UPSC Exam : ‘आम्हाला आणखी एक संधी द्या; कोरोनामुळे आमचं नुकसान’; UPSC उमेदवारांचं सरकारला साकडं

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। देशातील लाखो तरुण स्पर्धा परीक्षांसाठी (UPSC Exam) जीव तोडून कष्ट घेतात; मात्र अनेकदा वयाची मर्यादा संपूनही काही विद्यार्थी पास होत नाहीत. वयाची मर्यादा संपल्यामुळे त्यांना परीक्षेचा अभ्यास सोडून द्यावा लागतो. कोरोना महामारीच्या काळात अनेक यूपीएससी परीक्षार्थींना वयाच्या अटीचा फटका बसला आहे. त्यामुळे यूपीएससी इच्छुकांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन आणखी एक संधी मिळण्याची मागणी केली आहे. या विद्यार्थ्यांच्या मते, कोविड महामारीमुळे त्यांची तयारी आणि अभ्यासावर परिणाम झाला आहे.

कोरोना महामारीच्या काळात अनेकदा लॉकडाउन करण्यात आलं होतं. त्यामुळे दुसऱ्या शहरात राहून यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना आपापल्या घरी परतावं लागलं होतं. याशिवाय, कोविडच्या काळात मानसिकता ठीक नसल्यामुळे अनेकांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करता (UPSC Exam) आलं नाही. याच काळात अनेकांनी वयाची मर्यादाही पार केली. त्यामुळे आता त्यांना परीक्षेला बसता येणार नाही. या सर्व बाबी लक्षात घेता केंद्रीय लोकसेवा आयोगानं यूपीएससी सीएसई परीक्षांसाठी आणखी एक संधी दिली पाहिजे, असं इच्छुक विद्यार्थ्यांचं मत आहे. त्यासाठी ट्विटरवर #UPSCExtraAttempt2023 हा ट्रेंडही चालवण्यात आला आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेचे उमेदवार परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी अतिरिक्त संधीची मागणी करत आहेत. यासाठी त्यांनी 19 डिसेंबर रोजी आंदोलन करण्याचं नियोजन केलं आहे. याशिवाय, सर्वोच्च न्यायालयात नव्यानं याचिका दाखल करण्याचा विचारही ते करत आहेत.

यापूर्वी, मार्च महिन्याच्या सुरुवातीला, सर्वोच्च न्यायालयानं सरकारला आपला विचार बदलण्याची आणि सीएसई इच्छुकांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची (UPSC Exam) शिफारस केली होती. सर्व उमेदवारांना संबंधित वयोमर्यादेत सवलत देऊन अतिरिक्त संधी दिली जावी, असं न्यायालयानं म्हटलं होतं.

2021मध्ये यूपीएससी मुख्य परीक्षेसाठी हजारो इच्छुक परीक्षा केंद्रांवर जमले होते. त्या वेळी कोविड -19 निर्बंध अस्तित्वात होते. तरीही परीक्षा घेण्यात आली. यामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आरोग्य धोक्यात आलं होतं. शिवाय, कोविड-पॉझिटिव्ह असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात (UPSC Exam) प्रवेश मिळाला नव्हता. त्यांच्यासाठी कोणतीही वेगळी व्यवस्था करण्यात आली नव्हती, याकडे या विद्यार्थ्यांनी लक्ष वेधलं आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com