UPSC Prelims 2020 Date बाबत केंद्रीय लोकसेवा आयोगाची नवीन घोषणा

Get real time updates directly on you device, subscribe now.

नवी दिल्ली । केंद्रीय लोकसेवा आयोगाने आज कोरोनामुळे रखडलेल्या पूर्वपरीक्षा २०२० बाबत एक महत्वाची घोषणा केली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) आज पूर्वपरीक्षा २०२० वेळापत्रक ठरवण्याच्या अनुषंगाने एक आढावा बैठक घेतली होती. सदर बैठकीत यंदाच्या पूर्वपरीक्षेबाबत ५ जून रोजी निर्णय घेण्यावर निर्णय झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच सदर बैठकीत नागरी सेवा प्राथमिक परीक्षा व्यतिरिक्त, यूपीएससीच्या मुलाखतीची तारीख आणि अधिसूचना आणि इतर अनेक परीक्षांवर देखील चर्चा झाली असून याबाबतही लवकरच अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. UPSC Prelims 2020 Date

केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा २०२० नियोजित वेळापत्रकानुसार ३१ मे रोजी होणार होती. परंतु कोरोना विषाणूच्या साथीमुळे आणि लॉकडाऊन निर्बंधामुळे पुढे ढकलण्याची घोषणा करण्यात आली होती. २० मे रोजी पुन्हा एकदा या परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल आणि यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट http://www.upsc.gov.in वर लवकरच नव्या तारखा जाहीर केल्या जातील, असे आयोगाने म्हटले होते. त्यानुसार आज आयोगाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबत अधिसुचना जारी केली असू ५ जून रोजी देशातील कोरोना विषाणुची परिस्थिती पाहून परिक्षा वेळापत्रकाबाबतचा निर्णय कळवण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. UPSC Prelims 2020 Date

दरम्यान, आयएएस, आयपीएस अधिकारी होण्यासाठी इच्छुक लाखो उमेदवार नवीन परीक्षेच्या तारखेची प्रतीक्षा करीत आहेत. यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा ही देशातील सर्वात आव्हानात्मक स्पर्धा परीक्षा मानली जाते. लॉकडाऊन दरम्यान, उमेदवार विविध ऑनलाइन अध्यापन प्लॅटफॉर्मच्या मदतीने घरी तयारी करीत आहेत. यूपीएससी नागरी सेवा प्राथमिक परीक्षा 2020 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया 12 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान चालली. या परीक्षेच्या माध्यमातून भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) आणि भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) यासह इतर अखिल भारतीय सेवांसाठी अधिकाऱ्यांची निवड केली जाते. भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) आणि भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस), रेल्वे गट ए (भारतीय रेल्वे खाती सेवा), भारतीय टपाल सेवा आदी पदे यूपीएससी नागरी सेवांद्वारे भरली जातात. UPSC Prelims 2020 Date

हे पण वाचा -
1 of 18

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: