UPSC Success Story : सख्ख्या 4 भाऊ-बहिणींचा UPSC मध्ये डंका; तिघे IAS.. तर एक आहे IPS

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । UPSC परीक्षा इतकी अवघड आहे की लाखो (UPSC Success Story) उमेदवार वर्षानुवर्षे यासाठी तयारी करतात आणि कोचिंगही घेतात, पण तरीही काहीजण ही परीक्षा पास होवू शकत नाहीत. पण दुसरीकडे असं चित्र आहे, की काही उमेदवार या परीक्षेची अशाप्रकारे तयारी करतात की ते पहिल्याच प्रयत्नात परीक्षा पास होऊन IAS किंवा IPS अधिकारी बनतात. आज आम्ही तुम्हाला एकाच घरातील त्या चार भावा-बहिणींबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी देशातील सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण करून IAS आणि IPS पद मिळवले आहे.

दोन खोल्यांच्या घरात राहत होतं 6 माणसांचं कुटुंब
आपण जाणून घेणार आहोत उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील मिश्रा कुटुंबाबद्दल. या एकाच घरातील चारही भावा-बहिणींनी यूपीएससी परीक्षा पास करून सर्वोच्च मानले जाणारे (UPSC Success Story) आयएएस आणि आयपीएस पद मिळवले आहे. अनिल मिश्रा पत्नी आणि चार मुलांसह दोन खोल्यांच्या घरात राहत होते. त्यांना दोन मुले आणि दोन मुली असून त्यांची नावे योगेश, माधवी, लोकेश आणि क्षमा अशी आहेत.

वडिलांनी मुलांच्या शिक्षणात कोणतीही कमी पडू दिली नाही
वडील अनिल मिश्रा यांचे स्वप्न होते की आपल्या मुलांनी यशाच्या शिखरावर पोहचावं; म्हणून त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणात कोणतीही कसर सोडली नाही. त्यामुळे त्यांच्या मुलांनीही वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी कठोर मेहनत घेतली.

मोठा भाऊ आणि बहीण झाले IAS (UPSC Success Story)
सर्वप्रथम, UPSC परीक्षेला बसण्याचा निर्णय मोठा भाऊ योगेश मिश्रा यांनी घेतला. 2013 मध्ये त्यांनी ही परीक्षा दिली, त्यानंतर परीक्षेच्या राखीव यादीत त्यांची निवड झाली आणि त्यांना IAS पद मिळाले. भावाच्या यशानंतर बहीण माधवीनेही या परीक्षेची तयारी केली आणि पुढच्याच वर्षी 2014 मध्ये 62 वा क्रमांक मिळवून त्यासुध्दा IAS अधिकारी बनल्या.

लहान भावाने UPSC मध्ये मिळवला 44 वा क्रमांक
माधवीसोबतच धाकटा भाऊ लोकेश यानेही यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत नशीब आजमावले आणि राखीव यादीत आपले स्थान निर्माण केले. पण त्याने पुन्हा परीक्षा देण्याचा (UPSC Success Story) निर्णय घेतला आणि पुढच्याच वर्षी 2015 मध्ये UPSC परीक्षेत संपूर्ण भारतात 44 वी रँक मिळवली आणि तो आयएएस अधिकारी बनला.

लहान बहिणीने घेतला नागरी सेवेत जाण्याचा निर्णय
आपल्यापेक्षा मोठे तीनही भाऊ-बहीण आयएएस असताना धाकटी बहीण क्षमा गप्प बसणार नव्हती. तिने भाऊ लोकेश सोबत 2015 मध्ये UPSC परीक्षा देण्याचा पहिला प्रयत्न केला आणि यामध्ये तिने 172 वा क्रमांक मिळवला. यानंतर तिची डेप्युटी एसपी म्हणून निवड झाली. (UPSC Success Story)
क्षमा तिच्या कामगिरीवर समाधानी नव्हती, म्हणून ती पुन्हा एकदा यूपीएससी परीक्षेला बसली आणि यावेळी तिची आयपीएस पदासाठी निवड झाली. आज हे चारही सख्खे भाऊ-बहीण IAS आणि IPS बनून देशसेवा करत आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com