UPSC Success Story : बड्या कंपनीत बडा थाट!! पण पठ्ठ्यानं 28 लाख पगारावर सोडलं पाणी; पहिल्याच झटक्यात असा झाला IAS

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । कोणाला वाटत नाही की आपल्याकडे (UPSC Success Story) लाखोत पैसे मिळवून देणारी नोकरी असावी. स्वतःकडे  घर, गाडी, बंगला, नोकर-चाकर असावेत; अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. पण समाजात असेही काही लोक आहेत, जे पूर्णपणे वेगळा मार्ग निवडतात. अनेक अशी उदाहरणे आहेत ज्यांनी मोठ्या पगाराची नोकरी सोडून आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्यास सुरू केले आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला अशाच एका व्यक्तीविषयी सांगणार आहोत, ज्याने तब्बल 28 लाख रुपये पगाराची नोकरी सोडून UPSC परीक्षेची तयारी केली आणि त्यात पहिल्याच प्रयत्नात यशही मिळवले. या तरुणाचे नाव आहे आयुष गोयल आहे. तो सध्या त्याच्या आवडीच्या IAS पदावर काम करत आहे.

मिळालं होतं 28 लाखाचं पॅकेज (UPSC Success Story)
आयुषने दिल्लीतील सरकारी शाळेतून शिक्षण घेतले. यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या हंसराज कॉलेजमधून इकॉनॉमिक्स ऑनर्समध्ये पदवी प्राप्त केली. पदवी नंतर आयुषने कॅट परीक्षेत यश मिळवले आणि केरळमधील आयआयएम कोझिकोड येथे एमबीएसाठी प्रवेश घेतला. एमबीए (MBA) पूर्ण केल्यानंतर त्याने जेपी मॉर्गन कंपनीमध्ये अॅनालिस्ट म्हणून काम सुरू केले. आयुषला या पदावर काम करत असताना 28 लाख रुपये वार्षिक पगार मिळत होता.

वडील चालवतात किराणा मालाचे दुकान 
आयुषचे वडील सुभाष चंद्र गोयल किराणा मालाचे दुकान चालवतात, तर आई मीरा गोयल गृहिणी आहेत. आयुषला नोकरी लागल्यानंतर त्याच्या आई-वडिलांना खूप आनंद (UPSC Success Story) झाला होता. पण, आयुषने नोकरी सोडून UPSC ची तयारी करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना धक्का बसला. एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी सोडून आयुषने UPSC करण्याचा मार्ग निवडला होता. त्यामुळे ही परीक्षा पास करण्यासाठी कसून अभ्यास करायला लागणार होता. त्याच्यावर अभ्यासाचे खूप दडपण आले होते. IAS होण्यासाठी तो रात्रंदिवस अभ्यास करू लागला.

कोचिंग क्लास न लावता घरीच केला अभ्यास (UPSC Success Story)
आयुषने UPSCसाठी घरीच राहून अभ्यास केला. दीड वर्ष त्याचा अभ्यास सुरु होता. यासाठी त्याने कोणतेही प्रशिक्षण घेतले नाही; किंवा तो कोचिंग क्लासलाही गेला नाही. इंटरनेटवर व्हिडिओ पाहून, पुस्तके वाचून तो दररोज आठ ते दहा तास सतत अभ्यास करू लागला. त्याच्या कष्टाचे त्याला फळ मिळाले आणि परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात तो यशस्वी झाला. पहिल्याच प्रयत्नात आयुषने संपूर्ण देशातून 171 वा क्रमांक मिळवला आणि तो IAS अधिकारी झाला.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com