करिअरनामा ऑनलाईन। ‘डिजिटल इंडिया’च्या काळात देशात चांगली रोजगार निर्मिती होत आहे. रेल्वेसाठी (Unique Career Options) तिकीट एजंट म्हणून काम करण्याची संधीही उपलब्ध आहे. भारतीय रेल्वेचा हा उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत IRCTC हा भारतीय रेल्वेचा ऑनलाइन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म (Online Ticket Booking) तिकीट एजंट होण्याची संधी उपलब्ध करून देतो. तिकीट एजंट म्हणून काम करून मोठी कमाई करण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. त्यासाठी उच्च पातळीवरच्या शिक्षणाची आवश्यकता नसते. त्यामुळे काही कारणाने खूप शिक्षण घेऊ न शकलेल्या, मात्र कम्प्युटर येत असलेल्या हुशार, होतकरू असलेल्या व्यक्तींना यातून रोजगाराची चांगली संधी मिळू शकते.
तिकीट एजंट होण्यासाठी कोणत्याही एका ऑनलाइन प्लॅटफॉर्मचे तुम्ही सदस्य असणं गरजेचं आहे. भारतीय रेल्वे तुम्हाला ही संधी देते. आयआरसीटीसी हा असाच एक प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे रेल्वेचं ऑनलाइन तिकीट बुकिंग करता येतं. प्रत्येक शहरात तिकीट बुकिंगसाठी काही ट्रॅव्हल एजंट्स नियुक्त केले जातात. एजंट म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तीला तिकीट बुकिंगद्वारे महिन्याला चांगले पैसे कमावता येऊ शकतात. भारतीय रेल्वेचा हा उपक्रम अनेकांसाठी उत्तम रोजगार ठरू शकतो.
ही आहे पात्रता – (Unique Career Options)
तुम्हाला आयआरसीटीसीचं (IRCTC) अधिकृत एजंट व्हायचं असेल तर कोणत्याही पदवीची आवश्यकता नसते. एजंट होण्यासाठी संबंधित व्यक्तीला कम्प्युटरची प्राथमिक माहिती असणं गरजेचं आहे. तसंच रेल्वे सर्व्हिस एजंट होण्यासाठी संबंधित व्यक्तीचं पर्सनल वैयक्तिक डिजिटल सर्टिफिकेट असायला हवं. ते मिळवण्याची प्रक्रिया एकदम सोपी आहे.
आवश्यक कागदपत्रे –
अधिकृत एजंट होण्यासाठी उमेदवाराकडे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि स्टॅम्प पेपर असणं गरजेचं आहे. या स्टॅम्प पेपरवरच संबंधित उमेदवाराशी करार केला जातो. करार झाल्यावर (Unique Career Options) आयआरसीटीसीच्या नावाने 20 हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्ट काढावा लागतो. हा ड्राफ्ट बॅंकेत भरावा लागतो. त्यातले 10 हजार रुपये सुरक्षा ठेव अर्थात सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून घेतले जातात.
एजंटच्या सदस्यत्वाची मुदत संपेल, तेव्हा त्याला आपलं ओळखपत्र अर्थात आयडी परत करावं लागतं. संबंधित एजंटच्या नावाचं ओळखपत्र तयार झाल्यावर दर वर्षी ते रिन्यू (Renewal of ID) करावं लागतं. त्यासाठी संबंधित एजंटला 5000 रुपये भरावे लागतात.
इतकं मिळतं कमिशन –
अधिकृत तिकीट एजंट दर महिन्याला चांगली कमाई करू शकतो. प्रत्येक तिकिटामागे एजंटला कमिशन मिळतं. एका तिकीट बुकिंगवर 15 ते 20 रुपये इतकं कमिशन मिळतं. अशा प्रकारे एजंटने नियमितपणे काम केल्यास महिन्याला 70 ते 80 हजार रुपये मिळू शकतात.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com