UPSC मुख्य परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात; 11 नोव्हेंबर पर्यंत मुदत

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२० साठी डिटेल्ड अॅप्लिकेशन फॉर्म 1 (DAF-1) जारी केला आहे. यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२० मध्ये यशस्वी होणारे उमेदवार आता मुख्य परीक्षेसाठी अर्ज भरू शकतात.

यूपीएससीने आपले अधिकृत संकेतस्थळ upsconline.nic.in वर अॅप्लिकेशन फॉर्मची लिंक अॅक्टिव्ह केली आहे. फॉर्मची थेट लिंक या वृत्तात पुढे देण्यात येत आहे. त्या लिंकवर क्लिक करून सहजपणे अॅप्लिकेशन फॉर्म भरता येईल.अर्ज भरतानाच उमेदवारांना आपल्या महत्त्वाच्या कागदपत्रांची स्कॅन केलेली कॉपीदेखील अपलोड करायची आहे. ही प्रक्रिया ११ नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत पूर्ण करायची आहे.

आयोगाद्वारे निश्चित केलेल्या शेड्युलनुसार, मुख्य परीक्षा ८ जानेवारी २०२१ ला आयोजित केली जाईल. परीक्षेचे विस्तृत टाइमटेबल ई-अॅडमिट कार्डासह आयोगाच्या संकेतस्थळावर नंतर जारी केले जाईल.

परीक्षेचे ठिकाण – अहमदाबाद, ऐजवाल, प्रयागराज, बंगळुरु, भोपाळ, चंडीगड, चेन्नई, कटक, देहरादून, दिल्ली, दिसपुर, हैदराबाद, जयपुर, जम्मू, कोलकाता, लखनऊ, मुंबई, पटना, रायपुर, रांची, शिलॉन्ग, शिमला, तिरुवनंतपुरम, विजयवाडा या शहरांमध्ये परीक्षा होणार आहे.

येथे अर्ज कराclick here

अधिकृत वेबसाईट – upsconline.nic.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com