवला.

सासरच्या लोकांनी साथ दिली
अभिलाषा शर्माच्या म्हणण्यानुसार, तिला परीक्षेच्या तयारीदरम्यान (UPSC Success Story) सासरच्या लोकांकडून खूप पाठिंबा मिळाला. तिने बिझनेसमन अंकितशी लग्न केले होते, जो तिला नेहमी अभ्यासाच्या तयारीसाठी प्रेरित करत असे. तसेच सासरच्या घरी सासू-सासरे यांनी अभिलाषा अभ्यास करताना घरातील कामे अभ्यासाच्या आड येऊ दिली नाहीत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com