UPSC Success Story : घरच्यांना लग्नाला नकार दिला; नोकरीसह अभ्यास केला अन् अभिलाषा बनली IAS…

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । अभिलाषा यांचा IAS होण्याचा (UPSC Success Story) प्रवास संघर्षांनी भरलेला आहे. तेलंगणा केडरच्या आयएएस अधिकारी अभिलाषा अभिनव मूळच्या पाटणा, बिहार येथील आहेत. अभिलाषा UPSC नागरी सेवा परीक्षेत 2017 मध्ये 18 वा क्रमांक मिळवून IAS बनल्या आहेत.  केवळ यूपीएससी उत्तीर्ण होण्यासाठीच त्यांना संघर्ष करावा लागला नाही, तर त्या आधी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होतील आणि नंतरच लग्नाचा विचार करतील हा निर्णय त्यांच्या कुटुंबाला पटवून देण्यासाठीही त्यांनी मोठी धडपड केली.

माझं इतक्यात लग्न करु नका
नागरी सेवा परीक्षेची तयारी करणार्‍या मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणांना फक्त UPSC उत्तीर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागत नाहीत तर अनेक आघाड्यांवरही त्यांना संघर्ष करावा लागतो. ती जर एखादी मुलगी असेल तर हा संघर्ष आणखीनच वाढतो. बिहारच्या पाटणा येथील रहिवासी असलेल्या IAS अभिलाषा अभिनवची कहाणीही अशीच आहे. नोकरीसोबतच त्यांनी UPSC परीक्षेची तयारी केली. त्यांचे लवकर लग्न करु नये म्हणून आई-वडिलांना पटवून दिले आणि नंतर त्या स्वतः ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोहचू शकल्या आहेत.

B.Tech नंतर मिळाली नोकरी (UPSC Success Story)
अभिलाषा ही शालेय जिवनापासून हुशार विद्यार्थिनी होती. त्यांचे शालेय शिक्षण पाटणा येथून झाले. त्यांनी इयत्ता 10 वी परिक्षेत शाळेत टॉप केले होते तर बारावीत 84 टक्के गुण मिळवले होते. बारावीनंतर त्यांनी महाराष्ट्रातील ए. एस.  कॉलेजमधून B. Tech पूर्ण केले. अभ्यासासोबतच खेळातही अभिलाषा नेहमीच पुढे असायच्या. अभिलाषा यांना B.Tech पूर्ण केल्यानंतर नोकरी मिळाली तरीही त्यांची UPSC ची तयारी सुरुच होती.

IAS ऐवजी IRS पद मिळाले
अभिलाषा यांनी 2014 मध्ये UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेसाठी पहिला प्रयत्न केला होता. त्यांना पहिल्या प्रयत्नात पूर्व परिक्षेत अपयश आले; पण त्या खचल्या नाहीत. 2016 मध्ये त्यांनी UPSC चा दुसऱ्यांदा फॉर्म भरला. यावेळी त्यांनी संपूर्ण भारतात 308 वा क्रमांक पटकावला. त्यांना IAS ऐवजी IRS सेवा मिळाली.
IRS पद सोडून पुन्हा दिली परीक्षा (UPSC Success Story)
अभिलाषा दुसऱ्या प्रयत्नात IRS होण्यात यशस्वी ठरल्या मात्र यावर त्यांचे समाधान झाले नाही. त्यांना IAS अधिकारीच व्हायचे होते. यानंतर त्यांनी UPSC 2017 मध्ये पुन्हा एकदा परीक्षा दिली. यावेळी त्यांनी स्वतःचे सर्व विक्रम मोडून 18 व्या रँकसह IAS होण्यात यशस्वी झाल्या. नोकरीसोबतच UPSC ची तयारी करण्यासाठी त्या म्हणतात की, ज्या उमेदवारांकडे ऐष आराम आहे त्यांनी त्याचा गैरवापर करु नये. जो वेळ मिळेल तो योग्य कामासाठी वापरा.

UPSC देणाऱ्यांना दिला मोलाचा सल्ला
नागरी सेवा परीक्षेच्या तयारीबाबत अभिलाषा म्हणतात; “या परीक्षेचे तीन महत्वाचे टप्पे लक्षात घ्या. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीची तयारी अगदी सुरुवातीपासूनच करा. टॉपर्स उमेदवारांच्या मुलाखती अवश्य पहा. जेणेकरून यश कसे मिळवता येते हे समजेल. धोरण तयार करा आणि अभ्यासावर (UPSC Success Story) लक्ष केंद्रित करा.”  त्या पुढे म्हणतात; “ज्यांना नोकरीसोबतच UPSC ची तयारी करायची आहे त्यांनी वीकेंडचा लाभ घ्या. ऑफिसमध्ये जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा त्याचा अभ्यासासाठी चांगला उपयोग करा. मी ऑफिसला जाताना फोनवर अभ्यास करायचे. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देवू नका आणि स्वतःशी प्रामाणिक रहा.”
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com