UPSC : UPSC NDA/CDS (2) 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी; ‘इथे’ करा डाउनलोड

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । UPSC परीक्षे संदर्भात (UPSC) महत्वाची अपडेट आहे. UPSC NDA/CDS (2) 2024 परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी ही महत्वाची बातमी आहे. UPSC ने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) (2) परीक्षा 2024 आणि संयुक्त संरक्षण सेवा (CDS) (2) दोन्ही परीक्षांचे प्रवेशपत्र आज (दि. 23) प्रसिद्ध केले आहे. UPSC ने upsconline.nic.in या अधिकृत वेबसाईटवर प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक सक्रिय केली आहे.

UPSC ने यापूर्वी NDA/CDS 2 परीक्षा आयोजित करण्याची तारीख जाहीर केली होती. आयोगाने 2024 सालासाठी जारी केलेल्या सुधारित परीक्षा वेळापत्रकानुसार, दोन्ही लेखी परीक्षा 1 सप्टेंबर रोजी एकाच दिवशी घेतल्या जाणार आहेत.

असं डाउनलोड करा प्रवेशपत्र (UPSC) –
1. उमेदवारांनी त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईट upsconline.nic.in ला भेट द्यायची आहे.
2. आता प्रवेश पत्र विभागात जावा.
3. नंतर या विभागात, उमेदवाराला त्यांच्या परीक्षा प्रवेशपत्राशी संबंधित लिंकवर क्लिक करावे लागेल.
4. नवीन पृष्ठावर, तुमचा नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख तपशील भरा आणि सबमिट करा.
5. उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र स्क्रीनवर पाहता येईल, त्याची प्रिंट घ्या.
6. प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर, उमेदवारांनी (UPSC) त्यावर दिलेले त्यांचे तपशील जसं की नाव, पालकांचे नाव, जन्मतारीख, फोटो या गोष्टी तपासा. यामध्ये काही त्रुटी आढळल्यास ताबडतोब आयोगाच्या हेल्पलाइनशी संपर्क साधा; अशा सूचना आयोगाकडून देण्यात आल्या आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com