UPSC Success Story : ज्यांना मिळाली नाही शिपायाची नोकरी… तेच UPSC क्रॅक करुन बनले IAS

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । करिअरमध्ये उच्च पद गाठलेल्या प्रत्येक (UPSC Success Story) अधिकाऱ्याच्या संघर्षाची कहाणी प्रेरणादायक असते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका आयएएस अधिकाऱ्याची गोष्ट सांगणार आहोत, ज्यांनी कधी शिपायाची नोकरी मागितली पण एका अधिकाऱ्याने त्यांना शिपायाची नोकरी देण्यास नकार दिला.
वडील मजूर तर आई दृष्टिहीन (UPSC Success Story)
आज आपण पाहणार आहोत IAS अधिकारी मणिराम शर्मा यांची कहाणी. मणिराम शर्मा हे राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील बंदनगढ़ी गावचे रहिवासी आहेत. मणिराम यांचे वडील मोलमजुरी करायचे तर त्यांच्या आईला दिसत नव्हते. एवढेच नव्हे तर मणिराम यांना स्वतःलाही ऐकू येत नव्हते. त्यांना अभ्यासाची खूप आवड होती पण गावात शाळा नसल्याने अभ्यास करणे खूप अवघड होते. अभ्यासासाठी ते दररोज 5 किलोमीटर लांब चालत शाळेत जायचे.

 

बोर्डाच्या परिक्षेत अव्वल
मेहनतीचे फळ गोड असते, असे म्हणतात. मणिराम यांनी प्रचंड मेहनत घेत शाळेचा अभ्यास केला. त्यावेळी त्यांनी राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षेत पाचवा आणि बारावीच्या परीक्षेत सातवा क्रमांक पटकावला होता. मणिराम दहावी पास झाल्याचे कळल्यावर त्यांच्या वडीलांना खूप आनंद झाला. वडिलांनी (UPSC Success Story) मणिराम यांना आपल्या ओळखीच्या एका अधिकाऱ्याकडे नेले. माझा मुलगा दहावी पास झाला आहे, त्याला शिपाई म्हणून नोकरी द्या, असे त्यांनी अधिकाऱ्याला सांगितले. त्यावेळी त्या अधिकाऱ्याचे बोलणे ऐकून मणिराम यांच्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू तरळले. ते अधिकारी म्हणाले ‘मणिरामला ऐकू येत नाही. त्यामुळे घंटा किंवा कोणाचा आवाज त्याला ऐकू येणार नाही. त्यामुळे तो शिपाई कसा बनू शकतो?’
मुलांच्या शिकवण्या घेतल्या (UPSC Success Story)
त्यानंतर त्यांनी अलवर कॉलेजमधून पुढील शिक्षण घेतले. प्रसंगी शालेय मुलांची शिकवणीही घेतली. यामधून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांनी शिक्षणाचा आणि घरचा खर्च चालवला. त्यानंतर त्यांनी IAS होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. ते लिपिकाची परीक्षा देखील उत्तीर्ण झाले. यासह त्यांनी अल्वरमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर त्यांना पीएचडीसाठी शिष्यवृत्तीही मिळाली.

अखेर IAS झालेच
मणिराम यांनी 2005 मध्ये पहिल्यांदा UPSC परीक्षा उत्तीर्ण केली, परंतु बहिरेपणामुळे त्यांना नोकरी मिळू शकली नाही. यानंतर त्यांनी पुन्हा प्रयत्न केले आणि यावेळी त्यांना नोकरीही मिळाली पण पोस्ट आणि टेलिग्राफ खात्यात नोकरी देण्यात आली. मणिराम यांचे IAS होण्याचे स्वप्न उराशी बाळगून (UPSC Success Story) होते. असं म्हणतात की जो मेहनत करतो त्याला देवही मदत करतो. यावेळी मणिराम यांच्या कानाचे ऑपरेशन करण्यात आले, त्यानंतर त्यांना चांगले ऐकू येऊ लागले. आता 2009 मध्ये मणिराम यांनी पुन्हा UPSC परीक्षा दिली आणि यावेळी ते IAS झाले.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com